Former Nagpur mayor Archana Dehankar
Former Nagpur mayor Archana Dehankar Sarkarnama

Nagpur Mahapalika : बंडखोरीमुळे पत्नी रुसून माहेरी गेली, पण पती रिलॅक्स : म्हणाले, "35 वर्षात गेली नव्हती, आता गेलीय तर आराम करेल"

Archana Dehankar News : नागपूरमध्ये भाजपला अंतर्गत संकटाचा सामना करावा लागत असून, माजी महापौरांच्या पतीने तिकीट नाकारल्याने बंड कायम ठेवले आहे, त्यामुळे पक्षापुढे राजकीय पेच निर्माण झाला आहे.
Published on

Nagpur News : नागपूर शहराच्या माजी महापौर आणि भाजपच्या पदाधिकारी अर्चना डेहनकर आणि त्यांचे पती विनायक डेहनकर यांनी आमच्यापैकी एकाला उमेदवारी द्यावी यासाठी पक्षाकडे मागणी केली होती. मात्र भाजपने दोघांचीही विनंती फेटाळून लावली. नाराज झालेल्या विनायक डेहनकर यांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे अडचणीत आलेल्या माजी महापौर माहेरी निघून गेल्या आहेत. त्यामुळे विनायक डेहनकर आपली उमेदवारी मागे घेतील असा अंदाज वर्तविली जात होता. मात्र तो फोल ठरला आहे. विनायक डेहनकर यांनी आपले बंड कायम ठेवले आहे. त्या त्यांच्या पक्षाचे काम करतील मी माझे काम करीन अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.

माजी महापौरांच्याच पतीने बंडखोरी केल्यामुळे सर्वांचे लक्ष उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसाकडे लागले होते. मात्र विनायक डेहनकर यांनी आपली भूमिका कायम ठेवली. माझी पत्नी माहेरी निघून गेली हे बरोबर आहे. लग्न झाल्यापासून 35 वर्षांत त्या कधी माहेरी थांबल्या नाही. या निमित्ताने पंधरा जानेवारीपर्यंत त्यांना आराम करायला मिळेल. त्यांनी माझेच काम करावे याचे कुठलेही बंधन मी घातले नाही. त्या भाजपच्या पदाधिकारी आहेत. त्यांनी आपले काम करावे मी माझे काम करणार असल्याचे विनायक डेहनकर यांनी सांगितले.

अर्चना डेहनकर अडीच वर्ष महापौर होत्या. मागील निवडणुकीत त्यांनी प्रभाग बदलून मागितला होता. मात्र त्यांचा प्रस्ताव भाजपने नाकारला होता. यावेळी त्यांनी आपल्या जुन्याच प्रभागातून लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र भाजपने काँग्रेसने नाराज केलेल्या आणि चार वेळा निवडून आलेल्या माजी नगरसेवक मनोज साबळे यांना पक्षात घेतले. दुसऱ्याच दिवशी त्यांना उमेदवारी दिली. त्यामुळे डेहनकर कुटुंब नाराज झाले. आम्ही 25 वर्षांपासून पक्षात कम करतो मात्र आयत्यावेळी पक्षात आलेल्यांना तिकीट दिल्याने विनायक डेहनकर यांनी बंडाचे निशान फडकावले आहे.

Former Nagpur mayor Archana Dehankar
Nagpur Municipal Election : हायव्होल्टेज ड्रामा; भाजपच्या ‘त्या’ उमेदवाराला कार्यकर्त्यांनीच डांबलं घरात, नेत्यांची धावपळ

विशेष म्हणजे भाजपने आयात केलेल्या साबळे यांच्या पत्नीने यापूर्वी अर्चना डेहनकर यांना पराभवाचा धक्का दिला आहे. आता त्यांचाच प्रचार करावा लागणार असल्याने अर्चना डेहनकर माहेरी निघून गेल्या असल्याचे बोलले जात आहे. विनायक डेहनकर यांनी निवडणुकीतून माघार घेतली नाही तर अर्चना डेहनकर यांना भाजपच्या पदाधिकारी या नात्याने पतीच्या विरोधात प्रचार करावा लागणार आहे.

भाजपच्यावतीने विनायक डेहनकर यांनी माघार घ्यावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अर्चना डेहनकर या भाजपच्या (BJP) प्रदेश पदाधिकारी आहेत. भाजप नागपूर शहर महिला मोर्चाच्या अध्यक्ष होत्या. विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागितली होती.

Former Nagpur mayor Archana Dehankar
BJP AB Form Controversy: धक्कादायक; एबी फॉर्म घोटाळा; एकाच कुटुंबात दहा फॉर्म कसे पोहोचले?

नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणात एक किस्सा सांगितला होता. ते म्हणाले, भाजपची एक महिला कार्यकर्ता माझ्याकडे येऊन गेली आणि एकदा महापालिकेची निवडणूक लढण्याची संधी द्या अशी विनंती करीत होती. नगरसेविका झाल्यानंतर ती पुन्हा आली. आता मला महापौर करा अशी विनंती केली. त्यानंतर विधानसभेची तिकीट मागण्यासाठी आली होती. गडकरी यांनी आपल्या भाषणात त्या महिलेचे नाव घेतले नाही. मात्र त्यांचा इशारा अर्चना डेहनकर यांच्याकडे होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com