Buldhana : अरे.. रे.. रे...शिवसेनेचे एक संजय दुसऱ्या संजयबद्दल हे काय बोलून गेले...

Shiv Sena : आमदार संजय गायकवाड यांचे खासदार संजय राऊतांबद्दल आक्रमक विधान
MLA Sanjay Gaikwad & MP Sanjay Raut.
MLA Sanjay Gaikwad & MP Sanjay Raut.Google
Published on
Updated on

Sanjay Gaikwad On Sanjay Raut : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नालायक म्हणणारे लोकच नालायक आहेत. शिंदे हे खऱ्या अर्थानं नायक आहेत. मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांनी प्रत्येक दिवशी कोणता ना कोणता क्रांतिकारक निर्णय घेतलाच आहे. नालायक लोकांना ते दिसत नाही, अशी टीका बुलडाण्याचे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केली.

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यासंदर्भात आमदार गायकवाड यांना विचारणा करताच त्यांनी अत्यंत आक्रमकपणे राऊतांबद्दल टिप्पणी केली. गायकवाडांच्या या टिप्पणीमुळं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Buldhana Shiv Sena Eknath Shinde Group MLA Sanjay Gaikwad Offensive Words About Uddhav thackeray Groups MP Sanjay Raut)

MLA Sanjay Gaikwad & MP Sanjay Raut.
Buldhana : कर्मचाऱ्यांची रक्कम अडवली, हायकोर्टानं एसटीचं कार्यालयच केलं सील

एका कार्यक्रमाच्या निमित्तानं बुलडाणा येथे आमदार संजय गायकवाड प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. या वेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं तोंडभरून कौतुक केलं. एकनाथ शिंदे किती सक्षम नेते आहेत, याचा त्यांनी पाढाच वाचला. त्यांनी घेतलेल्या एकएक निर्णयाची ते आठवण करून देत होते. चित्रपटातील अभिनेता केवळ रूपेरी पडद्यावरील नायक होता. परंतु शिंदे हे खऱ्या अर्थानं जनतेचे नायक आहेत, असं गायकवाड यांनी सातत्यानं नमूद केलं.

उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यासंदर्भात पत्रकारांनी विचारणा करताच आमदार संजय गायकवाड यांनी आक्षेपार्ह शब्दांचा वापर करीत त्यावर भाष्य करणं टाळलं. ‘अरे काय त्या पागलच्या नादी लागता...’ असं आक्रमकपणे सांगत त्यांनी राऊत यांच्यावर तिखट प्रहार केला. मुख्यमंत्र्यांवर टीका करणाऱ्यांना एकनाथ शिंदे यांच्या नावानं काविळ झालीय. त्यांना सगळं जगच पिवळं दिसतंय, अशी टीकाही आमदार गायकवाड यांनी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पाच राज्यांमधील विधानसभा निवडणूक होत आहे. 3 डिसेंबरला त्याचा निकाल लागणार आहे. घोडा मैदान दूर नाही. निकाल लागल्यानंतर कोण किती पाण्यात आहे, हे कळेलच. काही राज्यांमध्ये मतदार एकाच पक्षाचं सरकार निवडून देत नाहीत. तो त्या राज्याचा ट्रेंड असतो. त्यामुळं एखाद्या राज्यात किंवा मतदारसंघात परिवर्तन दिसलं तर आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी मुसंडी मारेल हे नक्की आहे, असा दावाही आमदार संजय गायकवाड यांनी केला.

महाराष्ट्रात शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचं सरकार चांगलं काम करीत आहे. जनता सरकारच्या पाठीशी उभी आहे. आगामी काळातही जनतेचे आशीर्वाद महायुतीला मिळतील, असा विश्वासही आमदार गायकवाड यांनी व्यक्त केला.

Edited by : Prasannaa Jakate

MLA Sanjay Gaikwad & MP Sanjay Raut.
MLA Sanjay Gaikwad : एकेकाला तोडल्याशिवाय राहणार नाही; संजय गायकवाड भडकण्याचं कारण काय ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com