Congress News : गटनेता अडचणीत, ‘धनी’ मोकाट? स्थायी समिती प्रकरण तापले; प्रदेशाध्यक्षांची कारणे दाखवा नोटीस

Chandrapur Municipal Corporation : चंद्रपूर महानगरपालिकेतील स्थायी समिती निवडीवरून काँग्रेसमध्ये वाद निर्माण झाला. गटनेते राजेश अडूर यांना पक्ष आदेश न पाळल्यामुळे कारणे दाखवा नोटीस देण्यात आली असून अंतर्गत संघर्ष तीव्र झाला.
Congress corporators discussing the Chandrapur Municipal Corporation standing committee dispute after Rajesh Adur received a show-cause notice from the party leadership.
Congress corporators discussing the Chandrapur Municipal Corporation standing committee dispute after Rajesh Adur received a show-cause notice from the party leadership.Sarkarnama
Published on
Updated on

Chandrapur News : चंद्रपूर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशांना पायदळी तुडवत स्वतःच्या मर्जीने स्थायी समितीसाठी नावे पाठविणारे काँग्रेसचे चंद्रपूर महानगरपालिकेतील गटनेते राजेश अडूर चांगलेच अडचणीत आले आहेत. पक्षाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा दिला आहे. दरम्यान, अडूर यांची राजकीय उंची पाहता या कारस्थानाचा करविता धनी वेगळाच असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्यातील महानगरपालिकेतील सत्ता स्थापनेचा वाद दिल्लीपर्यंत पोहोचला होता. त्यानंतर केंद्रीय नेतृत्वाने मध्यस्थी केली आणि सर्वसंमतीने अडूर यांची गटनेते म्हणून निवड करण्यात आली. मनपा निवडणुकीत एका मताने काँग्रेसचा पराभव झाला. त्यानंतर खासदार धानोरकर यांनी नगरसेवकांसाठी आयोजित केलेल्या स्नेहसंमेलनाकडेही वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांनी पाठ फिरवली होती.

दरम्यान, काल मनपातील स्थायी समितीच्या सोळा सदस्यांची नावे देण्यासाठी महापौर संगीता खांडेकर यांनी विशेष सभा बोलावली होती. त्यासाठी खासदार धानोरकर यांनी काँग्रेसचे महानगर अध्यक्ष संतोष लहामगे यांच्या माध्यमातून संगीता अमृतकर, संगीता भोयर आणि राहुल घोटेकर यांची नावे पाठवली होती.दरम्यान, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्वतः अडूर यांच्याशी संपर्क साधून खासदार धानोरकर यांनी पाठविलेली नावे सामावून घ्या, असे निर्देश दिले होते. मात्र बंद लिफाफ्यातील काँग्रेसची सातही नावे आमदार वडेट्टीवार गटाचीच होती. त्यामुळे खासदार धानोरकर समर्थक नगरसेवकांनी संताप व्यक्त केला. या प्रकरणाचे पडसाद मुंबईपर्यंत उमटले.

दुसरीकडे, खासदार धानोरकर समर्थक नगरसेवकांनी अडूर यांची तत्काळ हकालपट्टी करण्याची मागणी केली. दरम्यान, (ता.5) गुरुवारी काँग्रेसचे महानगर अध्यक्ष लहामगे यांनी घडलेल्या प्रकरणाचा सविस्तर अहवाल प्रदेश काँग्रेसकडे पाठवला. यासोबत आमदार वडेट्टीवार आणि खासदार धानोरकर यांच्यात सत्तास्थापनेतील भागीदारीबाबत झालेल्या कराराची प्रतही पाठविण्यात आली. याची दखल घेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गणेश पाटील यांनी अडूर यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. तीन दिवसांत यासंदर्भात लेखी खुलासा प्रदेशाध्यक्षांना पाठविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

करविता धनी वेगळा?

आमदार वडेट्टीवार यांचे कट्टर समर्थक असलेले राजेश अडूर स्वतःहून निर्णय घेऊन स्थायी समितीसाठी नावे पाठवतील, याची शक्यता कमी असल्याचे मानले जाते. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामागे करविता धनी वेगळाच असल्याची चर्चा आहे. प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष गणेश पाटील यांनी अडूर यांना पाठविलेल्या कारणे दाखवा नोटीसमध्ये अप्रत्यक्षपणे याचा उल्लेख करण्यात आला आहे. आमदार वडेट्टीवार आणि खासदार धानोरकर यांच्याशी चर्चा करणे आवश्यक होते. मात्र असे करताना खासदार धानोरकर यांच्याशी चर्चा करण्यात आली नाही.

Congress corporators discussing the Chandrapur Municipal Corporation standing committee dispute after Rajesh Adur received a show-cause notice from the party leadership.
Congress News : काँग्रेसचा गटनेताच फुटला!जालना महापालिकेत नाचक्की; एक स्वीकृत सदस्य करण्याची संधीही हुकली!

त्यांनी सुचविलेली नावे वगळण्यात आली. मनमानी पद्धतीने स्वतःच्या मर्जीने स्थायी समितीसाठी नावे देण्यात आली. ही अत्यंत गंभीर बाब असून पक्षशिस्तीचा भंग करणारी आहे. यासंदर्भात तीन दिवसांत लेखी खुलासा प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे पाठवावा. खुलासा न पाठविल्यास अथवा तो समाधानकारक नसल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशाराही नोटीसमध्ये देण्यात आला आहे.

Congress corporators discussing the Chandrapur Municipal Corporation standing committee dispute after Rajesh Adur received a show-cause notice from the party leadership.
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचं भवितव्य काय? अनेक शंका-कुशंका; फडणवीसांच्या बजेटमधील विधानामुळे चर्चा रंगली

प्रदेशाध्यक्षांची किंमत काय?

साध्या ‘ड’ वर्ग पालिकेत विरोधी पक्षातील काँग्रेसचे गटनेते राजेश अडूर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आदेश पायदळी तुडविला. प्रदेशाध्यक्षांनी आपल्याशी संपर्क केला नाही, असे ते जाहीरपणे सांगतात. मात्र सपकाळ यांनी त्यांच्याशी संपर्क साधला होता. स्थायी समितीत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिलेली नावे सामावून घेण्यासंदर्भात सपकाळ यांनी अडूर यांना निर्देश दिले होते, असे सपकाळ यांचे कार्यालयीन सचिव भारत पाटील यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. त्यामुळे एक साधा गटनेता जर प्रदेशाध्यक्षांच्या सूचना ऐकत नसेल, तर त्यांच्या पदाची किंमत काय? अडूर यांना हे धाडस करण्याची हिंमत नेमकी कुणी दिली, असा प्रश्नही आता चर्चिला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com