Tushar Doshi News : आंदोलकांना मारहाण करणं पोलीस अधीक्षकाच्या अंगलट ;गृहविभागाने पाठवलं सक्तीच्या रजेवर

Maratha Andolan : गृहविभागाने त्यांच्या सक्तीचा रजेच्या आदेश काढला आहे.
 Maratha Andolan
Maratha Andolan Sarkarnama
Published on
Updated on

Jalna : मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज केल्यावरुन विरोधकांनी सत्ताधारी शिंदे-फडणवीस-पवार सरकारला धारेवर धरलं आहे. या प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. जालन्याचे पोलीस अधिक्षक तुषार दोशी यांना याप्रकरणात सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. गृहविभागाने त्यांच्या सक्तीचा रजेच्या आदेश काढला आहे.

बुलढाण्यातील शासन आपल्या दारी कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदेंनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, "मी तीन दिवसांपूर्वीच मी मनोज जरांगेंसोबत बोललो होतो. त्यांच्याशी बैठकाही झाल्या होत्या, त्यांच्या मागण्यांवर काम सुरू झालं होतं. पण नको ती घटना घडली. या घटनेनंतर पोलीस अधिक्षक तुषार दोशींना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. त्यांच्यासोबतच्या दोन पोलीस अधिकाऱ्यांची बदली जिल्ह्याच्या बाहेर करण्यात आली आहे,"

 Maratha Andolan
Eknath Shinde News : मराठा आरक्षणाचा ज्यांनी गळा घोटला तेच गळा काढायला आले होते.. ; मुख्यमंत्र्यांचा अशोक चव्हाणांवर घणाघात

"उद्या (सोमवारी) मुंबईतून वरिष्ठ पोलीस अधिकारी या घटनेची चौकशी करण्यासाठी जालन्यात येणार आहेत. चौकशीत जे दोषी आढळतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, कोणालाही पाठीशी घालणार नाही.या घटनेत राजकारण करू नये, आंदोलकांनी राजकीय पोळी भाजणाऱ्यांच्या बळी पडू नका, हे सरकार तुमचं आहे," असे मुख्यमंत्री म्हणाले.

 Maratha Andolan
Buldhana Maratha Andolan : "एक मराठा लाख मराठा' घोषणा देत राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांकडून आत्मदहनाचा प्रयत्न

"जालन्यातील घटना दुर्दैवी आहे. ही घटना कशामुळे झाली, हे शोधण्यासाठी काही लोक येऊन गेले. ज्या लोकांनी आरक्षणाचा गळा घोटला तेच याठिकाणी गळा काढायला आले होते," असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर घणाघात केला."अशोक चव्हाणजी, तुम्ही तर मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष होता, तुम्ही मराठा आरक्षणासाठी काय केले ? या आरक्षणासाठी तुम्ही काहीही केले नाही, याचा मी साक्षीदार आहे," असा आरोप मुख्यमंत्री शिंदेंनी केला आहे.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com