Crime News : 'अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही!', 'त्या' व्हिडिओने खळबळ

Akola BJP : बार्शिटाकळी येथील साहिल अग्रवाल नामक व्यक्तीचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला. त्या व्हिडिओमध्ये बार्शिटाकळी येथील पदाधिकाऱ्यांनी लोकसभा निवडणुकीत पक्षाकडून पैसे घेत दुसऱ्या एका पक्षाचे काम केल्याचा आरोप केला होता.
Crime News
Crime Newssarkarnama

योगेश फरपट

Akola Loksabha : ‘मी बीजेपीचा कार्यकर्ता बोलत आहे. अनुपजी तुम्ही बीजेपीचे जे पैसे वाटपासाठी दिले होते. ते कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचले नाही’ असे बोलणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. याप्रकरणी भाजप शहराध्यक्ष प्रविण घाईट यांच्या तक्रारीवरुन व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या युवकाविरुद्ध पोलिसांनी Police आचारसंहिता भंग करण्यासह विविध गुन्हे दाखल केले आहेत.

Crime News
Ravikant Tupkar News :शिंदे गटाच्या आमदाराची 'तुपकरांची शिकार करू' ही धमकी; गृहमंत्रालयाचा मोठा निर्णय

बार्शिटाकळी येथील साहिल अग्रवाल नामक व्यक्तीचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर social media व्हायरल झाला. त्या व्हिडिओमध्ये बार्शिटाकळी येथील पदाधिकाऱ्यांनी लोकसभा निवडणुकीत पक्षाकडून पैसे घेत दुसऱ्या एका पक्षाचे काम केल्याचा आरोप केला होता. त्याचबरोबर पक्षासाठी आलेला निधी कार्यकर्त्यांना वाटप केला नसल्याचा दावा केला होता.

या व्हिडिओने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. व्हिडिओमधील तरुण स्वतःचे नाव साहील अग्रवाल (रा. बार्शिटाकळी) असे सांगत असून ‘मी बीजेपीचा कार्यकर्ता असल्याचे बोलत आहे. अनुपजी Anup Dhotre तुम्ही बीजेपीचे जे पैसे वाटपासाठी दिले होते. ते कार्यकत्यापर्यंत पोहोचले नाही. ते बीजेपीचे ज्येष्ठ नेत्यांनी हे पैसे खाल्ले असल्याचा आरोप केला आहे. या व्हिडिओतून करण्यात येतो आहे.

बार्शिटाकळी पोलिस ठाण्याचे प्रमुख ठाणेदार शिरिष खंडारे यांनी सांगितले,बदनामीकारक व्हीडिओ व्हायरल करण्यासोबत शिविगाळ व अन्य प्रकाराबाबत भाजप शहराध्यक्ष प्रविण घाईट यांनी तक्रार दिली आहे. स्वतःचे खोटे नाव सांगून या युवकाने व्हिडीओ तयार करीत भाजपची बदनामी केली. अशा तक्रारीवरून बार्शिटाकळी पोलिस ठाण्यात गुन्हयाची नोंद करण्यात आला आहे.

बार्शिटाकळीत पंजा चालला ...

‘मी तुम्हाला सांगतो, तुम्ही या इलेक्शनमध्ये पडणार आहात. कारण इथे पूर्ण पंजा चालविला आणि बीजेपीचे जे लोक आहेत ‘कुचिन’ आहेत. यांनी पैसे खाल्ले आहेत, असे व्हिडिओ क्लिपमध्ये व्यक्ती बोलताना दिसत आहे. विहीडिओमध्ये स्वतःचे नाव साहिल अग्रवाल सांगत असलेला व्यक्तीचे खरे नाव सुनिल दयाराम भगत (रा. तेली पुरा, बार्शिटाकळी) असे आहे. त्याच्या विरोधात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजपा शहराध्यक्षाची तक्रार

लोकसभा निवडणुकीमुळे आचार संहिता लागू असून भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे. भाजपाविरुद्ध आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून आचार संहितेचा भंग करण्यासोबत भाजपच्या पदाधिकाऱ्यांना शिविगाळ करून पक्षाची व पदाधिकाऱ्यांची जाहीर बदनामी केल्यामुळे आमची व पक्षाची बदनामी झाली आहे, अशी तक्रार भाजप शहर अध्यक्ष प्रविण घाईट यांनी बार्शिटाकळी पोलिसात दिली आहे. यावरून सुनिल दयाराम भगत उर्फ साहिल अग्रवाल याच्याविरुद्ध आचारसंहितेचा भंग करण्यासोबत विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

(Edited By Roshan More)

Crime News
Bjp New Mumbai Party Leader News : नरेश म्हस्केंना उमेदवारी;ठाण्यात 65 भाजप पदाधिकार्‍यांचे राजीनामे; CM शिंदेंवरही आरोप

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com