OBC Reservation : ओबीसींच्या विविध मागण्यासांठी गेल्या तेरा दिवसांपासून चंद्रपुरात (Chandrapur) सुरू असलेल्या आंदोलनाने रविवारी आक्रमक रूप धारण केले. ओबीसीकडे शासन लक्ष देत नसल्याचा आरोप करित आंदोलनमंडपापासून चंद्रपुरातील नेत्याच्या घरावर मुख्यमंत्री, व दोन्ही उपमुख्यमंत्रांच्या प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्यात आली. दरम्यान, पोलीस प्रशासनाने त्यांनामध्येच अडवून ताब्यात घेतले. 'राम नाम सत्य हे देश का विकास सुस्त हे' असे नारे देत ओबीसी बांधवांनी आपला सरकारवरील संताप व्यक्त केला.
शनिवारी या मागणीला घेत ओबींसीनी (OBC) चंद्रपूर नागपूर महामार्ग रोकून धरला होता. शासनाचा निषेध करण्यासाठी आज पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar), हंसराज अहिर, आमदार किशोर जोरगेवार यांच्या घरापर्यंत मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्यासाठी जिल्ह्यातून ओबीसी बांधव एकत्र आले होते. सकाळपासूनच या आंदोलनाची जोरदार तयारी सुरू होती. आंदोलनाची गंभीरता लक्षात घेत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. जिल्हधिकारी कार्यालयासमोरील आंदोलनस्थळापासून ओबीसी कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक प्रेत यात्रा काढली हि प्रेतयात्रा नेत्याच्या घरापर्यंत जाण्यापुवीच पोलिसांनी रोखली. या वेळी पोलीसांनी अनेक कार्यकर्त्याना ताब्यात घेतले.
रविद्र टोंगे यांचे 11 सप्टेंबर पासून आंदोलन सुरू आहे. दरम्यान, प्रकृती बिघडल्याने टोंगेना मेडीकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. टोंगे जरी रूग्णालयात असले तरी त्यांच्या ऐवजी दोघांनी हे आंदोलन सुरू ठेवले आहे. एकीकडे जरांगे पाटीलांच्या आंदोलनाला सत्ताधा-यांनी, विरोधकांनी तातडीने भेट देउन तोडगा काढला. पण सरकार ओबीसीच्या मागण्यांकडे पुर्णपणे दुर्लक्ष करित असल्याचा आरोप करित प्रेतयात्रेत सहभागी झालेल्या ओबीसीनी संताप व्यक्त केला.
आज काढण्यात आलेल्या प्रेतयात्रा आंदोलनात शिक्षक आमदार सुधाकर अडबाले (Sudhakar Adbale), सचिन राजूरकर, दिनेश चोखारे, पप्पू देशमुख, भुषण फुसे यांच्यासह जिल्हयातील ओबीसी बांधवांची मोठया प्रमाणावर उपस्थिती होती. अकरा सप्टेबरपासून अन्नत्याग करणा-या टोंगे यांची तब्बेत खालावल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णाल्यात दाखल करण्यात आले आहे. टोंगेच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. हे आंदोलन तोडगा निघेपर्यंत सुरूच असल्याची माहिती राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सचिव सचिन राजूरकर यांनी दिली. याहीपुढे अधिक आक्रमकपणे आपण आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली असल्याचे त्यांनी सांगीतले.
ओबीसींच्या आंदोलनाला बळकटी देण्यासाठी सोमवारी चंद्रपूरसह प्रत्येक तालुक्यात लाक्षणीक स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार आहे. तर 30 सप्टेंबर रोजी चंद्रपूर जिल्हा बंद ची हाक देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. विविध प्रकारचे आंदोलन करूनही याकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याने ओबीसीत संतापाची लाट पसरली आहे.
Edited by : Amol Jaybhaye
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.