DCC Bank Election : 'लगत'ने केला सहा जणांचा घात; थेट उमेदवारीच रद्द, काँग्रेसचा बडा नेताही फसला

Chnadrapur DCC Bank :चंद्रपूर जिल्हा बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीतून पाच जणांचा अर्ज बाद झाला आहे. तर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी अर्ज बाद होण्यापूर्वीच मागे घेतला.
Chandrapur Bank
Chandrapur Bank Sarkarnama
Published on
Updated on

Chnadrapur DCC Bank :चंद्रपूर जिल्हा बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीतून पाच जणांचा अर्ज बाद झाला आहे. तर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी अर्ज बाद होण्यापूर्वीच मागे घेतला. 'लगत' या एका शब्दाने या सहाही जणांचा घात केला आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज रद्द होण्याची नामुष्की या सहा जणांवर ओढावली आहे.

तब्बल 8 वर्षांनंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक जाहीर झाली आहे. यातही आमदार आणि खासदार प्रत्यक्ष रिंगणात उतरल्याने हायप्रोफाइल झाली आहे. या निवडणुकीसाठी अर्जासोबत संस्थेचे 'लगत'च्या वर्षाचे लेखापरीक्षण जोडायचा होते. निवडणुकीची अर्हता तारीख 1 फेब्रुवारी 2025 होती. त्यामुळे या तारखेपासून लगतचे वर्ष 2023-24 असे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी गृहित धरले.

मात्र, लगतचे वर्ष असा समज करून अनेक उमेदवारांनी 2024-25 या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण जोडले. ही चूक लक्षात येताच अनेकांचे धाबे दणाणले. यावरून प्रतिस्पर्धी उमेदवारांनी न्यायालयात धाव घेतली. दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद झाला आणि न्यायालयाने लगतचे वर्ष म्हणून 2023-24 हेच ग्राह्य धरावे, असे स्पष्ट केले. त्यामुळे काही उमेदवारांच्या 'लगत' अंगलट आला आहे.

Chandrapur Bank
Chandrapur Politics : भाजपच्या आमदाराने शेवटच्या क्षणी गेम फिरवला... कसलेल्या विजय वडेट्टीवारांना घ्यावी लागली माघार

छाननीच्या दिवशी उमेदवारी अर्जासोबत 2024-25 या वर्षातील लेखापरीक्षण जोडल्याने गोंडपिंपरी तालुक्यातील 'अ' गटातील अमर बोडलवार आणि विद्यमान संचालक उल्हास करपे, सिंदेवाही तालुक्यातील अ गटातून विजय वडेट्टीवार, प्रशांत बन्सोड, निशिकांत बोरकर आणि विद्यमान संचालक डॉ. विजय देवतळे यांचा अर्ज बाद झाला. त्यामुळे गोंडपिंपरी आणि सिंदेवाही तालुक्यात नव्याने निवडणूक घ्यावी लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com