Anil Deshmukh : काँग्रेस एक पाऊल मागे घेणार? हरियाणाचा दाखला देत मित्रपक्षांचा दबाव वाढला

Assembly election 2024 Anil Deshmukh Congress : अनिल देशमुख म्हणाले, हरियाणात जी चूक केली ती काँग्रेस महाराष्ट्रात करणार नाही. हरियाणात फटका बसला असली तरी महाराष्ट्रात तशी परिस्थिती नाही. येथे मित्रपक्षाशी चर्चा करूनच जागा वाटपाचा निर्णय होणार आहे.
Anil Deshmukh
Anil DeshmukhSarkarnama
Published on
Updated on

Anil Deshmukh : हरियाणात पराभव झाल्याने आता शिवसेना (UBT) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने जागा वाटपाच्या चर्चेत काँग्रेसवर दाबाव वाढवला जात आहे. संजय राऊत यांच्यानंतर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील हरियाणाच्या पराभवावर भाष्य केले आहे.

मित्रपक्षांना जागा सोडल्या असत्या तर हरियाणात वेगळा निकाल आला असता असे सांगून अनिल देशमुखांनी काँग्रेसला आरसा दाखवला आहे. यावरून मोठा भाऊ असल्याचा दावा करणाऱ्या काँग्रेसला एक पाऊल मागे घ्यायला भाग पाडल्या जात असल्याचे दिसून येते.

हरियाणामध्ये काँग्रेस जिंकणार असे चित्र होते. एक्झिट पोलही काँग्रेसच्याच बाजूने कौल दाखवत होते. प्रत्यक्षात निकाल वेगळाच आला. भाजप बहुताने विजयी झाली. यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. मित्रपक्षांकडे दुर्लक्ष करणे, कमी लेखणे हे काँग्रेसला भोवल्याचा दावा होत आहे.

अनिल देशमुख म्हणाले, हरियाणात जी चूक केली ती काँग्रेस महाराष्ट्रात करणार नाही. हरियाणात फटका बसला असली तरी महाराष्ट्रात तशी परिस्थिती नाही. येथे मित्रपक्षाशी चर्चा करूनच जागा वाटपाचा निर्णय होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. परवा एक बैठक झाली. दसऱ्यानंतर पुन्हा आम्ही बसणार आहोत. विदर्भातील अनेक जागा आम्ही वेटिंगवर ठेवल्या आहेत. लवकरात चर्चा करून त्यावर तोडगा काढण्यात येईल.

Anil Deshmukh
Sanjay Raut : 'हरियाणात कोणत्या फॉर्म्युल्यानं जिंकले? भाजपनं 'तो' फॉर्म्युला जगभर शेअर करावा'

महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री कोणाला करायचे याचा निर्णय घेतला जाईल. तीनही पक्षाचे वरिष्ठ नेते मुख्यमंत्री ठरवली. हा निर्णय घेणे अवघड काम नाही. अवघ्या दहा मिनिटात निर्णय होईल, असा दावाही अनिल देशमुख यांनी केला.

हक्कभंग आणण्याच्या देशमुख यांचा इशारा

काटोल-नरखेड विधानसभा मतदारसंघाला विकासासाठी निधी दिला जाता नाही. शेकडो फाईल रोखून ठेवण्यात आल्या आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच तसे आदेश देऊन ठेवले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी फाईल मंजूर करीत नसल्याचा देशमुखांचा आरोप आहे. सर्वांना समान निधी वाटपाचा विषय घेऊन आम्ही कोर्टात जाऊ, तसेच हक्कभंग आणाव लागले, असाही इशारा देशमुख यांनी दिला.

Anil Deshmukh
Ahilyanagar Politics : काँग्रेसची बूथ लेवलपर्यंत यंत्रणा सज्ज; 'नगर'वर दावा सांगताच, मित्रपक्षांच वाढलं टेन्शन

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com