Protest : विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवर एसटी महामंडळाची बस जाळली

Investigation on : यवतमाळातील घटना; पैनगंगेवरील पुलाच्या मधोमध पेट्रोल टाकत लावली आग
Bus set on fire in Yavatmal
Bus set on fire in YavatmalSarkarnama
Published on
Updated on

Yavatmal Bus Fire : विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवरील यवतमाळ जिल्ह्यात असलेल्या उमरखेड येथील पैनगंगा नदीच्या पुलावर अज्ञात सात ते आठ युवकांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस अडवित तुफान तोडफोड केली. इतक्यावरील हल्लेखोर थांबले नाही, तर त्यांनी पेट्रोल टाकत बस पेटवून दिली. आगीमुळे बस पूर्णत: खाक झाली आहे. हल्लेखोरांनी पुलाच्या मधोमध आल्यानंतर ही बस अडविली. घटनेत सुमारे ३२ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचं एसटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यवतमाळ- नांदेड - नागपूर ही नांदेड आगाराची रातराणी बस क्रमांक एम. एच. २० | सीजी ३१८९ प्रवाशांना घेऊन मार्गस्थ होती. शुक्रवारी (ता. २७) रात्री साडेअकरा ते बाराच्या सुमारास ही बस उमरखेड- हदगावजवळील पैनगंगा नदीच्या पुलावर पोहोचली. बस पुलाच्या मधोमध आली, त्यावेळी मराठवाड्याकडील गोजेगांवकडून सात ते आठ युवक बसच्या पाठीमागून आले व त्यांनी बस थांबविली. (Bus of ST Corporation burnt on Vidarbha-Marathwada border)

सुरुवातीला या युवकांनी प्रवाशांना धमकावत खाली उतरविले. त्यानंतर बसच्या काचा फोडल्या. काहींनी बसवर पेट्रोल ओतले व आग लावली. त्यानंतर हल्लेखोर पळून गेले. बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केल्याचे बसचे चालक बापूराव नाईकवाडे ( वय ४२, रा. पानभोसी ) आणि वाहक शिवाजी वाघमारे यांनी पोलिसांना सांगितले. हल्लेखोर २४ ते २५ वयोगटातील असल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. रात्रीची वेळ असल्याने व धोका लक्षात घेत बसमधील कुणीही हल्लेखोरांना प्रतिकार करण्यासाठी धजावला नाही. बराच वेळपर्यंत बस आगीच्या ज्वाळांमध्ये धगधगत होती व प्रवासी भीतीने थरथर कापत होते. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या व लोक नेमका प्रकार काय आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करीत होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

घटनेची माहिती मिळताच उमरखेड पोलिसांनी पैनगंगा नदीच्या पुलाकडे धाव घेतली. उमरखेड नगरपालिकेचा अग्निशमन बंबही घटनास्थळाकडे रवाना करण्यात आला. अग्निशमन दलाने घटनास्थळ गाठत आग विझविली. आग विझल्यानंतर पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने बस रस्त्याच्या कडेला आणली. पुलावरून बस हटविण्यात यश मिळाल्यानंतर पहाटे तीन वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी खुला झाला.

या प्रकरणी चालक बापूराव नाईकवाडे यांनी नोंदविलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला. घटनेचा अहवाल हदगाव एसटी आगाराचे प्रमुख धर्माधिकारी यांनी एसटी महामंडळापर्यंत पोहोचविला आहे. पोलिस उपअधीक्षक

प्रदीप पाडवी, पोलिस निरीक्षक शंकर पांचाळ, पोलिस उपनिरीक्षक किशोर घोडेस्वार करीत आहेत. हल्लेखोरांनी नेमक्या कोणत्या कारणांमुळे बस पेटविली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. ते जोपर्यंत पकडले जात नाही, तोपर्यंत ठामपणे घटनेमागील कारण सांगता येणार नाही, असं पोलिसांनी स्पष्ट केलं.

(Edited by : Prasannaa Jakate)

Bus set on fire in Yavatmal
Yavatmal Crime Story : नाचण्यावरून माजी आमदाराच्या चालकाची सटकली, रागाच्या भरात त्याने सुरीच भोसकली

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com