BJP VS Congress News : खेळी भाजपची, फायदा अध्यक्ष जिभकाटे यांना, इच्छा नसतानाही नाना देणार पाठिंबा !

Nana Patole : महिला सदस्याला जिल्हा परिषदेची धुरा देण्याची खेळी नाना पटोले यांनी खेळली होती.
Nana Patole, Bhandara ZP
Nana Patole, Bhandara ZPSarkarnama
Published on
Updated on

Bhandara ZP Political News : भंडाऱ्यात भारतीय जनता पक्षाने आपल्या राजकीय खेळीने भंडारा जिल्हा परिषदेतील भाजपचे निष्कासीत माजी आमदार चरण वाघमारे (सध्याचे बीआरएस नेते) यांच्या सोबत गेलेल्या आपल्या तीन जिल्हा परिषद सदस्यांना परत भाजपमध्ये आणले. याचा थेट परिणाम जिल्हा परिषदेच्या राजकारणावर झाला. (Nana Patole played the trick of giving a female member the Zilla Parishad)

भाजपच्या या खेळीने सत्ता वाचविण्यासाठी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना तारेवरची कसरत करावी लागणार, हे निश्‍चित आहे. दरम्यान होत असलेल्या या सर्व राजकीय घडामोडींमध्ये सर्वात जास्त फायदा जर कोणाला झाला असेल तर तो म्हणजे विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधर जिभकाटे यांना. कारण २०२३ मध्ये त्यांना बदलवून काॅंग्रेसच्या एका महिला जिल्हा परिषद सदस्याला जिल्हा परिषदेची धुरा देण्याची खेळी नाना पटोले यांनी केली होती.

जिल्हा परिषदेतील सध्याचे बदललेले राजकीय समीकरण व कॉँग्रेसकडे असलेले संख्याबळ लक्षात घेता नाना पटोले यांची ही इच्छा पूर्ण होणे जवळपास अशक्य झाले आहे. त्यामुळे असा प्रयत्न करत स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेण्याचे काम नाना पटोले करणार नाही, असे बोलले जात आहे. या घडामोडींचा परिणाम असा झाला की गंगाधर जिभकाटे यांना आपला जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचा कार्यभार पूर्ण उपभोगता येणार आहे, तर इच्छा नसताना ही नाना पटोले यांना जिभकाटे यांना पद उपभोगू द्यावे लागणार आहे.

५२ सदस्यीय भंडारा जिल्हा परिषदेत १० मे २०२२ला अध्यक्ष, उपाध्यक्ष पदांसाठी निवडणूक झाली होती. कॉँग्रेसच्या २१ सदस्यांनी आपल्या सहयोगी एका अपक्षासोबत भाजपमधून निष्कासीत करण्यात आलेले चरण वाघमारे यांच्या सहा सदस्यांसोबत मिळून (भाजप पाच + एक अपक्ष) सत्ता स्थापन केली. यात कॉँग्रेसचे गंगाधर जिभकाटे अध्यक्ष बनले आणि चरण वाघमारे गटाचे संदीप टाले उपाध्यक्ष झाले.

यावेळी भाजपचे (BJP) जिल्हा परिषद गटनेते विनोद बांते यांचा व्हिप झुगारून भाजपच्या पाच सदस्यांनी कॉँग्रेसला (Congress) समर्थन दिले. याबाबत भाजपने तत्कालीन जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्याकडे तक्रार करत पक्षाशी बंड करणाऱ्या पाचही जिल्हा परिषद सदस्यांवर पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी केली. कालांतराने चरण वाघमारे गटातील दोन सदस्य पुन्हा वाघमारे यांची साथ सोडत भाजपवासी झाले.

दरम्यान चरण वाघमारे गटातील जिल्हा परिषद उपाध्यक्ष संदीप टाले, उमेश पाटील व द्रुपदा मेहर यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात भंडारा जिल्हाधिकारी यांच्या कोर्टात अपात्रतेची सुनावणी होऊ नये, यासाठी याचिका दाखल केली होती.

उच्च न्यायालयाच्या नागपूर (Nagpur) खंडपीठाने त्यांची ही याचिका फेटाळल्याने भंडारा जिल्हाधिकाऱ्यांच्या न्यायालयात ही कार्यवाही होणार असल्याचे स्पष्ट झाले. आपले पद जाणार, ही बाब लक्षात घेता नाइलाजाने स्वतः ‘माफीवीर’ बनत हे तिन्ही सदस्य पुन्हा भाजपकडे आले.

Nana Patole, Bhandara ZP
Bhandara Bhondekar News : ‘त्या’ १४ आमदारांत भंडाऱ्याचे नरेंद्र भोंडेकर, सहयोगी सदस्य असल्यामुळे दिली नोटीस !

आता जिल्हा परिषदेत संख्याबळात पक्षनिहाय बदल झाला आहे. आता काँग्रेसकडे २१ व एक अपक्ष, भाजपकडे घरवापसी केलेले सदस्य मिळून १२ झाले आहेत. त्यांना एका अपक्षाचे पाठबळ आहे. तर राष्ट्रवादी कडे १७ (राष्ट्रवादी प्रणीत आघाडी १६ व एक अपक्ष) असे बलाबल आहे.

सर्व आकडे बघता कॉँग्रेस अल्पमतात आली आहे. आता अध्यक्षपदासाठी झालेली निवडणूक आठवली असता माजी मंत्री बंडू सावरबांधे यांनी मौदा येथे झालेल्या काँग्रेसच्या गुप्त बैठकीत नाना पटोले यांच्यावर दबाव आणत आपले जावई गंगाधर जिभकाटे यांच्या गळ्यात अध्यक्ष पदाची माळ पाडून घेतली होती. तेव्हापासून नाना पटोलेंना गंगाधर जिभकाटे नको होते.

Nana Patole, Bhandara ZP
Bhandara BJP News : भाजपच्या निष्ठावंतांना नकोय बाहेरचा माणूस; 'प्रकाश’पर्वात झाला अंधार !

दरम्यान त्यांनी सिहोरा येथे घेतलेल्या जाहीर सभेत लवकरच काँग्रेसच्या महिला सदस्याच्या हातात जिल्हा परिषद अध्यक्षपदाची धुरा देणार ही घोषणा केली होती. या घोषणेनंतर जिभकाटे यांना धडकी भरली होती. भाजपने आपली खेळी खेळली आणि भाजपला सोडून गेलेल्या आपल्या पाच सदस्यांना परत आणले. आता भाजपच्या खेळीने काँग्रेस अल्पमतात आली आहे.

जिल्हा परिषदेत अल्पमतात असलेले नाना पटोले जिल्हा परिषद अध्यक्ष बदलाचा विचार करू शकत नाही. तसा धोका ते पत्करणारही नाहीत. त्यामुळे याचा फायदा जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधर जिभकाटे यांना झाला आहे. त्यांना आपला कार्यकाळ पूर्ण करता येणार आहे. नाइलाजाने नानांनाही तो पूर्ण करू द्यावा लागणार आहे.

Edited By : Atul Mehere

Nana Patole, Bhandara ZP
Bhandara News : आमदार भोंडेकरांची वाढली जबाबदारी ; जखमी गोविंदांना द्यावी लागणार शासकीय नोकरी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com