Chandrapur Congress Jansamvad Yatra : बोडलावारांच्या भंगाराम तळोधीत कॉंग्रेसचे जोरदार शक्तिप्रदर्शन !

Congress : अरुण धोटेंच्या नेतृत्वात जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले.
Congress Jansamvad Yatra
Congress Jansamvad YatraSarkarnama

Chandrapur District Congress Jansamvad Yatra News : चंद्रपूर जिल्ह्याच्या गोंडपिपरी तालुक्यात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून काँग्रेसची जनसंवाद यात्रा सुरू आहे. गोंडपिपरी तालुक्यातील भाजप नेते अमर बोडलावार यांच्या भंगाराम तळोधी या गावात शुक्रवारी (ता. आठ) ही यात्रा पोहोचली अन् अरुण धोटेंच्या नेतृत्वात जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. (A show of strength was shown under the leadership of Arun Dhote)

श्रीनिवास कंदनुरीवार व विपिन पेद्दुलवार यांच्या नेतृत्वात कॉंग्रेसने जोरदार शक्तिप्रदर्शन करत गावात माहौल तयार केला. राज्याचे वन व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे विश्वासू व अप्रत्यक्षपणे गोंडपिपरी तालुका भारतीय जनता पक्षाचे प्रमुख असलेले अमर बोडलावार यांनी गेल्या काळात बरेच यश मिळविले.

भंगाराम तळोधीत त्यांच्याच पक्षाची सत्ता आहे. नुकत्याच पार पडलेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत (Election) अमर बोडलावारांच्या नेतृत्वात ३२ वर्षांनंतर भाजपला सत्ता मिळाली. यानंतर ते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या अतिशय जवळचे झाले. राजुरा विधानसभा मतदारसंघात येत असलेल्या गोंडपिपरी तालुक्यात मागील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत बोडलावारांनी एकही जागा जिंकू दिली नव्हती.

चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्याच्या भंगाराम तळोधी येथील श्रीनिवास कंदनुरीवार यांच्यासोबत विपिन पेद्दुलवार या तरुणाला तालुका युवक कॉंग्रेसची जबाबदारी देण्यात आली. गोंडपिपरी तालुक्यातील खराळपेठ या गावातून काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेला सुरुवात झाली. सतत पाऊस पडत असल्याने अनेक गावांत त्यांना पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही. ही यात्रा भंगाराम तळोधी या गावात पोहोचली अन् गावकऱ्यांनी हजारोंच्या संख्येत सहभागी होत गावात चांगला माहाेल तयार केला.

Congress Jansamvad Yatra
Chandrapur NCP News : भाजपचे ‘घर चलो’, कॉंग्रेसचा ‘जनसंवाद’ यात आता राष्ट्रवादीही मागे नाही !

गावात जनसंवाद रॅलीचे आगमन झाल्यानंतर जोरदार स्वागत करण्यात आले. काही कार्यकर्त्यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. संपूर्ण गावभर रॅली काढून काँग्रेस जिंदाबाद, राहुल गांधी जिंदाबादचे नारे देण्यात आले. यानंतर गावातील प्रमुख चौकात कॉर्नर सभा घेण्यात आली. या प्रसंगी अरुण धोटे, विपिन पेददुलवार व राजू झाडे यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.

भंगाराम तळोधी या गावात कॉंग्रेसच्या जनसंवाद यात्रेत झालेली गर्दी बघून आश्‍चर्य झाल्याचे पाहायला मिळाले. या वेळी तुकाराम झाडे, नीलेश संगमवार, देवेंद्र बटटे, श्रीनिवास कंदनुरीवार, विपिन पेददुलवार, देवीदास सातपुते, अशोक रेचनकर, गोंडपिंपरीच्या नगराध्यक्ष सविता कुळमेथे, सोनी दिवसे, विनोद नागापुरे, बालाजी चनकापुरे, संतोष बंडावार, रेखा रामटेके, शंभू येलेकर, नगरसेवक अनिल झाडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com