Chandrapur News : नागपुरातील महारॅलीसाठी कार्यकर्ते म्हणाले, 'है तय्यार हम...'

Congress Maha Rally : स्थापना दिवसाच्या निमित्ताने काँग्रेसमध्ये संचारला जोश; चंद्रपूर, गडचिरोलीत कार्यकर्ते एकवटले
Chandrapur Congress
Chandrapur CongressSarkarnama
Published on
Updated on

Congress Political News : गुरुवारी (ता. 28) साजरा होत असलेल्या काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये सध्या प्रचंड जोश दिसून येत आहे. नागपूर येथे पक्षातील सर्वोच्च पातळीवरील नेत्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे चंद्रपुरातील कार्यकर्ते कामाला लागले आहेत.

लवकरच लोकसभा निवडणूक होणार आहे. त्यानंतर विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांचीही निवडणूक होऊ शकते. त्यामुळे विदर्भाच्या नागपुरातील काँग्रेसची महारॅली सभा महत्त्वाची मानली जात आहे. या महारॅलीत तब्बल दहा लाख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी आता 'है तय्यार हम...' असे म्हणत कंबर कसली आहे.

Chandrapur Congress
Chandrapur : पांजरेपार रीठजवळ रस्त्यासाठी शेतकरी आक्रमक, जिल्हाधिकाऱ्यांचा...

विदर्भ कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. पण मोदी लाटेत भाजपने काँग्रेसचे पानिपत केले. सध्या देशात काँग्रेसची स्थिती वाईट आहे. नुकत्याच झालेल्या राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसला दारूण पराभव स्वीकारावा लागला. या पराभवामुळे देशभरातील काँग्रेस कार्यकर्ते हिरमुसले आहेत.

अशात आता 2024 साठी लोकसभेचे मिशन काँग्रेसने हाती घेतले आहे. पराभवातून आलेली निराशा झटकत काँग्रेस पुन्हा नव्या ताकदीने लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज झाली आहे. ‘इंडिया’ आघाडीची मोटही बांधत भाजपच्या सर्व विरोधकांना एकत्र आणण्यासाठी काँग्रेसने पुढाकार घेतला आहे.

अशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपुरातून काँग्रेस 28 डिसेंबरला लोकसभा निवडणुकीचा शंखनाद करणार आहे. मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी-वाड्रा यांच्यासमवेत देशभरातील काँग्रेसचे प्रमुख नेते स्थापना दिवसाच्या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

त्यामुळे देशभरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष नागपुरातील महारॅलीवर आहे. स्थापना दिवसाच्या कार्यक्रमाला चंद्रपुरातून मोठ्या प्रमाणावर काँग्रेस कार्यकर्ते नागपूरला जाणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महारॅलीसाठी सध्या चंद्रपुरातील गावागावात बैठकसत्र घेतले जात आहे. सोशल मीडियावरून कार्यक्रमाची प्रसिद्धी केली जात आहे. विदर्भात काँग्रेसची शक्ती कमकुवत झाली असताना चंद्रपुरात मात्र काँग्रेस ‘फ्रंटफूट’वर खेळण्याचा प्रयत्न करीत आहे.

चंद्रपुरातील तीन विधानसभा क्षेत्रात सध्या काँग्रेसचे वर्चस्व आहे. येथे पक्षाचे आमदार आहेत. गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रातून केवळ चंद्रपूर लोकसभा मतदार संघात काँग्रेसने विजय मिळविला. त्यामुळे काँग्रेसला चंद्रपूरकडून आजही बऱ्याच अपेक्षा आहेत.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेटटीवार हे चंद्रपुरातील ब्रह्मपुरी विधानसभेचे नेतृत्व करतात. नागपुरातील महारॅलीसाठी त्यांच्यासह चंद्रपुरातील सर्वच नेते कामाला लागले आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा जोश दिसत आहे.

गडचिरोली जिल्ह्यातूनही काँग्रेस कार्यकर्ते एकवटले आहेत. गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, नामदेव किरसान यांच्या नेतृत्वात सध्या वातावरण निर्मिती केली जात आहे. अजय कंकडलावार यांनी अलीकडेच आपल्या समर्थकांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांचीही साथ काँग्रेसला मिळणार आहे.

Edited by : Prasannaa Jakate

Chandrapur Congress
Chandrapur : वीज उत्पादक जिल्ह्यांना 200 युनिट मोफत मिळण्यासाठी नेत्याचा एकाकी लढा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com