Chandrapur Politics : चंद्रपुरात नव्या वादाला तोंड फुटणार; जोरगेवारांच्या विरोधात भिडणाऱ्यालाच मुनगंटीवारांनी पुन्हा भाजपमध्ये घेतलं

Sudhir Mungantiwar vs Kishor Jorgewar : आमदार किशोर जोरगेवार यांना भाजपमध्ये घेण्यास मुनगंटीवारांनी कडाडून विरोध केला होता. राज्यातील नेत्यांनी घेतलेल्या विरोधात त्यांनी थेट दिल्ली गाठली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन जोरगेवारांना भाजपात येण्यापासून रोखण्याचे प्रयत्न केले होते. मात्र यास कोणी दाद दिली नाही.
Kishor Jorgewar, Sudhir Mungantiwar
Supporters welcoming Brijbhushan Pazare back into BJP during the Chandrapur event. The moment reflects growing political tensions in the Chandrapur BJP leadership.Sarkarnama
Published on
Updated on

Chandrapur News, 20 Nov : चंद्रपूर जिल्ह्यात भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि भाजपचे आमदार किशोर जोरगेवार या दोन्ही नेत्यांमध्ये सातत्याने एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न सुरू असतात. दोघांच्याही समर्थकांमध्ये सातत्याने खडाजंगी सुरू असते.

या दोन्ही नेत्यांमधील वाद टोकाला गेले आहेत. यात आता आणखी एकाची भर पडली आहे. विधानसभेच्या निवडणुकीत जोरगेवारांच्या विरोधात बंडखोरी करणाऱ्याला पुन्हा एकदा भाजपमध्ये घेण्यात आलं आहे. यावरून आता नव्या वादाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

आमदार किशोर जोरगेवार यांना भाजपमध्ये घेण्यास मुनगंटीवारांनी कडाडून विरोध केला होता. राज्यातील नेत्यांनी घेतलेल्या विरोधात त्यांनी थेट दिल्ली गाठली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन जोरगेवारांना भाजपात येण्यापासून रोखण्याचे प्रयत्न केले होते. मात्र यास कोणी दाद दिली नाही.

जोरगेवारांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. त्यांना चंद्रपूरचे तिकटही देण्यात आले. ते निवडूनसुद्धा आले. तेव्हापासून या दोन्ही नेत्यांमध्ये मतभेदाला सुरुवात झाली. राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता आल्यानंतर मुनगंटीवारांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आले. दुसरीकडे जोरगेवारांना पक्षातून बळ देण्यास सुरुवात झाली. त्यामुळे दोन्ही नेत्यांमधील वाद टोकाला गेलेत.

Kishor Jorgewar, Sudhir Mungantiwar
Satara NCP: बलाढ्य भाजपने दोन्ही राष्ट्रवादीला गुडघ्यांवर आणलं : शशिकांत शिंदे, मकरंदआबांना सातारा जड जातंय...

चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात मुनगंटीवार यांनी ब्रिजभूषण पाझारे यांना उमेदवारी देण्याची मागणी केली होती. त्यांच्यासाठी शेवटपर्यंत जोर लावला होता. मात्र भाजपने त्यांची मागणी धुडकावून लावली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरगेवार यांच्या नावाला पसंती दिली. त्यामुळे पाझारे यांनी बंडखोरी केली होती. भाजपने त्यांना निलंबित केले होते. तब्बल वर्ष भरानंतर पक्षाने त्यांचे निलंबन रद्द केले आहे.

भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरित शर्मा, माजी शहर अध्यक्ष राहुल पावडे आणि युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर यांच्या उपस्थितीत पाझारे यांनी पुन्हा भाजपात प्रवेश केला. या प्रवेश समारंभाला आमदार जोरगवार आणि शहर अध्यक्ष उपस्थित नव्हते. यामुळे पाझारे यांच्या पक्ष प्रवेशानंतर भाजपात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

Kishor Jorgewar, Sudhir Mungantiwar
Pimpri Chinchwad Politics : आधी एकनाथ शिंदे आता अजितदादा? पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप मोठ्या भूकंपाच्या तयारीत

पाझारे यांना पक्षात प्रवेश देऊन मुनगंटीवार यांनी आमदार जोरगेवार यांच्यावर कुरघोडी केली असल्याचे दिसून येते. महापालिकेच्या निवडणुकीचे प्रमुख म्हणून भाजपने किशोर जोरगेवार यांची नियुक्ती केली आहे. ही बाब मुनगंटीवार यांना खटकत आहे. भाजपचे शहराध्यक्षांनी इच्छुकांना भाजप कार्यालयातून निवडणुकीचे अर्ज घेऊन जाण्याचे आवाहन केले होते.

दुसरीकडे मुनगंटीवार यांचे समर्थक व माजी शहर अध्यक्ष यांनी मुनगंटीवार यांच्या संपर्क कार्यालयातून अर्ज घेण्याचे आवाहन केले आहे. यावरूनही वाद निर्माण झाला आहे. यात आता पाझारे यांना पक्षात घेतल्यामुळे भाजपमध्ये नव्या वादाला सुरुवात होणार आहे. या पक्ष प्रवेशावर आमदार जोरगेवार नाराज असल्याचे बोलले जाते.६

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com