Bhandara Bhondekar News : ‘त्या’ १४ आमदारांत भंडाऱ्याचे नरेंद्र भोंडेकर, सहयोगी सदस्य असल्यामुळे दिली नोटीस !

Shivsena : या बंडात शिवसेनेसह काही अपक्ष आमदारांनींही शिंदेंना पाठिंबा दिला.
Devendra Bhondekar and Uddhav Thackeray
Devendra Bhondekar and Uddhav ThackeraySarkarnama

Bhandara District Political News : तब्बल चार महिन्यांच्या कालावधीनंतर शिवसेनेच्या ठाकरे गट व शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेचा मुहूर्त अखेर आज निघाला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात ही सुनावणी झाली. भंडारा विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनाही नोटीस आली आहे. (Some independent MLAs along with Shiv Sena also supported Shinde in this rebellion.)

सहा सप्टेंबरला भोंडेकरांना ही नोटीस आली. त्यांच्यासोबत आमदार बच्चू कडू व आमदार राजेंद्र यड्रावकर पाटील या अपक्ष आमदारांनाही नोटीस आल्याने भोंडेकरांसह हे दोन अपक्ष आमदार आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर सुनावणीसाठी हजर झाले. दरम्यान, अपक्ष आमदारांना नोटीस आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. हे आमदार सत्ताधारी पक्षाचे सहयोगी सदस्य असल्यामुळे नोटीस दिल्याची माहिती आहे. आता ही सुनावणी दोन आठवडे लांबणीवर गेली असली तरी आमदार भोंडेकरांना तेव्हाही विधानसभा अध्यक्षांसमोर उभे रहावे लागणार आहे.

Devendra Bhondekar and Uddhav Thackeray
Sarkarnama Podcast : लातूरकरांचा चिमटा, मातब्बराचा पराभव

महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारून भाजपसोबत सत्ता स्थापन केली. या बंडात शिवसेनेसह काही अपक्ष आमदारांनीही शिंदेंना पाठिंबा दिला. त्यात भंडाऱ्याचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांचाही समावेश आहे. शिवसेना (Shivsena) कुणाची हा वाद निवडणूक आयोगात पोहोचल्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे.

आमदार अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांकडून कार्यवाहीला सुरुवात झाली. आमदार अपात्रतेच्या या प्रक्रियेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गटाकडून अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यासह माजी मंत्री बच्चू कडू, माजी मंत्री राजेंद्र यड्रावकर या अपक्ष आमदारांनाही अपात्रतेची नोटीस पाठविली आहे. त्यामुळे शिंदे गटातील ४० तर ठाकरे गटातील १४ आमदारांसह तीन अपक्ष आमदार आज (ता. १४) सुनावणीच्या वेळी उपस्थित होते.

महाराष्ट्राच्या राजकारणाच्या इतिहासातील आत्तापर्यंतच्या सर्वात मोठ्या निर्णय प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली. या प्रकरणाचा निकाल केवळ राज्यासाठीच नव्हे, तर देशाच्या राजकारणातही महत्त्वाचा ठरणार आहे. शिवसेना कुणाची, हा वाद निवडणूक आयोगात पोहोचल्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. परंतु त्यापूर्वी आमदार अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांकडून कार्यवाहीला सुरुवात झाली आहे.

दरम्यान, आपण अपक्ष राहून निवडणूक लढविली असल्याचे नोटीस मिळालेले अपक्ष आमदार म्हणत आहेत. त्यामुळे आम्हाला नोटीस बेकायदेशीर असल्याचे एकमुखाने हे अपक्ष आमदार म्हणत आहेत, तर दुसरीकडे आमदार भोंडेकर हे सहयोगी सदस्य असल्याने त्यांना नोटीस पाठविली गेल्याचे राजकीय जाणकार सांगतात.

आता नुकतेच विधानसभा अध्यक्षांकडून दोन्ही गटाला कागदपत्रे सादर करण्यासाठी एका आठवड्याची मुदत देण्यात आली आहे. दरम्यान, या शिवसेनेच्या दोन गटांच्या वादात अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर चांगलेच अडकले असून, आता होणाऱ्या प्रत्येक सुनावणीच्या वेळी त्यांना विधानसभा अध्यक्षांसमोर हजर व्हावे लागणार आहे. त्यामुळे भोंडेकर यांच्यावरही अपात्रतेची टांगती तलवार आहे.

Edited By : Atul Mehere

Devendra Bhondekar and Uddhav Thackeray
Bhandara BJP News : भाजपच्या निष्ठावंतांना नकोय बाहेरचा माणूस; 'प्रकाश’पर्वात झाला अंधार !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com