BJP's Internal Disputes : भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ !

Telhara - Akola : सुरुवातीला स्थानिक पातळीवर बूथप्रमुखांची नियुक्ती केली जात होती.
BJP
BJPSarkarnama
Published on
Updated on

Akola District BJP Political News : एकेकाळी अकोला जिल्ह्यात तेल्हारा तालुका हा भाजपचा गढ मानला जात होता. परंतु आता हा तालुका अंतर्गत कलहाचा गढ मानला जात आहे. याला कारण म्हणजे भाजप तालुका अध्यक्षांच्या पदाकरिता झालेल्या रस्सीखेचीमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपामुळे दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ झाल्याचे दिसून येत आहे. (Initially booth heads were appointed at the local level)

ज्यांचे नाव जिल्हा अध्यक्ष पदाकरिता घेतले जात होते, त्यांना आता दोघांच्या भांडणात तालुका अध्यक्षपद मिळाल्याचे बोलले जात आहे. तालुक्यात भाजपमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आल्याचे दिसून येत आहे. भाजपमध्ये ठरल्याप्रमाणे तीन वर्षांच्या कालावधीत संघटनात्मक निवडणुका लोकशाही पद्धतीने घेतल्या जात होत्या. सुरुवातीला स्थानिक पातळीवर बूथ प्रमुखांची नियुक्ती केल्या जात होती.

शाखा अध्यक्षांची निवड व त्यानंतर तालुका अध्यक्षांची निवड केली जात होती आणि तालुका अध्यक्षांची निवड झाल्यानंतर जिल्हा अध्यक्षांची निवड होत होती. अशी भारतीय जनता पक्षात पद्धत असल्याचे भाजपच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे. परंतु या पद्धतीला कुठेतरी फाटा दिल्या जात असल्याचेसुद्धा कार्यकर्ते सांगतात. कारण जिल्हा अध्यक्षांची निवड झाल्यानंतर तालुका अध्यक्षांची निवड होत आहे.

ही पद्धत उलटी सुरू झाली की काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अकोला जिल्हा भाजप ग्रामीण अध्यक्षाची निवड झाल्यानंतरसुद्धा तेल्हारा तालुका भाजप अध्यक्षपद रिक्त होते निवड न झाल्यामुळे काही दिवसांपूर्वीच स्थानिक सभागृहामध्ये भाजपच्या निरीक्षक व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली व या बैठकीमध्ये तालुका अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू झाली.

या बैठकीमध्ये एकमत न झाल्यामुळे दोघांचे नावे समोर आले. त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे निष्ठावान ज्येष्ठ कार्यकर्ते माजी तालुकाध्यक्ष तसेच माजी जिल्हा पदाधिकारी केशवराव ताथोड यांचे नाव जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांकडून पुढे करण्यात आले. त्याचबरोबर आमदार प्रकाश भारसाकडे यांचे खंदे समर्थक ते अपक्ष उभे होते तेव्हापासून त्यांच्यासोबत असणारे हिवरखेड येथील कुशल संघटक रमेश दुतोंडे यांचे नाव समोर करण्यात आले होते.

दोघांचे एकमत न झाल्यामुळे भाजपच्या निवडणुकीच्या पद्धतीप्रमाणे निवडणूक घेण्याचे ठरविण्यात आले. दोघांची नावे समोर असल्यामुळे उपस्थित कार्यकर्त्यांकडून कुणाला कुणाची पसंती आहे. याबाबत विचारणा करण्यात आल्याचे भाजपच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येते. परंतु मध्यंतरी बराच कालावधी लोटून गेल्यानंतरसुद्धा तालुका अध्यक्षांची निवड झाली नाही. तालुका अध्यक्षांची निवड ही निवडणुकीच्या दिवशी जाहीर व्हायला पाहिजे होती.

BJP
BJP Election Strategy : बावनकुळेंनी उघड केली निवडणूक स्ट्रॅटेजी; ‘महायुती उमेदवारांच्या विजयाची जबाबदारी भाजपची...’

तसे झाले नाही ते का झाले नाही, याबाबत लोकप्रतिनिधींचे नाव घेतल्या जात आहे. त्यानंतर बराच कालावधी लोटल्यानंतर भाजपचे माजी तालुकाध्यक्ष गजानन उंबरकार यांचे नाव हे जिल्हाध्यक्षा पदाकरिता पुढे करण्यात आले होते. तशी चर्चा सर्व जिल्हाभर होती. परंतु त्यांना जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडणुकीतून डावलण्यात आल्यानंतर व स्थानिक पातळीवर तालुका अध्यक्षपदाबाबत प्रतिष्ठेचा प्रश्न काहींनी निर्माण केल्यामुळे जिल्हा अध्यक्ष बनू पाहणारे गजानन उंबरकर यांची तालुका अध्यक्षपदी पुन्हा नियुक्ती करण्यात आली.

या सर्व प्रकारामुळे तेल्हारा तालुक्यात भारतीय जनता पार्टीतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला असून, यामध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलण्यात येत असल्याचा सूर उमटत आहे. निश्चितपणे भविष्यातील निवडणुकांमध्ये याचे पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाही, असे बोलले जात आहे.

भारतीय जनता पक्ष तेल्हारा तालुक्यात कोण चालवत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या घडामोडीमुळे भारतीय जनता पक्षात नेतृत्व तयार होत नाही की ते तयार होऊ दिले जात नाही, असासुद्धा प्रश्न उपस्थित होत आहे. याला सर्वस्वी कोण जबाबदार आहे, हे सर्वांनाच माहीत असल्याचे सांगण्यात येते. परंतु उघडपणे कोणी पंगा घेण्यास तयार नसल्याचे सांगण्यात येत आहे.

Edited By : Atul Mehere

BJP
Akola Vikhe Patil News : तुम्हाला मुख्यमंत्री व्हावं वाटतं का? विखे पाटलांनी एकाच वाक्यात सांगितलं !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com