Sanjay Gaikwad : शिवसेनेच्या आमदार पुत्राला अन् पुतण्याला दणका : बोगस मतदाराला मदत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Buldhana Election : नगरपरिषद निवडणुकीत बोगस मतदाराला मदत केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र व पुतण्यावर गुन्हा दाखल झाला असून प्रकरणाने राजकीय वादंग निर्माण केले आहे.
Police file an FIR against MLA Sanjay Gaikwad’s son and nephew after a viral video shows them allegedly helping a bogus voter escape during Buldhana municipal election polling.
Police file an FIR against MLA Sanjay Gaikwad’s son and nephew after a viral video shows them allegedly helping a bogus voter escape during Buldhana municipal election polling.Sarkarnama
Published on
Updated on

Bogus Voting Case : बुलढाणा नगरपरिषदेचे मतदान बोगस मतदान मुद्द्यावर गाजले. त्या बोगस मतदान प्रकरणात एकूण 6 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आमदार संजय गायकवाड यांचे चिरंजीव कुणाल गायकवाड आणि पुतण्या श्रीकांत गायकवाड यांच्याविरुद्ध देखील गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांच्या तावडीतून एका बोगस मतदाराला कुणाल गायकवाड यांनी पळून जाण्यासाठी मदत केल्याचा व्हिडिओ काल व्हायरल झाला होता. अखेर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी कुणाल गायकवाड आणि श्रीकांत गायकवाड यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले.

प्रभाग क्रमांक 6 मध्ये जिल्हा व्यवसाय प्रशिक्षण केंद्र या मतदान केंद्रावर एका बोगस मतदाराला स्थानिकांनी पकडले होते. तिथे कुणाल गायकवाड आणि श्रीकांत गायकवाड यांची एन्ट्री झाल्यानंतर त्या दोघांनी बोगस मतदाराला पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्यास मदत केल्याचा व्हिडिओ संपूर्ण समाज माध्यमावर व्हायरल झाला.

Police file an FIR against MLA Sanjay Gaikwad’s son and nephew after a viral video shows them allegedly helping a bogus voter escape during Buldhana municipal election polling.
Parbhani Election News : परभणीत मतांचा टक्का घसरला; यशाचा गुलाल नेमका कोणाला हुलकावणी देणार ?

दरम्यान प्रभाग क्रमांक 15 मधील गांधी प्राथमिक शाळेच्या मतदान केंद्रावर मोताळा तालुक्यातील कोथळी येथून कथितपणे मतदानासाठी आलेल्या दोन संशयितांना पकडले. प्राथमिक तपासणीत संशय निर्माण झाल्यास त्यांना ही पोलिसांच्या ताब्यात दिल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी शरद पाटील यांनी सांगितले.

Police file an FIR against MLA Sanjay Gaikwad’s son and nephew after a viral video shows them allegedly helping a bogus voter escape during Buldhana municipal election polling.
Santosh Bangar News : फडणवीसांनी झापलेल्या शिंदेंच्या आमदाराला होऊ शकतो कारावास; कायद्यातील शिक्षेची तरतूद पाहिली का...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com