
Maharashtra politics news : महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्याच पत्रकार परिषदेत लवकरच कार्यकर्त्यांना मंडळाचे वाटप केले जाईल. यापूर्वी झालेली चूक दुरूस्त केली जाईल, असे जाहीर करण्यात आले होते. यास सात महिन्यांचा कार्यकाळ उलटून गेला आहे. कोणालाच काही देण्यात आले नाही.
आता महापालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुका जवळ येताच पुन्हा महामंडळ वाटपाची चर्चा सुरू झाली आहे. हा निवडणुकीचा फंडा आहे, कार्यकर्त्यांना नवा लॉलीपाप दिल्या जात असल्याची टीका काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
महायुती (Mahayuti) जिंकल्यानंतर याचे सर्व क्रेडिट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपआपल्या कार्यकर्त्यांना दिले होते. युतीच्या अडीची वर्षांच्या काळात महामंडळाचे वाटपच करण्यात आले नव्हते. त्यापूर्वी युतीचे मुख्यमंत्री असतानाही फडणवीस यांनी कार्यकाळ संपायच्या काही दिवसांपूर्वी मंडळे जाहीर केले होते. नंतर लगेच निवडणूक जाहीर झाली. त्यामुळे पदभार स्वीकारण्यापूर्वीच अनेक मंडळ अध्यक्षांना नावासमोर माजी अध्यक्ष असा फलक लावावा लागला होता.
काहींना आपल्या मंडळाच्या कार्यालयाचे तोंडही बघता आले नव्हते. महाविकास आघाडी सरकारनेही (MVA) अडीच वर्षे हेच धोरण अवलंबविले होते. त्यामुळे मंडळे मिळतील यावर आता कोणाचा विश्वास राहिला नाही. यातच आता महायुती सरकारने मंडळ वाटपाच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे अनेकांच्या आशा उंचावल्या आहे.
महापालिका, जिल्हा परिषद आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्याने महायुती सरकार आपल्या कार्यकर्त्यांना मंडळाचे चॉकलेट दाखवत असल्याचे वडेट्टीवार यांचे म्हणणे आहे. सरकारमध्ये तीन पक्षाची भागीदारी आहे. सर्वांकडे कार्यकर्त्यांची मोठी संख्या आहे. कोणाला काय द्यायचे काय नाही यातच सरकराचा वेळ जाणार आहे. खरेतर सरकारला कोणाल काही द्यायचेच नाही. हा निवडणुकीचा फंडा आहे. मंत्री दाबून खात आहेत. कार्यकर्ते निराश आहेत. त्यांना खुश करण्यासाठी हे चॉकलेट दाखवल्या जात आहे.
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याबाबत काय बोलावे. ते डागी मंत्री आहेत. कधी शेतकऱ्यांना ते शिव्या देतात तर कधी सरकारला भिकारी म्हणतात. त्यानंतरही हे सरकार निर्णय घेत नाही. अशा कलंकित मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढायचे नसेल तर गोमूत्र शिंपडून त्यांना शुद्ध करा. तसाही सध्या श्रावणमास सुरू आहे. शुद्ध गायीचे गोमूत्र शिंपडायला हरकत नाही. कोकाटे यांना शंकराच्या पिंडीपुढे बसवून अभिषेक करावा आणि शुद्ध करून घ्यावे असा टोलाही विजय वडेट्टीवार यांनी सरकारला लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.