Vidarbh BRS : 'पाँचसौ में बिकोगे तो ऐसेही रोड पाओगे'; लोकप्रतिनिधींना टोले लगावत 'बीआरएस' आक्रमक

Gondpimpri Dhaba : धाब्यात रत्यावर बॅनरबाजी करून जिलेबी वाटली
Chandrapur BRS
Chandrapur BRSSarkarnama

Chandrapur Political News : चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी धाबा महामार्गाचे काम गेल्या पाच वर्षांपासून रखडले आहे. दोन वर्षांत काम पूर्ण करावयाचे असताना याकडे कंत्राटदार, पालकमंत्री, आमदार यांचे पुरते दुर्लक्ष होत आहे. गोंडपिपरी धाबा मार्गाच्या अपूर्ण कामाबाबत 'पाँचसौ में बिकोगे तो ऐसेही रोड पाओगे' असे जनतेला उद्देशून बॅनरबाजी करण्यात आली आहे. तर या रस्त्याबाबत ठेकेदार व लोकप्रतिनीधींचे उपहासात्मक पद्धतीने आभार मानत बीआरएसने आंदोलन छेडले आहे.

यावेळी गावातील नागरिकांना, प्रवाशांना जिलेबी वाटून वेगळ्या पध्दतीने आंदोलन करण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी धाबा हा तेलंगणाला जोडणारा मार्गाचे काम सुरू आहे. मार्गाचे काम पूर्ण न झाल्याने हजारो प्रवाशांचे हाल होतात. या मार्गामुळे अनेकांना जीव गमवावा लागला तर काहींना कायमचे अपंगत्व आले. दरम्यान, सत्ताधाऱ्यांच्या वरदहस्तामुळे कंत्राटदार काम पूर्ण करण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे. यातूनच बीआरएसच्या वतीने सोवारी गोंडपिपरी तालुक्यातील धाबा येथे आंदोलन केले.

Chandrapur BRS
Gram Panchayat Election : ग्रामपंचायतीच्या उमेदवारांना आता खर्च सादर करावा लागणार; अन्यथा...

दरम्यान, या रस्त्यावर ठिकठिकाणी बीआरएसच्या वतीने लक्षवेधी बॅनर लावले होते. पाच सौ मे बिकोगे तो ऐसेही रोड पाओगे, असे जनतेला सांगत सत्ताधाऱ्यांना चिमटा काढळा आहे. आंदोलनात बॅन्डबाजा फटाक्यासह धाबा गावातून रॅली काढण्यात आली. यावेळी धाबा गोंडपिपरी हा 12 किलोमीटरचा मार्ग दर्जेदार, व्रिकमी वेळात पूर्ण केल्याबद्दल महाराष्ट्र शासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, पालकमंत्री, आमदार व कंत्राटदार यांचे आभार मानत टोले लगावले.

याबाबत भूषण फुसे म्हणाले, प्रवाशी, नागरिक व प्रशासनातील अधिकाऱ्यांना जिलेबी वाटून आंदोलन करण्यात आले. आता महिनाभरात या मार्गाच्या कामाबाबत ठोस निर्णय झाला नाही, तर आंदोलन तीव्र करणार असल्याचा इशाराही फुसेंनी दिला आहे.

बीआरएसनंतर काँग्रेस आक्रमक...

गोंडपिपरी धाबा मार्गावरून सरकारला घेरण्याचा विरोधकांचा प्रयत्न सुरू आहेत. बीआरएसच्या आंदोलनानंतर मंगळवारी काँग्रेस गोंडपिपरी धाबा मार्गावरील डोंगरगाव फाट्यावर चक्काजाम करणार आहे. यासाठी काँग्रेसची जोरदार तयारी झालेली आहे. गोंडपिपरी धाबा मार्गाचा प्रश्न आता ऐरणीवर आला असून नागरिकांत शासन आणि प्रशासनाविरोधात संतापाची लाट पसरली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Chandrapur BRS
Ahmednagar News : 'प्रवरे'कडून 8 वर्षे लूट होताना गप्प का ? ऊस दरावरून 'गणेश'च्या अध्यक्षांनी मांडली जुनी आकडेवारी..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com