BJP Announcement: नगपरिषद झांकी है, मुंबई महापालिका बाकी है! नगराध्यक्षांच्या निकालांनंतर भाजपचे स्पष्ट संकेत

BJP Announcement : राज्यातील नगरपरिषदांमधील नगराध्यक्षपदांच्या निवडणुकांचे निकाल आता स्पष्ट झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक १२० जागांवर भाजप आघाडीवर आहे. पण एकूणच महायुतीचा यामध्ये डंका आहे.
Devendra Fadnavis, ravindra chavan
Devendra Fadnavis, ravindra chavanSarkarnama
Published on
Updated on

BJP Announcement: राज्यातील नगरपरिषदांमधील नगराध्यक्षपदांच्या निवडणुकांचे निकाल आता स्पष्ट झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक १२० जागांवर भाजप आघाडीवर आहे. पण एकूणच महायुतीचा यामध्ये डंका आहे. त्यामुळं या निकालांवर प्रतिक्रिया देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी प्रतिक्रिया देताना हा देवेंद्र फडणवीसांच्या दूरदृष्टीचा विजय असल्याचं म्हटलं आहे. तसंच नगरपरिषद तर झाँकी आहे आता मुंबई महापालिका बाकी आहे, असा नाराही यावेळी भाजपच्या नेत्यांनी दिला. त्यामुळं सहाजिकच अत्यंत महत्वाची निवडणूक असेलल्या आगामी मुंबई महापालिकेसाठी भाजपच्या कार्यकर्त्यासाठी हा निकाल मोठा उत्साह वाढवणारा असणार आहे.

Devendra Fadnavis, ravindra chavan
Kolhapur Nagarpalika Mayor: कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीचा डंका! 11 नगराध्यक्ष विजयी; मविआकडून 'यांना' संधी

रविंद्र चव्हाण काय म्हणाले?

नगपरिषदांमध्ये सर्वाधिक नगराध्यक्ष निवडून आल्यानं भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी प्रतिक्रिया देताना मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीचं कौतुक केलं आहे. चव्हाण म्हणाले, ट्रेननं जाताना सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा ठरवलं होतं की, एसी ट्रेन, थंडगार हवा, त्याच पैशात. याचा अर्थ लक्षात घ्या एक अपघात आणि त्या अपघातावरुन हा दूरदृष्टी असलेला नेता कशा पद्धतीनं विचार करतो. याचा विचार मुंबई आणि महाराष्ट्रातील जनता शंभर टक्के करते. त्यामुळं या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळात महाराष्ट्राला दिशा देणार आहे.

Devendra Fadnavis, ravindra chavan
Sinnar Election Result : सिन्नरमध्ये खासदार वाजेंना धक्का, माणिकराव कोकाटेंचा 'विठ्ठल' विजयी

महाराष्ट्रातील तरुणाला जे त्यांच्या मनात आहे जो त्यांनी विचार केला आहे, त्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र बनवायचा असेल तर फडणवीसांच्या नेतृत्वात महायुतीबरोबर महाराष्ट्रातील जनता शंभर टक्के पुन्हा एकदा राहणार यात काही शंका नाही. पुन्हा एकदा जाता जाता सांगतो की, तुम्ही दिलेल्या विजयाचा सन्मान करत, आभार मानत तुम्ही आमच्याकडून जी अपेक्षा केली आहे, ती देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात आम्ही पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध राहू हेच या प्रसंगी सांगतो, असंही यावेळी रविंद्र चव्हाण म्हणाले. नगर परिषद झाँकी है, मुंबई महापालिका बाकी है, हा संकल्प यातून केला गेला असल्याचा नारा यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी दिला.

Devendra Fadnavis, ravindra chavan
Mangalvedha Result : मंगळवेढ्यात भाजप आमदाराला काकाने चारली धूळ; नगरपरिषदेत सत्ता, पण नगराध्यक्षपद गेले...

महायुतीचा डंका

दरम्यान, महाराष्ट्रातील एकूण २८८ नगराध्यक्षपदांच्या जागांसाठी झालेल्या निवडणुकीत १२० जागा भाजपला, ५४ जागा शिवसेनेला, ४० जागा राष्ट्रवादीला म्हणून भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी या महायुतीला एकूण २१४ जागांवर नगराध्यक्ष आघाडीवर आहेत. तर दुसरीकडं काँग्रेस ३४, शरद पवारांची राष्ट्रावादी ७ आणि ठाकरेंची शिवसेना ८ जागांवर आघाडीवर आहे. म्हणजेच महाविकास आघाडी एकूण ४९ जागांवर आघाडीवर आहे. तर इतर आघाडीचे २५ जागांवर नगराध्यक्ष आघाडीवर आहेत. त्यामुळं नगराध्यक्षपदांचं बलाबल पाहता महायुती ही महाविकास आघाडीच्या बरीच पुढे असून १२० पैकी १०० जागांवर आधीच भाजपाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com