Yavatmal Crime Story : नाचण्यावरून माजी आमदाराच्या चालकाची सटकली, रागाच्या भरात त्याने सुरीच भोसकली

Yavatmal Latest News : यवतमाळच्या आर्णीतील भाजी मंडीत थरार
Ajay Tighalwad
Ajay TighalwadSarkarnama
Published on
Updated on

Yavatmal Crime News : डीजेच्या तालावर नाचण्याच्या वादातून माजी आमदाराच्या चालकाचे डोक भडकल्याने त्याने चाकूचा वार करीत २५ वर्षीय युवकाची चाकूने भोसकून हत्या केली. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथील भाजीमंडी परिसरात ही थरारक घटना घडली. पोलिसांनी या प्रकरणी खून करणाऱ्या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. (Former MLA's driver killed youth for dancing)

भाजीमंडी परिसरात रात्री दहाच्या सुमारास कोळवन येथील २५ वर्षीय अजय अवधूत तिघलवाड, जतीन दीपक पुट्टावार (वय २२), प्रतीक तिघलवाड हे तिघेही दुचाकीने जात होते. त्यांच्या मागावर असलेले दत्ता वानखडे आणि त्याचा साथीदार ओम बुटले हे दोघे त्यांच्या दुचाकीने तेथे आले. त्यांनी अजयच्या दुचाकीला लाथ मारली व त्यांना खाली पाडले. काही कळण्यापूर्वीच दत्ताने अजयला पकडून चाकूने सपासप वार केले.

अजय रक्ताच्या थारोेळ्यात पडल्यानंतर दोघेही आरोपी फरार झाले. मित्रांनी अजयला दुचाकीने ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र, डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. ही माहिती गावात पसल्यानंतर ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात गर्दी जमली.

घटनेची माहिती मिळताच आर्णी पोलिस स्टेशनचे ठाणेदार केशव ठाकरे, पोलिस उपनिरीक्षक चंदन वानखडे, पोलिस उपनिरीक्षक बाबाराव पवार, जमादार मुकुंद केंद्रे ,जमादार नफिस शेख हे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. मारेकऱ्यांचा शोध पोलिसांनी सुरू केला. रात्री सुमारे तीन वाजता या प्रकरणी दीपक पुट्टावार (वय २२) याने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदविला. अपर पोलिस अधीक्षक पीयूष जगताप, उपविभागीय पोलिस अधिकारी आदित्य मिरखेलकर यांनी ग्रामीण रुग्णालयात जाऊन मृतक अजयच्या मित्रांकडून व नातेवाइकांकडून माहिती घेतली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

प्रकरण गंभीर असल्यानं स्थानिक पोलिस पथक व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळचे पथक रात्रीच आर्णीत दाखल झाले. रात्रभर पोलिसांनी शोध मोहीम राबविली. त्यानंतर सकाळी दहा वाजता दोन आरोपींपैकी दत्ता वानखडे याला भानसरा जंगल शिवारातून अटक करण्यात आली. दत्ता हा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते तथा आर्णी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार श्रीकांत मुनगीनवार यांचा चालक असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील माहुर चौकात रात्री आठ ते नऊच्या सुमारास अजय व दत्ता यांच्यात नाचण्याच्या कारणावरून वाद झाला होता. काही लोकांनी त्यांचा वाद मिटवला. तेथून त्यांना दुसरीकडे नेण्यात आले. मात्र, दत्ताने याचा राग मनात ठेवत अजयचा पाठलाग केला. त्यानंतर धारदार चाकूने वार करीत त्याचा खून केला.

(Edited by : Prasannaa Jakate)

Ajay Tighalwad
Yavatmal Crime : भाजपच्या बड्या नेत्यांशी ‘ती’ची जवळीक असली; पण ‘पोक्सो’त फसली !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com