Solapur Politic's : काकांच्या स्वप्नाचा चक्काचूर; पुतण्या पहिल्याच निवडणुकीत पोचला विधानसभेत!

Assembly Election 2024 : महेश कोठे यांचे आमदारकीचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले असून त्यांचे पुतणे देवेंद्र कोठे हे भाजपच्या तिकिटावर पहिल्याच निवडणुकीत विधानसभेत पोचले आहेत.
Mahesh Kothe-Devendra kothe
Mahesh Kothe-Devendra kothe Sarkarnama
Published on
Updated on

Solapur, 23 November : विधानसभा निवडणुकीत सोलापुरात अनेकांची स्वप्नपूर्ती झाली असून अनेकांना अपयशाला सामोरे जावे लागले आहे. कोठे घराण्यातील महेश कोठे आणि त्यांचे पुतणे देवेंद्र कोठे एकाच वेळी विधानसभेच्या रणांगणात उतरले होते. कोठे घराण्याची आमदारकीची स्वप्नपूर्ती होणार आणि कोठे काका-पुतणे एकाच वेळी विधानसभेत पोचतील, असा दावा समर्थकांकडून केला जात होता. मात्र, महेश कोठे यांचे आमदारकीचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले असून त्यांचे पुतणे देवेंद्र कोठे हे भाजपच्या तिकिटावर पहिल्याच निवडणुकीत विधानसभेत पोचले आहेत.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल Latest Update

सोलापुरातील कोठे घराणे काँग्रेसचे विशेषतः ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जात होते. शिंदेंच्या सोलापुरातील राजकीय वर्चस्वात कोठे यांच्या निवडणुक रणनीतीचा मोठा वाटा होता. त्यामुळे सुशीलकुमार शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर (स्व.) विष्णुपंततात्या कोठे यांना खासदारकीचे तिकिट मिळेल, असा अनेकांचा होरा होता. मात्र, कोठे यांना संधी मिळालीच नाही. पुढे काँग्रेसकडून महेश कोठे यांना २००९ मध्ये सोलापूर शहर उत्तरमधून तिकिट मिळाले होते. मात्र, त्यात त्यांचा मित्रपक्ष राष्ट्रवादीच्या उमेदवारामुळे पराभव झाला होता.

काँग्रेसमध्ये राहून आपले आमदारकीचे स्वप्न पूर्ण होणार नाही, हे लक्षात आल्यानंतर माजी महापौर महेश कोठे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेकडून त्यांनी २०१४ मध्ये सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, त्या निवडणुकीत ते तिसऱ्या स्थानावर राहिले. त्यानंतर पुढील २०१९ च्या निवडणुकीत त्यांना शिवसेनेने तिकिट नाकारले, त्यामुळे ते अपक्ष लढले. त्याही निवडणुकीत ते तिसऱ्याच स्थानावर राहिले होते.

Mahesh Kothe-Devendra kothe
Vijaykumar Deshmukh : विजयकुमारांनी उधळले महेश कोठेंचे स्वप्न; पाचव्यांदा गुलाल उधळत देशमुखच ठरले सोलापूर शहर उत्तरचे 'मालक'

मागील तीन निवडणुकीतील अपक्ष विसरून महेश कोठे यांनी मागील वर्षभरापासून राष्ट्रवादी काँग्रेसमधून जोरदार तयारी केली होती. या निवडणुकीत महाविकास आघाडीतील सर्वच नेते कोठे यांच्या पाठीशी होते. मात्र, मतदारसंघ आणि पक्ष बदलूनही कोठे यांचे विधानसभेत पोचण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही.

दुसरीकडे, त्यांचे पुतणे देवेंद्र कोठे यांनी नियोजनपूर्वक पाऊल टाकली. लोकसभा निवडणुकीपूर्वी देवेंद्र कोठे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. लोकसभा निवडणुकीत यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभेत जहाल भाषण करत कट्टर हिंदुत्ववादी अशी स्वतःची प्रतिमा निर्माण केली आहे. त्यानंतरच्या काळात ही प्रतिमा अधिक कट्टर कशी होईल, हीच भूमिका देवेंद्र कोठे यांनी ठेवली होती.

Mahesh Kothe-Devendra kothe
Madha Election Vishleshan : माढ्यातील 30 वर्षांच्या शिंदेशाहीला पवारांच्या पठ्ठ्याने लावला सुरुंग

अनेक इच्छुकांचे अडथळे दूर करत देवेंद्र कोठे यांनी भाजपचे तिकिट मिळविले. त्यांना महायुतीमधील पक्षांचीही खंबीर साथ मिळाली. भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस हे या काळात देवेंद्र कोठे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. त्यातून कोठे घराण्याची आमदारकीची स्वप्नपूर्ती होण्यास मदत झाली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com