Buldhana Lok Sabha News : लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला असताना मतदानाचे दोन टप्पेही पूर्ण झाले आहेत.एकीकडे आरोप- प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण तापलं असतानात शेतकरी नेते आणि बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर व शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यात वादाची ठिणगी पडली होती.हा वाद इतका टोकाला गेला की,गायकवाडांनी तुपकरांना थेट धमकी देताना शिकार करू असंही म्हटलं. आता याच धर्तीवर तुपकरांना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे.
रविकांत तुपकर यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बुलढाणा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. त्यांनी शेतकरी मुद्द्यांवरुन त्यांनी रान उठवले आहे.त्यातच आता शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) आणि तुपकरांमध्ये काही दिवसांपूर्वी सोशल मीडिया वॉर भडकले होते. त्यात तुपकरांची शिकार करू अशी धमकी देखील दिली होती. त्यानंतर आपल्यासह कुटुंबियांच्या जीवाला धोका असल्याचे पत्र पोलिस अधीक्षकांना दिले होते.त्यानंतर सरकारने जिल्हा पोलिस अधीक्षकांना तुपकर यांना तातडीने संरक्षण देण्याचे आदेश दिले आहेत.(Buldhana Loksabha Election 2024)
आता रविकांत तुपकर यांना मंगळवारी (ता. 30) याबाबतचा आदेश प्राप्त झाला आहे. बुधवारपासून त्यांच्या संरक्षणासाठी एक सशस्त्र पोलीस कर्मचारी तैनात असणार आहे. यापूर्वीही अनेकदा बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर व शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यातील वादाने टोक गाठले आहे.
रविकांत तुपकर यांनी पोलिस अधीक्षकांना पत्र दिले होते.त्यावरून तुपकर व त्यांच्या कुटुंबीयांच्या जीवाला धोका असल्याचा अहवाल पोलिस अधीक्षकांमार्फत गृहमंत्रालयाला पाठवण्यात आला होता. यानंतर गृहमंत्रालयाकडून या अहवालाची व तुपकरांच्या पत्राची दखल घेत तुपकरांसह कुटुंबियांना पोलिस संरक्षण देण्याचे निर्देश दिले होते.
बुलढाणा लोकसभेचा प्रचार संपायला दहा मिनिटे उरलेले असताना अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी शेगाव येथील सभेत आमदार संजय गायकवाड यांच्यावर सडकून टीका केली होती. आमदार गायकवाड यांनी एका महिलेची जमीन बळकावल्याचा उल्लेखही त्यांनी यामध्ये केला होता.त्यानंतर तुपकर यांनी शेगावच्या सभेत केलेल्या टीकेवर सोशल मीडियाच्या माध्यमातून एका व्हिडिओद्वारे आमदार संजय गायकवाड यांनी नाव न घेता अप्रत्यक्षपणे तुपकर यांच्या थेट शिकारीची भाषा केल्याने संपूर्ण वातावरण तापले आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.