Vivek Phansalkar: पोलिस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवलेले विवेक फणसळकर कोण आहेत ?

Police Commissioner : राज्याच्या पोलिस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार विवेक फणसळकर यांच्याकडे सोपवण्यात आला.
Vivek Phansalkar
Vivek PhansalkarSarkarnama
Published on
Updated on

भाग्यश्री प्रधान-आचार्य :

Dombivli Mumbai: राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश सेठ रविवारी सेवानिवृत्त झाले. त्यानंतर राज्याच्या पोलिस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे सोपवण्यात आला. आता त्यांच्याकडे हा अतिरिक्त कार्यभार पुढील आदेश येईपर्यंत असणार आहे.

पोलिस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार फणसळकर यांच्यावर सोपवण्यात आल्यानंतर ते चांगलेच चर्चेत आले. याआधी त्यांनी पोलिस विभागातील अनेक महत्त्वाच्या पदांचा कार्यभार सांभाळलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात फणसळकरांनी अतिरिक्त आयुक्त आणि आयुक्तपदाचा कार्यभार सांभाळलेला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Vivek Phansalkar
Vivek Phansalkar: पोलिस महासंचालक रजनीश सेठ निवृत्त; अतिरिक्त कार्यभार विवेक फणसळकरांकडे सोपवला

विवेक फणसळकर 1989 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. सध्या त्यांच्याकडे मुंबई पोलिस आयुक्तपदाची जबाबदारीदेखील आहे. 1991 ते 1993 यादरम्यान त्यांनी अकोला येथे अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून काम पाहिलेले आहे. त्यांनतर 1993 ते 1995 यादरम्यान राज्यपालपदी डॉ. पी. सी. अलेक्झांडर असताना फणसळकर यांनी राज्यपालांचे परिसहायकपद सांभाळले.

तसेच 1998 ते 2000 या काळात फणसळकर यांनी नाशिक येथे पोलिस उपायुक्त म्हणून पदभार सांभाळला. 2000-2003 या काळात नागपूर येथे ते गुन्हे शाखेचे पोलिस अधीक्षक होते. 2003 ते 2007 यादरम्यान भारतीय कपास निगम लिमिटेड या संस्थेच्या दक्षता विभागाचे संचालकपदही त्यांनी भूषविले.

Vivek Phansalkar
Nitin Karir : नितीन करीर महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव!

2007-2010 या कालावधीत त्यांनी पुणे आणि ठाणे या दोन्ही शहरांचा अतिरिक्त पोलिस आयुक्त म्हणून कारभार सांभाळला. 2010-2014 या वर्षात त्यांनी मुंबई येथे वाहतूक विभागाचे सहायक आयुक्त म्हणून पदभार सांभाळला. 2014-2015 यादरम्यान मुंबईतच प्रशासकीय विभागात सहायक पोलिस आयुक्त म्हणून कारभार सांभाळला. त्यामुळे फणसळकर यांना मुंबई आणि मुंबई पोलिस दलाची चांगली ओळख आहे.

2015-2016 या कालावधीत दहशतवादविरोधी पथकाचे ते प्रमुख होते. 2016-2018 या कालावधीत त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अतिरिक्त पोलिस महसंचालक म्हणून कार्यभार सांभाळला. 2018-2022 या काळात ते ठाण्याचे पोलिस आयुक्त होते. यावेळी त्यांनी ठाणे शहरात कोरोनाच्या काळात उत्तम नियोजन केले होते. त्यांचे कौतुक सर्वत्र होताना दिसले.

2022 पासून फणसळकर मुंबईचे पोलिस आयुक्त आहेत. असे असले तरी सध्या फणसळकर यांच्याकडे मुंबई महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. शांत स्वभाव आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून विवेक फणसळकर यांची ओळख आहे. तसेच इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व, कामाचे नियोजन, कामाप्रती असलेली निष्ठा, पाहूनच त्यांना या पदाचा अतिरिक्त भार दिला असल्याचे सांगण्यात येते.

विवेक फणसळकर यांनी त्यांच्या मुलीच्या लग्नाच्या दिवशीही सुटी न घेता कर्तव्य पार पाडले होते. सध्या लोकसभा, विधानसभा निवडणुका येऊ घातल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर संयमी, शांत, शिस्तप्रिय अधिकाऱ्याची गरज आहे, हे जाणूनच त्यांच्यावर राज्याच्या पोलिस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.

(Edited By Ganesh Thombare)

Vivek Phansalkar
BJP MP Pratap Simha : घुसखोरी प्रकरणातील भाजप खासदाराच्या भावाच्या अटकेने तापले राजकारण

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com