Anup Dhotre : धोत्रेंच्या घराणेशाहीवर टीका करत नारायण गव्हाणकरांचा 'विड्राॅल'

BJP Politics : पहाटे 2 वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, श्रीकांत भारतीय यांच्या फोननंतर भाजप नेते नारायण गव्हाणकर यांनी अकोल्यातून अर्ज मागे घेतला.
Narayan Gavankar, Anup Dhotre
Narayan Gavankar, Anup DhotreSarkarnama
Published on
Updated on

Akola Lok Sabha Election 2024 : अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपची डोकेदुखी थोडी कमी झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांचा पहाटे फोन आल्यानंतर भाजपचे ज्येष्ठ आमदार नारायण गव्हाणकर यांनी दुपारी उमेदवारी अर्ज मागे घेतला. पण, केवळ पाच हजार मते नारायण गव्हाणकरांना भेटतील, असा दावा करणाऱ्या भाजप नेत्यांचा राग मनात ठेवत गव्हाणकर यांनी अर्ज मागे घेतल्याची माहिती समोर आली आहे. पुन्हा एकदा समाजाची बैठक पुढील काही दिवसांत होणार असून, त्यात कोणाला पाठिंबा द्यावा, यावर विचारमंथन निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

ओबीसींचे नेते म्हणून ओळख असलेल्या नारायण गव्हाणकर यांचे बंड थंड करण्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यश आले आहे. पण, पाच हजार मते गव्हाणकर घेतील, अशी टीका हेटाळणी करणाऱ्या भाजप नेत्यांना गव्हाणकर काय धडा शिकवितात हे पाहण्यासारखे असेल. यात अकोलेकर जनता नारायण गव्हाणकर यांच्या हाकेला आता साथ देतील काय हेदेखील येणारा काळ ठरवेल. (राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Narayan Gavankar, Anup Dhotre
Prakash Ambedkar News : अकोला लोकसभेबाबत मोठी अपडेट; आंबेडकरांना मिळालं 'हे' चिन्ह

अकोला लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचे, राज्याचे लक्ष आहे. त्यात अकोल्यात वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात काँग्रेसने उमेदवार दिला आहे. वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांची थेट लढत काँग्रेस नेते डाॅ.अभय पाटील यांच्या विरोधात आहे. असे असताना या दोघांमध्ये जोरदार पक्षीय पातळीवर वाद सुरू असताना भाजप नेतेदेखील शांत नव्हते. भाजप नेते नारायण गव्हाणकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना विद्यमान खासदार संजय धोत्रे यांच्या मुलाला तिकिट दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. इतक्यावर गव्हाणकर थांबले नाही तर त्यांनी जाहिरपणे भाजप च्या घराणेशाहीवर टीका केली.

अनुप धोत्रे हे अत्यंत नवखे उमेदवार असून, त्यांनी साधी ग्रामपंचायत, महापालिका नगरसेवक पदाचीदेखील निवडणूक लढविली नाही. त्यांना थेट उमेदवारी देत भाजपने घराणेशाहीचा कित्ता गिरविल्याचा आरोप नारायण गव्हाणकर यांनी उमेदवारी दाखल करताना आणि आज विड्राॅल करताना केला. गव्हाणकर यांचे धोत्रे यांच्या घराण्यात तिकीट का दिले, यावर राग असून, त्यांनी तो आज पुन्हा अर्ज मागे घेतल्यावर कायम ठेवला. त्यात भाजपच्या एका नेत्याने वरिष्ठांना 'नारायण गव्हाणकर फक्त पाच हजार मते घेतील,' असे म्हणत हेटाळणी केली, त्यांची खिल्ली उडवली. पण, भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवारी मागे घेण्याचे पहाटे 2 वाजता सांगितल्याने व त्यांचा आदेश पाळणार असल्याने गव्हाणकर यांनी दुपारी त्यांचा अर्ज मागे घेतला. या सर्व घडामोडीनंतर ओबीसी नेत्यांची आणि समाजाची बैठक होणार असून, त्यात कोणाला पाठिंबा द्यायचा याचा निर्णय होणार आहे. लोकसभा निवडणुकीतुन गव्हाणकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला असला तरी त्यांच्या ओबीसी आणि घराणेशाही या दोन विषयांवर भाजपसमोर संघर्षाची स्थिती आहे.

अकोल्यात वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांना प्रेशर कुकर चिन्ह आज मिळाले. काँग्रेस नेते डाॅ. अभय पाटील यांच्यावर वंचित नेत्यांनी राष्ट्रीय संघाचे कार्यकर्ते, विश्व हिंदू परिषदेचे नेते असा प्रचार करत त्यांच्या विरोधात रणशिंग फुंकले आहे. पण, डाॅ. पाटील यांनी वंचितच्या या टीकेकडे दुर्लक्ष करत भविष्याच्या विकासावर फोकस करत मतदारांनी मते द्यावीत, असा आग्रह धरला आहे. आज अर्ज मागे घेण्याच्या दिवशी सर्वच पातळीवर राजकीय घडामोडींना वेग आला होता.

R

Narayan Gavankar, Anup Dhotre
Prakash Ambedkar News : आंबेडकरांना महाविकास आघाडी झटका देणार की तारणार? पवारांची भूमिका ठरणार निर्णायक

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com