Chandrapur BJP News : भोंगळे विधानसभाप्रमुख झाले, दौरे वाढले; धोटे, निमकरांचे काय होणार?

Devrao Bhongale : विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून सध्या त्याकडे बघितले जात आहे.
Sudarshan Nimkar, Devrao Bhongale and Sanjay Dhote
Sudarshan Nimkar, Devrao Bhongale and Sanjay DhoteSarkarnama
Published on
Updated on

Chandrapur District Political News : भाजपने माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांना राजुरा विधानसभा प्रमुखपद दिलं. त्यांच्या राजूऱ्यातील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन भव्यदिव्य झाले. राज्याचे वनमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमानंतर भोंगळे राजुरा विधानसभा पिंजून काढीत आहेत. (It is currently being looked upon as a rehearsal for the assembly elections)

त्यांचे वाढते दौरे बघता विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून सध्या त्याकडे बघितले जात आहे. जर तसे झाले तर राजुरा येथील भाजपचे माजी आमदार संजय धोटे व माजी आमदार सुदर्शन निमकरांचे काय होणार, याबाबतची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. राजुरा विधानसभा क्षेत्र हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. पहिल्यांदा शेतकरी संघटनेच्या वामनराव चटप यांनी या गडाला सुरुंग लावला.

कॉँग्रेसचे सुभाष धोटे हे सध्या या क्षेत्राचे प्रतिनिधित्व करतात. राज्यातील राजकीय अंदाधुंदीची स्थिती बघता एक एक आमदार प्रत्येक राजकीय पक्षासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकांना वेळ असला तरी आतापासूनच राजकीय वातावरण गरम होऊ लागले आहे. घर चलो अभियानाच्या माध्यमातून भाजपने राजुरा विधानसभेत रणशिंग फुंकले, तर जनसंवाद यात्रा काढून काँग्रेसने जनतेचे समर्थन मिळविण्याचा प्रयत्न केला. या दोन्ही पक्षांनी हे दोन्ही अभियान प्रतिष्ठेचे केले होते.

भाजपने राजुरा विधानसभा क्षेत्राची जबाबदारी देवराव भोंगळे यांच्या खांद्यावर सोपविली आहे. यासाठी राजुऱ्यात त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे जंगी उद्घाटन करण्यात आले होते. विधानसभा प्रमुख पदाची जबाबदारी येताच भोंगळे फ्रंट फूटवर बॅटिंग करत आहेत. पक्षप्रवेश, गावातील कार्यकर्त्यांच्या भेटी, विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावत आहेत. संजय धोटे हे मुळात शेतकरी संघटनेचे नेते होते. 2014 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेत विधानसभा निवडणूक लढवली व जिंकलेसुद्धा. पहिल्यादांच राजुरा विधानसभा क्षेत्रात काँग्रेसच्या सुभाष धोटे यांचा पराभव करीत त्यांनी कमळ फुलविले होते.

सुदर्शन निमकर हे काँग्रेसकडून आमदार राहिले होते. यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. गेल्या अनेक वर्षांपासून ते भाजपमध्ये सक्रिय आहेत. राजुरा विधानसभा क्षेत्र कुठल्याही स्थितीत काँग्रेसच्या हातून हिसकावण्यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार अलर्ट मोडवर आहेत. गेल्या काही दिवसांत त्यांचे राजुरा विधानसभा क्षेत्रात दौरे वाढले आहेत. राजुरा विधानसभेकरिता भाजपचा उमेदवार कोण असेल, याबाबतची उत्सुकता भाजप कार्यकर्त्यांमध्ये आहे.

भोंगळे- धोटे आमनेसामने...

भाजपचे माजी आमदार संजय धोटे यांचे राजुरा येथे जनसंपर्क कार्यालय आहे. आमदार असताना या ठिकाणाहूनच पक्षाचे विविध कामकाज चालत होते. आता भाजपने संजय धोटे यांच्या कार्यालयासमोर पक्षाचे दुसरे जनसंपर्क कार्यालय तयार केले आहे. या प्रकारामुळे माजी आमदार संजय धोटे व विधानसभा प्रमुख देवराव भोंगळे हे आमनेसामने आले आहेत. विशेष म्हणजे राजुऱ्यातील भाजप कार्यालयाच्या उद्घाटनाप्रंसगी माजी आमदार संजय धोटे यांची अनुपस्थिती बरेच काही सांगून जाते.

Edited By : Atul Mehere

Sudarshan Nimkar, Devrao Bhongale and Sanjay Dhote
OBC Andolan Chandrapur : ओबीसींचा संताप ! प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढत राज्य सरकारचा निषेध

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com