Chandrapur Politics : भाजपच्या आमदाराने शेवटच्या क्षणी गेम फिरवला... कसलेल्या विजय वडेट्टीवारांना घ्यावी लागली माघार

भाजप आमदार बंटी भांगडिया यांच्या मध्यस्थीने काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर चंद्रपूर जिल्हा बँकेवर बिनविरोध निवडून गेले. तर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना माघार घ्यावी लागली.
Chandrapur District Bank board election
Chandrapur District Bank board electionSarkarnama
Published on
Updated on

चंद्रपूर : भाजप आमदार बंटी भांगडिया यांनी सूत्र फिरवल्याने चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. या घडामोडींचा थेट फायदा काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोकर यांना झाला. त्या बँकेवर संचालक म्हणून बिनविरोध निवडून आल्या आहेत. तर काँग्रेसचे दुसरे नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार यांना ऐनवेळी माघार घेणे भाग पडले. याशिवाय किशोर जोरगेवार यांनी चाचपणी करून दोन्ही गटांमधून भरलेले अर्ज माघारी घेतले. सोबतच भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी तटस्थ भूमिका घेतल्याने या निवडणुकीच्या माध्यमातून उद्‍भवणारा राजकीय संघर्ष टळला आहे.

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक जाहीर झाली आहे. यावेळी पहिल्यांदाच जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधिंनी या निवडणुकीत सक्रिय सहभाग घेतल्याने निवडणूक आधीच चुरशीची झाली आहे. सर्वपक्षीय लोक प्रतिनिधींनी लक्ष घातले होते तरी ना भाजप नेत्यांमध्ये एक वाक्यता बघायला मिळाली ना काँग्रेस नेत्यांमध्ये. भाजप आमदारांनी पॅनेल उभे करण्यासाठी चाचपणी केली. परंतु ती यशस्वी झाली नाही. त्यामुळे चिमूरचे भाजप आमदार बंटी भांगडिया यांनी शांतपणे सूत्र हातात घेतली. महिला गटातील भाजपच्या समर्थकांना निवडणूक आणण्यासाठी आधी भांगडिया यांनी मध्यस्थी केली. त्यामुळे प्रतिभा धानोरकर यांची बिनविरोध निवड झाली.

त्याचवेळी निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्या वडेट्टीवार यांना मात्र भांगडिया यांनी माघार घेण्यास भाग पाडले. भांगडिया यांनी आधी काँग्रेसचे दिवंगत नेते, माजी राज्यमंत्री वामनराव गड्डमवार यांची मुलगी आणि नंदा अल्लूरवार यांना बिनविरोध निवडून आणले. 30 वर्षांपासून संचालक असलेल्या अल्लूरवार यांचा लगलीच भाजपप्रवेश घडवून आणला. काँग्रेसचे संजय डोंगरे यांच्या गळ्यात भाजपचा दुपट्टा घालून त्यांनाही बिनविरोध संचालक बनवण्यात आले. बँकेचे विद्यमान उपाध्यक्ष यशवंत दिघोरे यांचाही भाजपात प्रवेश करवून घेतला. विशेष म्हणजे, हे तिघेही काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचे समर्थक होते. या तिघांनी ऐनवेळी साथ सोडल्याने वडेट्टीवार यांना माघार घ्यावी लागली.

Chandrapur District Bank board election
Chandrapur District Bank Election - चंद्रपूर जिल्हा बँक निवडणुकीतील संघर्ष टळला; धानोरकर बिनविरोध, तर वडेट्टीवारांची माघार!

वडेट्टीवार यांनी माघार घेतली नसती तरीही 2023-24 ऐवजी 2024-25 या आर्थिक वर्षाचा आयटीआर जोडला होता. त्यामुळे इतर चौघांच्या उमेदवारीप्रमाणे वडेट्टीवार यांचाही अर्ज बाद झाला असता. पण त्यापू्र्वीच त्यांनी माघार घेतली. आमदार किशोर जोरगेवार यांनीही अनुसूचित जाती आणि ब - 2 या दोन्ही गटातून अर्ज भरले होते. परंतु चाचपणीनंतर त्यांनी माघार घेणेच योग्य समजले. भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनीही तटस्थ भूमिका घेतली. आता एकूण 12 संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. तर दोन तालुक्यातील निवडणूक नव्याने होणार आहे. त्यामुळे 7 जागांसाठी आता निवडणूक होणार आहे.

Chandrapur District Bank board election
Chandrapur Politics : सुधीरभाऊंची धाकधूक वाढणार... जोरगेवारांनी डावच तसा टाकलाय, थेट 'विश्वासू' शिलेदाराच्या खांद्यावर हात!

लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक संपल्यानंतर जिल्ह्याची आर्थिक संस्था असलेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे वेध सर्वांना लागले होते. पण आतापर्यंत जिल्ह्यातील नेत्यांनी सहकार क्षेत्राचे राजकारण फारसे गांभीर्याने घेतले नव्हते. त्यातही भाजपच्या तर नाहीच. जिल्बा बँकेत अगदी अपवादात्मक परिस्थितीत भाजप समर्थक एखादा संचालक असायचा. मात्र, भांगडिया यांनी ही परंपरा मोडीत काढली आहे. सध्या 6 संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. ही संख्या आठच्या घरात जाईल, असे भांगडिया म्हणाले. या बँकेवर भांगडिया यांच्या नेतृत्वात भाजप वर्चस्वाच्या दिशेने वाटचाल करत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com