Akola West : वाढणार भाजपची डोकेदुखी; शिवसेना शिंदे गटाजवळही ‘हिडन कार्ड’ तयार

BJP Politics : अनेक इच्छुकांकडून उमेदवारीवर दावा; करावी लागणार मोठी कसरत!
BJP in Akola West.
BJP in Akola West.Sarkarnama
Published on
Updated on

Vidhban Sabha Election : हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून गेल्या तीन दशकांपासून भाजपच्या ताब्यात असलेला अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघ गोवर्धन शर्मा उर्फ लालाजी यांच्या निधनानंतर रिक्त झाला. रिक्त झालेल्या मतदारसंघावर आता भाजपच्या इच्छुक पदाधिकाऱ्यांकडून दावे प्रतिदावे केली जात आहेत. काहींनी आपल्यालाच भाजपकडून तिकीट मिळणार असल्याचा दावा करीत तयारी सुरू केली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत कुणाला तिकीट मिळणार आणि कुणाचा पत्ता कट होणार यावरूनच आता या मतदारसंघात भाजपची मात्र डोकेदुखी वाढणार आहे. तिकीट न मिळाल्यास या मतदार संघात बंडखोरी वाढणार आहे. बंडोबांना थंड करण्यासाठी आणि मतदारसंघ ताब्यात ठेवण्यासाठी भाजपचा मोठा कस लागणार आहे.

BJP in Akola West.
Akola : आमदार म्हणाले; काय सांगता साहेब, माझ्या घराशेजारीच चालतो वरलीचा अड्डा!

गोवर्धन शर्मा अर्थात लालाजी यांनी सलग सहा वेळा हा मतदारसंघ भाजपचा अभेद्य गड ठेवला. त्यांच्या निधनानंतर आता नव्या चेहऱ्याचा शोध भाजपला घ्यावा लागणार आहे. लालाजींच्या तोडीचा उमेदवाराचा भाजपकडून शोध घेण्यात येत आहे. लालाजींच्या निधनापूर्वीच भाजपमधील अनेकांनी या मतदारसंघावर दावा करीत आपणच लालाजींचे राजकीय वारस असल्याचे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने तर आपल्यालाच या मतदारसंघाचे विधानसभेचे तिकीट मिळणार असल्याचे जाहीर केले आहे. या पदाधिकाऱ्याला स्थानिक भाजपमधूनच विरोध आहे. व्यवसायाने डॉक्टर असलेल्या एका पदाधिकाऱ्यानेही या मतदारसंघातून रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे. त्यांनी आपल्याला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोला पश्चिमसाठी शब्द दिल्याचे सांगितले आहे. याव्यतिरिक्तही काही जण निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लालाजी यांचे सुपुत्र अनुप शर्मा यांचे देखील नाव या मतदार संघासाठी चर्चेत आहे. असे झाल्यास विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे दोन अनुप मैदानात दिसतील. भाजपकडून त्यांना उमेदवारी मिळणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीसोबतच अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होण्याची शक्यता देखील आहे. तसे झाल्यास या मतदारसंघाला अल्पकालीन आमदार मिळणार आहे.

पोटनिवडणूक झाल्यास अत्यंत कमी वेळासाठी आमदार होण्यात संभाव्य बंडखोरांना स्वारस्य दिसत नाही. अशात ते बंड पुकारण्यापेक्षा अकोला पश्चिममधील भाजपची लालाजीनंतरची ताकद किती आहे, हे पाहण्याची शक्यता अधिक आहे. भाजपला बुलढाण्याचा लोकसभा मतदार संघ हवा आहे. शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव या मतदार संघात चवथ्या क्रमांकावर दिसत आहे. अशात बुलढाण्याच्या मोबदल्यात अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघावर शिंदे गट भाजपशी वाटाघाटी करू शकतो.

BJP in Akola West.
Akola Lok Sabha Constituency : नोकरीचा राजीनामा मंजूर न झाल्याने संधी हुकलेले डॉ. अभय पाटील मैदानात उतरणार?

आमदार गोवर्धन शर्मा यांच्या तोडीचा मवाळ पण हिंदुत्ववादी चेहरा भाजपजवळ सध्या तरी नाही. एकनाथ शिंदे गटाजवळ मात्र एक असा छुपा पत्ता अकोला पश्चिमसाठी आहे. हा पत्ता अद्याप शिंदे गटाने उघडच केलेला नाही. या छुप्या पत्त्यातील चेहरा हिंदुत्ववादीही आहे आणि शिवसेनेला साजेसा असा आक्रमकही. या पदाधिकाऱ्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकदा नव्हे तर तब्बल दोनदा बैठक घेतली. अकोला पश्चिम आणि बुलढाण्याच्या स्थितीचा त्यांनी आढावा घेतला व या दोन्ही मतदार संघांबाबत आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी नक्कीच बोलू असा शब्दही दिला.

त्यामुळे पोटनिवडणूक झाल्यास चित्र वेगळे असेल व नियमित निवडणूक झाल्यास चित्र बदलेल असे संकेत आहेत. कोणत्याही परिस्थिती हा मतदार संघ हातून जाणार नाही, याची काळजी फक्त शिवसेना आणि भाजप दोघेही घेत आहेत. काँग्रेसकडून या मतदार संघाजवळही उमेदवार आहे. परंतु महाविकास आघाडीत पश्चिमची जागा शिवसेना उद्धव ठाकरे गटाला सुटल्यास त्यावर पक्ष स्वत:चा उमेदवार देणार की वंचित बहुजन आघाडीला संधी देणार हे अस्पष्ट आहे. काँग्रेसही अकोला पश्चिमच्या जागेसाठी जोरदार प्रयत्न करीत आहे.

BJP in Akola West.
Akola LokSabha Constituency : 'वंचितांची आघाडी' बांधणारे बाबासाहेब आंबेडकरांचे नातू ः प्रकाश आंबेडकर

अशात नियमित निवडणूक जाहीर झाल्यास भाजपला बंडखोरीचा नक्कीच सामना करावा लागणार आहे. हे आव्हान पेलण्यासाठी भाजपला आतापासूनच तयारी करणे गरजेचे आहे. अन्यथा अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघात भाजपला फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही

Edited by : Prasannaa Jakate

BJP in Akola West.
Akola Lok Sabha Constituency : वडिलांच्या पक्षनिष्ठेचे फळ अनुप धोत्रेंना मिळणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com