Nagpur Shivsena Politics
Nagpur Shivsena Politicssarkarnama

Nagpur Politics : स्वबळावर उतरलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का : शिवसैनिकाने मतदानापूर्वीच नांगी टाकली; माघार घेऊन थेट शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश

Nagpur Municipal Election : नागपूर महापालिका निवडणुकीत उद्धव सेनेच्या उमेदवाराने माघार घेऊन शिंदे सेनेत प्रवेश केला असून, भाजप-शिंदे सेना मैत्रीपूर्ण लढतीमुळे राजकीय समीकरणे बदलली आहेत.
Published on

Nagpur News : नागपूर महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही शिवसेनेमध्ये मोठी घडामोड घडली. शिवसेनेच्या उमेदवारासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अधिकृत उमेदवाराने निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. एवढेच नव्हे तर माघार घेऊन त्याने शिवसेनेत प्रवेशही केला आहे. विशेष म्हणजे ज्या प्रभागात ही घडामोड घडली तेथे अधिकृत युती झाली असतानाही भाजप आणि शिवसेना मैत्रीपूर्ण लढत आहे.

महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसने शेवटच्या क्षणी युती तोडल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप केले आहे. मात्र प्रभाग क्रमांक 21 मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उमेदवाराने माघार घेऊन निवडणुकीपूर्वीच नांगी टाकली.

भाजप आणि शिवसेनेच्या युतीमुळे शिवसैनिकांमध्ये मोठा असंतोष उफाळून आला आहे. भाजपने शिवसेनेसाठी फक्त आठ जागा सोडल्या आहेत. त्यापैकी सहा जागांवर भाजपने आपले उमेदवार दिले आहेत. यातही भाजपने एका माजी नगरसेविकेच्या हाती शिवसेनेचे धनुष्यबाण दिले आहे.

Nagpur Shivsena Politics
BJP News : कोंडून ठेवलेल्या भाजप बंडखोराची शेवटच्या क्षणी सुटका; पळत जाऊन अर्ज मागे; आमदारांनी काय दिले आश्वासन?

या तडजोडीवरून शिवसेनेत मोठी नाराजी आहे. दोन जागेसाठी युती कशाला केली असा सवाल केला जात आहे. उमेदवारी अर्ज भरायच्या दिवशीसुद्धा भाजप (BJP) आणि शिवसेनेत जागा वाटपावरून चर्चा सुरू होती. भाजपने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेत गुंतवणूक ठेवले आणि फक्त दोन जागा देऊन बोळवण केल्याचा आरोप आहे. जागा वाटप समाधानकारक होत नसल्याने शिंदे सेनेचे अनेक पदाधिकारी बैठकीतून निघून गेले होते. मात्र अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी भाजपच्या सर्व अटी मान्य करून युतीवर शिक्कामोर्तब केले.

Nagpur Shivsena Politics
Nagpur Mahapalika Nivadnik: पती माघार घेईना; भाजपच्या माजी महापौरांनी गाठलं माहेर! तिकीटामुळे संसारात फूट

सर्व एबी फॉर्म जयस्वाल यांच्याकडे असल्याने कोणालाही बंड करता आले नाही. मात्र या गडबडीत शिवसेनेचे अजय दलाल यांना मात्र प्रभाग क्रमांक 21 मधून एबी फॉर्म देण्यात आला. या जागेवर भाजप व शिवसेनेने मैत्रीपूर्ण लढण्याचा निर्णय घेतला आहे. येथून भाजपने पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांचे कट्टर समर्थक संजय अवचट यांना उमेदवारी दिली आहे. दोन्ही शिवसेना एकत्र आल्याने भाजप उमेदवाराची अडचण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अजय दलाल आणि त्यांच्या पत्नी आरती दलाल या प्रभागातून यापूर्वी निवडून आल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com