Hemant Patil News : डीन वाकोडेंना शौचालय साफ करण्यास सांगणे खासदार हेमंत पाटलांच्या अंगलट; ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

Nanded Hospital Death Case : डॉ. वाकोडे यांच्या तक्रारीवरून ही कारवाई खासदार पाटलांवर करण्यात आली आहे.
Hemant Patil News
Hemant Patil News Sarkarnama
Published on
Updated on

Hingoli News : नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यायाचे डीन डॉ. श्याम वाकोडे यांना शौचालय साफ करण्यास खासदार हेमंत पाटील यांनी नुकतेच भाग पाडले होते. हे प्रकरण त्यांच्या अंगलट आले आहे. त्यांच्याविरोधात ॲट्रॉसिटी व सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. वाकोडे यांच्या तक्रारीवरून ही कारवाई खासदार पाटलांवर करण्यात आली आहे.

Hemant Patil News
Nanded Incident : नांदेडच्या घटनेला गिरीश महाजन, हसन मुश्रीफ हेच जबाबदार; खडसे संतापले..

नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील मृत्यू प्रकरणी विविध नेते, मंत्री रुग्णालयाला भेट देत आहेत. काल (मंगळवारी) खासदार हेमंत पाटीलदेखील रुग्णालयात आले होते. या वेळी डीन वाकोडे त्यांच्यासोबत होते. एका शौचालयाजवळ दोघेही पोहोचले, तेव्हा त्यात घाण होती. हे पाहून पाटील संतापले व त्यांनी वाकोडे यांच्या हातात झाडू देऊन ती साफ करण्यास भाग पाडले. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात रात्री उशिरा हेमंत पाटील आणि अन्य 10 ते 15 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हेमंत पाटील यांच्या या कृतीवर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली आहे. "डीन वाकोडे यांच्या हातात काहीच नाही, त्यांना शिक्षा देऊन, बोलून काय उपयोग," असा सवाल अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.

संभाजी ब्रिगेडनेही हेमंत पाटील यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. हेमंत पाटील हे शासकीय अधिकाऱ्यांना झाडू देऊन ही स्टंटबाजी करीत असल्याची टीका संभाजी ब्रिगेडचे नांदेड विभागीय अध्यक्ष संकेत पाटील यांनी केली आहे.

Hemant Patil News
Ramesh Kadam News : जेलमधून बाहेर आलेले माजी आमदार रमेश कदमांना ठाकरे गटाकडून ऑफर; मोहोळ विधानसभेसाठी...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com