Ashish Deshmukh Vs Anil Deshmukh : '... म्हणून अनिल देशमुखांचे धाबे दणाणले' म्हणत आशिष देशमुखांनी दिले प्रत्युत्तर!

BJP Ashish Deshmukh News : '...हे अनिल देशमुख यांनी पुरावे देऊन सिद्ध करावेत. नाहीतर राजकारणातून संन्यास घ्यावा. ' असं आव्हानही आशिष देशमुख यांनी दिलं आहे.
Ashish Deshmukh Vs Anil Deshmukh
Ashish Deshmukh Vs Anil DeshmukhSarkarnama
Published on
Updated on

Katol Assembly Constituency News : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी नागपूर येथे पत्रकार परिषद घेऊन भाजपचे ओबीसी मोर्चा प्रदेश प्रभारी व प्रवक्ते माजी आमदार आशिष देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केलेत. त्या आरोपांवर आशिषराव देशमुख यांनी प्रत्युत्तर दिले.

डॉ आशिषराव देशमुख म्हणाले, "मी काटोल येथे सक्रिय झाल्याबरोबर अनिल देशमुख यांचे धाबे दणाणले आहे. काटोल विधानसभा क्षेत्रात 2014 ची पुनरावृत्ती होणार अशी भीती त्यांना वाटत असून त्यांच्या पायाखालची वाळू सरकायला लागली आहे. म्हणून ते माझी बदनामी करण्यासाठी असे खोटे आरोप करीत आहेत.'

आशिष देशमुख(Ashish Deshmukh) म्हणाले 'मी कुणाच्या माध्यमातून त्यांना असे निरोप पाठविले हे अनिल देशमुख यांनी पुरावे देऊन सिद्ध करावेत. नाहीतर राजकारणातून संन्यास घ्यावा. माझे त्यांना खुले आव्हान आहे. अनिल देशमुख आणि सलील देशमुख या पिता- पुत्रांमध्ये काटोल येथून लढण्यावरून भांडणे सुरू आहेत. मला जर काटोलमधून उमेदवारी नाही मिळाली, तर मी घर सोडून जाईन, विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करेल, अशी धमकी सलील देशमुख यांनी वडील अनिल देशमुख यांना दिली आहे.'

Ashish Deshmukh Vs Anil Deshmukh
Anil deshmukh : काका-पुतण्यातील वाद पेटणार; 'भगोडा आमदार' म्हणत डिवचले

याशिवाय 'आज काटोल मतदारसंघात वडीलाचा एक गट आणि मुलाचा दुसरा गट असे दोन गट आमने- सामने आले आहेत. हे बाप- लेक केवळ राजकीय स्वार्थासाठी एकमेकांशी भांडणे करीत आहेत. अनिल देशमुख(Anil Deshmukh) मागील 30 वर्षांपासून या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. पण त्यांनी या मतदारसंघाचा कधी विकास केला नाही. आता त्यांच्या विरोधात मतदारसंघात प्रचंड असंतोष आहे. त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी ते असे खोटे आरोप करीत आहेत.' असं आशिष देशमुखांनी म्हटलं.

Ashish Deshmukh Vs Anil Deshmukh
Mahadev Jankar News : महादेव जानकरांचं ठरलं! ; महायुतीला सोडचिठ्ठी, विधानसभा स्वबळावरच लढवणार

याशिवाय 'अनिल देशमुख आज आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर रोज आरोप करीत असतात. पण जेव्हा अजित पवार आणि त्यांचे आमदार शरद पवार यांच्यापासून वेगळे झाले आणि त्यांनी महायुती सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांच्यासोबत अनिल देशमुख नव्हते का? अनिल देशमुख यांची सुद्धा सरकारमध्ये सहभागी होण्याची इच्छा होती. पण त्यांना मंत्री बनविण्यास नकार दिल्याने त्यांनी वेळेवर आपल्या निर्णय बदलविला. एकीकडे देवेंद्र यांच्यावर आरोप करायचे आणि दुसरीकडे महायुती सरकारमध्ये जाण्यासाठी धडपड करायची. हा दुतोंडीपणा अनिल देशमुख यांनाच शोभून दिसतो." अशा शब्दांमध्ये आशिष देशमुख यांनी टीका केली.

(Edited by- Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com