Holidays 2024 : नवीन वर्षात मुंबई उच्च न्यायालयाला 132 दिवस सुट्या!

Bombay High Court Holidays 2024 : मुंबई उच्च न्यायालयाला कुठल्या कधी-कधी आहेत सुट्या?
Mumbai High court News
Mumbai High court NewsSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Court Holidays : नवीन वर्ष 2024 सुरू झाले आहे. नव्या वर्षाच्या कॅलेंडरमधील सुट्याही समोर आल्या आहेत. उच्च न्यायालय प्रशासनानेही सुट्यांची माहिती जाहीर केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाला 365 दिवसांपैकी यंदाच्या वर्षी 132 दिवस सुट्या आहेत.

न्यायालय प्रशासनाने 2024 चे सुट्यांचे कॅलेंडर प्रकाशित केले आहे आहे. हे कॅलेंडर मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व खंडपीठांना लागू आहे. या कॅलेंडरनुसार न्यायालयाला उन्हाळी सुट्या या 30 दिवसांच्या आहेत, तर दिवाळीच्या सणात न्यायालयाचे कामकाज हे 16 दिवस बंद राहणार आहे. नाताळ सणाला न्यायालयाला सुट्या आहेत. नाताळ सणावेळी न्यायालयाला 10 दिवसांची सुटी असेल.

Mumbai High court News
Vivek Phansalkar: पोलिस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवलेले विवेक फणसळकर कोण आहेत ?

उच्च न्यायालयाला 13 मे ते 9 जूनपर्यंत उन्हाळी सुट्या असणार आहेत. दिवाळीच्या सुट्या या 28 ऑक्टोबरपासून ते 8 नोव्हेंबरपर्यंत असणार आहेत. उच्च न्यायालयाला मे महिन्यात सर्वाधिक 23 दिवस सुट्या आहेत, तर जून, नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये या महिन्यांत प्रत्येकी 14 दिवस न्यायालयाचे कामकाज बंद असेल. सणानिमित्त न्यायालय 18 दिवस बंद असेल. न्यायालय प्रशासनाकडून अलिकडेच हे सुट्यांचे कॅलेंडर प्रकाशित करण्यात आले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सण आणि उन्हाळी सुट्या सोडल्या तर वर्षातील 52 रविवार आणि चौथा शनिवारच्या 26 दिवस सुट्या असतील. खंडपीठानुसारही काही विशेष दिवशीही न्यायालयाला सुटी असेल. नागपूर खंडपीठाला 10 मे रोजी अक्षय तृतीयेला आणि 11 सप्टेंबरला 'महालक्ष्मी पूजा'निमित्त सुटी आहे. तसेच पणजी खंडपीठात 6 सप्टेंबरला हरितालिका, 3 सप्टेंबरला 'फिस्ट ऑफ फ्रान्सिस झेव्हिअर' आणि 19 डिसेंबरला गोवा मुक्तीदिनाची सुटी जाहीर करण्यात आली आहे.

edited by sachin fulpagare

Mumbai High court News
IPS Officers: न्यायाधिशालाच गोवले बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात ; 5 पोलीस अधिकाऱ्यांना दणका

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com