Chandrakant Bawankule Won: हुश्श...!बावनकुळेंनी बालेकिल्ला परत मिळवलाच, भाजप कार्यकर्त्यांची धाकधूक संपली

Maharashtra Assembly Election 2024 : देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात बावनकुळे ऊर्जामंत्री होते. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर भाजपने विधान परिषदेत पाठवून त्यांचे राजकीय पुनर्वसन केले होते. याशिवाय प्रदेशाध्यक्ष करून त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली होती.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : कामठी विधानसभा मतदारसंघातून भाजचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) जिंकल्याने भाजप कार्यकर्त्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. पहिल्या पाच फेऱ्यांमध्ये ते मागे पडले होते. काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश भोयर यांनी तब्बल 17 हजारांचे मताधिक्य घेतल्याने कार्यकर्त्यांचे टेंशन वाढले होते. Maharashtra Election Assembly 2024 Result news

मात्र, सहाव्या फेरीपासून चक्र फिरले. बावनकुळे आघाडीवर आले आणि शेवटच्या फेरीपर्यंत नंतर त्यांनी मागे वळून बघितले नाही. ते तब्बल 39 हजार 680 मतांनी विजयी झाले आहे. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

कामठी विधानसभा मतदारसंघ बावनकुळे यांनी बांधून ठेवला होता. २०१९च्या निवडणुकीत त्यांना भाजपने थांबवले होते. याचा फोटा फटकाही भाजपला इतर मतदारसंघात बसला होता. बावनकुळे यांच्या ऐवजी उमेदवारी दिलेले टेकचंद सावकर हे निवडणूक आले होते. मात्र त्यांचे मताधिक्य दहा हजाराच्या आतच होते. बावनकुळे यांच्या विकास कामांच्या पुण्याईने ते थोडक्यात बचावले होते.

Chandrashekhar Bawankule
Maharashtra Assembly Election 2024 Result live Vote Counting : महाराष्ट्राने घराणेशाहीला नाकारलं, विभाजनवादी शक्तींचा पराभव - मोदी

भाजपने (BJP) यावेळी पुन्हा बावनकुळे यांना उमेदवारी दिली. त्यांच्या विरोधात काँग्रेसने सुरेश भोयर यांना कामठीत उतवले होते. कामठी विधानसभा तमदारसंघातील कामठी शहरात मुस्लिम आणि दलित मतांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या शहरातून काँग्रेसला मोठे मतदान झाल्याची चर्चा कालपर्यंत होती. सुमारे चाळीस हजार मतांचा फटका येथून भाजपला बसले आणि तो भरून काढणे अशक्य असल्याचे भाजपच्याच कार्यकर्त्यांचे म्हणणे होते.

सुरुवातीच्या फेऱ्यांमधून आलेली मते बघता कार्यकर्त्यांची भीती आणखीच वाढली होती. सुरेश भोयर यांची जवळपास 17 हजारांचे मताधिक्य घेतले होते. त्यामुळे सर्वांचीच धाकधूक वाढली होती. बावनकुळे यांनी सर्वांवर मात केली आणि मोठ्या फरकांनी ते निवडून आले.

Chandrashekhar Bawankule
Solapur Politic's : काकांच्या स्वप्नाचा चक्काचूर; पुतण्या पहिल्याच निवडणुकीत पोचला विधानसभेत!

देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात बावनकुळे ऊर्जामंत्री होते. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर भाजपने विधान परिषदेत पाठवून त्यांचे राजकीय पुनर्वसन केले होते. याशिवाय प्रदेशाध्यक्ष करून त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली होती. आता पुन्हा फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com