Chandrapur NCP News : भाजपचे ‘घर चलो’, कॉंग्रेसचा ‘जनसंवाद’ यात आता राष्ट्रवादीही मागे नाही !

Rajura - Chandrapur : राष्ट्रवादीने पकड मजबूत करण्यास सुरुवात केली आहे.
Ajit Pawar - NCP.
Ajit Pawar - NCP.Sarkarnama

Chandrapur District Political News : भारतीय जनता पक्ष ‘घर चलो अभियानाच्या माध्यमातून लोकांच्या घराघरांपर्यंत पोहोचत आहे. तर कॉंग्रेस जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून इलेक्शन मोडवर आली आहे. या स्पर्धेत आता राष्ट्रवादी कॉंग्रेसही (अजित पवार गट) मागे राहिली नाही. चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीने पकड मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. (NCP has started to strengthen its grip.)

चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील राजूरा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) प्राबल्य आहेच. पण आता कोरपना व जिवती तालुक्यातील काही सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी आज (ता. सात) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (प्रवेश केला. त्यामुळे पक्षाची ताकद वाढण्यास मोठी मदत मिळणार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष महेंद्रसिंह चंदेल यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने आज (ता. सात) राजूरा विधानसभा क्षेत्रातील जिवती व कोरपना तालुक्यात पक्षप्रवेशाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी चंदेल बोलत होते. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, शरद जोगी, विलास नेरकर, शंकर देरकर, प्रवीण काकडे, सुनील अनकिलवार, करण सिंह, मुनीर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

आजही राजूरा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसची बऱ्यापैकी ताकद आहे. या मतदारसंघातील नगरपंचायतींमध्येही राष्ट्रवादीचे अनेक नगरसेवक (Corporator) आहेत. अशावेळी आता पक्षाची ताकद वाढविण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. याकरिता आज कोरपना व जिवती येथे शरद जोगी यांच्या नेतृत्वात कार्यक्रम घेण्यात आला.

Ajit Pawar - NCP.
NCP MLA Threatened: राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराला टॅक्सी चालकाकडून धमकी

आगामी काळात विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. यासाठी विविध पक्षांनी आपआपल्या पद्धतीने तयारी सुरू केली आहे. कॉंग्रेसने जनसंवाद यात्रेव्दारे मोहीम सुरू केली. तर भाजप घर चलो अभियान राबवीत आहेत. याच धर्तीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही आपल्या पक्षाला बळकट करण्याकरिता विविध उपक्रम राबविण्यावर भर दिला आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com