Nagar District Bank Corruption : नगर जिल्हा बँकेत नक्की चाललंय काय ? तनपुरेंचा कार्डिलेंच्या कारभारावर संशय

NCP- BJP Politics : प्राजक्त तनपुरे आणि भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्यातील राजकीय तू तू - मैं मैं सर्वश्रुत आहे...
Nagar Politics
Nagar Politics Sarkarnama

Nagar Politics : राहुरी-नगर-पाथर्डी अशा तीन तालुक्यांत विस्तार असलेल्या राहुरी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्राजक्त तनपुरे आणि भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्यातील राजकीय तू तू - मैं मैं सर्वश्रुत आहे. खासदार सुजय विखे यांच्या जवळचे समजले जाणारे कर्डिले सध्या जिल्हा सहकारी बँकेवर अध्यक्ष आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार प्राजक्त तनपुरे यांनी आपल्या खासगी साखर कारखान्याची चौकशी ईडीकडून सुरू असल्याचे सांगत जिल्हा बँकेत मनमानी पद्धतीने काम सुरू असल्याचा आरोप एका कार्यक्रमात केला.

जिल्हा बँकेत मनमानी कारभाराची ईडी चौकशी झाल्यास अनेक भ्रष्टाचाराचे पुरावे बाहेर पडतील. बँकेचे अध्यक्ष मनमानी कारभार करत आहेत. स्वतःच्या हव्यासापोटी एक कोटी रुपयांच्या दोन वाहनांची खरेदी करण्यात आली. यासह अनेक कारखान्यांना बोगस कर्ज वाटप करून सहकारात आशिया खंडात अग्रगण्य असलेल्या नगर जिल्हा बँकेला डबघाईत लोटण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका आमदार प्राजक्त तनपुरे यांनी जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांचे नाव न घेता केली.

Nagar Politics
Bollywood Celebrity at Varsha : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी बाप्पाच्या दर्शनाला बॉलिवूड कलाकारांची हजेरी

राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथे ९० लाख रुपयांच्या विविध विकासकामांचा शुभारंभ तनपुरे यांच्या हस्ते पार पडला. तनपुरेंनी भाषणात राज्य सरकारच्या कारभारावर सडकून टीका केली. गतिमान शासनाने सर्वसामान्यांच्या प्रश्नांना पायदळी तुडवले. अनेक विकासकामांना स्थगिती दिली. काही अधिकारी हे टक्केवारीसाठी कामे अडवत आहेत. अशांना आमच्या सत्ता काळात योग्य ती जागा दाखवू, असा इशाराही तनपुरेंनी दिला.

दोन हजार कोटींच्या एसीएफ योजनेबाबत मंत्रालयात प्रश्न उपस्थित केला. परंतु त्याबाबतही सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उडवाउडवीचे उत्तर देऊन सर्वसामान्यांच्या प्रश्नाबाबत आपणास घेणे-देणे नसल्याचे दाखवून दिले. परंतु 'एसीएफ'मध्ये असलेल्या दोन हजार कोटींच्या रकमेचा पाठपुरावा करत ग्रामीण भागातील ऊर्जा प्रश्न सोडविण्याचा आपला मानस असल्याचेही तनपुरेंनी स्पष्ट केलं.

जिल्हा बँकेचा कारभार हाती घेतलेले नव्या अध्यक्षांनी पद मिळताच कोणतीही गरज नसताना १ कोटी रुपये खर्च करून दोन वाहने खरेदी केले. जिल्हा बँकेत पद घेतल्यापासून अध्यक्ष जिल्हा बँक मालकीची झाल्याप्रमाणे वागत आहेत. अनेक जिल्हा बँकेच्या संचालकांनी ही बाब निदर्शनास आणली आहे. काही कारखान्यांना बोगस कर्ज वाटप करून बँकेचे नुकसान केले जात आहे. त्याची चौकशी झाल्यास सत्य काय ते समोर येईल, असंही तनपुरेंनी नमूद केलं.

भाजपमध्ये सहभागी झाल्यास भ्रष्टाचाराचे आरोप नष्ट होतात. शेतकर्‍यांच्या जिवावर उठलेला भाजप पक्ष हा वॉशिंग पावडर भाजप झाला आहे. शेतकर्‍यांना अनुदानाच्या कागदी घोषणा झाल्या, परंतु प्रत्यक्षात शेतकर्‍यांना काहीच मिळाले नसल्याचा आरोप आ. तनपुरे यांनी केला.

Edited By- Anuradha Dhawade

Nagar Politics
India Vs Canada : कॅनडाच्या संरक्षण मंत्र्याला उपरती; म्हणाले, 'आमच्यासाठी भारत महत्त्वाचाच...'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com