BJP leaders during Chandrapur municipal election preparations amid allegations of candidate list manipulation and internal party conflict.
BJP leaders during Chandrapur municipal election preparations amid allegations of candidate list manipulation and internal party conflict.Saekarnama

BJP News : महाराष्ट्रातील भाजप आमदाराच्या उद्योगाची दिल्लीपर्यंत तक्रार; सुधीरभाऊंना नडण्याच्या नादात स्वत:चाच बाजार उठवून घेतला?

Chandrapur BJP Internal Conflict : चंद्रपूर महापालिका निवडणुकीत भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिकृत उमेदवारी यादीत हस्तक्षेप केल्याचा आरोप असून, या प्रकरणाची थेट दिल्लीपर्यंत तक्रार झाल्याने भाजपमध्ये खळबळ उडाली आहे.
Published on

Chandrapur News : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या स्वाक्षरीने जाहीर झालेली उमेदवारांची अधिकृत यादी बदलण्याचा प्रताप आमदार किशोर जोरगेवार यांच्या चांगलाच अंगलट येण्याची शक्यता आहे. याप्रकरणात महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांचा बळी गेला असला, तरी या संपूर्ण कारस्थानामागे आमदार जोरगेवारच असल्याचे आता लपून राहिलेले नाही. यादी बदलवून त्यांनी थेट प्रदेशाध्यक्षांनाच आव्हान दिल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकाराची पक्षनेतृत्वाने गंभीर दखल घेतल्याचे सांगितले जात आहे.

चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत आपल्या समर्थकांना संधी मिळावी, यासाठी भाजप नेते आमदार सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर आणि स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांच्यात सुरुवातीपासूनच रस्सीखेच सुरू होती. याच कारणावरून नागपूरमधील बैठकीत शाब्दिक चकमकही झाली होती. अखेर सर्वेक्षणाच्या आधारे उमेदवार निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहमतीने तयार केलेली यादी घेऊन निवडणूक निरीक्षक खासदार चैनसुख संचेती हे 30 डिसेंबर रोजी चंद्रपूर येथील एनडी हॉटेलमध्ये दाखल झाले. यादीत मुनगंटीवार आणि अहीर समर्थकांची नावे जास्त होती. त्यामुळे आमदार जोरगेवार अस्वस्थ झाले. त्यांनी थेट माध्यमांसमोर येत अजय सरकार आणि पूजा पोतराजे यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेत प्रदेशाध्यक्षांनाच खुले आव्हान दिले.

इतकेच नव्हे, तर आपल्या मर्जीतील उमेदवारांना आधीच एबी फॉर्म पोहोचते करण्यात आले, तर उर्वरित उमेदवारांच्या एबी फॉर्ममध्ये जाणीवपूर्वक घोळ घालण्यात आला. एकाच प्रभागात दोन ते तीन एबी फॉर्म देण्यात आले. त्यातही अहीर व मुनगंटीवार समर्थक उमेदवारांना शेवटच्या क्षणी एबी फॉर्म देण्यात आले. पूजा पोतराजे यांच्या उमेदवारीला विरोध करताना माजी नगरसेविका चंद्रकला सोमय्या यांच्यावर अन्याय झाल्याचा टाहो जोरगेवारांनी फोडला. मात्र, प्रत्यक्षात एबी फॉर्म आधीच आशा देशमुख यांना देण्यात आला होता.

हा सारा खेळ जाणीवपूर्वक खेळण्यात आल्याचे आता स्पष्ट झाले आहे. यात मागील 15-20 वर्षांपासून पक्षासाठी झटणाऱ्या जवळपास 17 कार्यकर्त्यांचा राजकीय बळी गेला. या गंभीर प्रकाराची दखल घेत पक्षनेतृत्वाने महानगर अध्यक्ष कासनगोट्टूवार यांची विकेट घेतली. मात्र, प्रदेशाध्यक्षांच्या निर्णयाला बदलण्याइतकी उंची कासनगोट्टूवार यांची नसल्याचे सामान्य कार्यकर्त्यालाही माहिती आहे. त्यामुळे या प्रकरणामागील खरे सूत्रधार कोण, हे आता पक्षनेतृत्वाच्या लक्षात आले आहे.

BJP leaders during Chandrapur municipal election preparations amid allegations of candidate list manipulation and internal party conflict.
Nagpur Mahapalika : बंडखोरीमुळे पत्नी रुसून माहेरी गेली, पण पती रिलॅक्स : म्हणाले, "35 वर्षात गेली नव्हती, आता गेलीय तर आराम करेल"

जिल्ह्यात अहीर–मुनगंटीवार यांच्यातील मतभेद नेहमीच चार भिंतींच्या आत मर्यादित राहिले. मात्र, आमदार किशोर जोरगेवार यांनी थेट पक्षशिस्तीलाच सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला आहे. हाच प्रकार त्यांच्या भविष्यातील राजकीय वाटचालीस मोठा अडथळा ठरू शकतो, अशी चर्चा भाजप वर्तुळात सुरू आहे. याप्रकरणाची तक्रार थेट प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय अध्यक्षांकडे करण्यात आल्याची माहिती आहे. या संपूर्ण गोंधळाची माहिती मुंबई आणि दिल्लीतील भाजप कार्यालयांपर्यंत पोहोचल्याने आमदार जोरगेवार सध्या मुंबईत वरिष्ठ नेत्यांकडे स्पष्टीकरण देत फिरत असल्याचे समजते.

या दरम्यान, जोरगेवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली आहे. दरम्यान, निवडणूक निरीक्षक चैनसुख संचेती आणि निवडणूक प्रभारी अशोक नेते हेही या गोंधळाला तितकेच जबाबदार असल्याने त्यांच्यावरही शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. त्याचवेळी तो मी नव्हेच असे म्हणत जोरगेवार यांनी हात वर केले आहेत.

BJP leaders during Chandrapur municipal election preparations amid allegations of candidate list manipulation and internal party conflict.
Nagpur Politics : स्वबळावर उतरलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का : शिवसैनिकाने मतदानापूर्वीच नांगी टाकली; माघार घेऊन थेट शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश

महानगर जिल्हाध्यक्ष पदावरून कासनगोट्टूवार यांची हाकलपट्टी झाल्यानंतर त्यांनी आपला या सगळ्याशी संबंध नसल्याचे सांगितले आहे. एबीफार्म वाटपात आपला काही हात नाही. निवडणूक निरीक्षक चैनसुख संचेती आणि निवडणूक प्रभारी हेच याबाबत अधिक बोलू शकतील, असे जोरगेवार यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com