Chandrapur District Bank : जिल्हा बॅंकेचे न्यायालयात शपथपत्र, भरतीचा मार्ग मोकळा; 'टीसीए'च करणार भरती !

Court : न्यायालयाने ३ मार्च २०२३ रोजी स्थगितीचा आदेश रद्द केला.
Chandrapur District Central Cooperative Bank, LTD.
Chandrapur District Central Cooperative Bank, LTD.Google

Chandrapur District Political News : मागील अठरा महिन्यांपूर्वी रखडलेल्या जिल्हा मध्यवर्ती बॅंकेतील ३६० पदांच्या नोकर भरतीचा मार्ग अखेर मोकळा झाला. बॅंकेने शासन नियुक्त टीसीए (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस) या संस्थेकडून नोकर भरती केली जाईल, असे शपथपत्र न्यायालयात सादर केले. (The court revoked the stay order on 3 March 2023)

न्यायालयाने नोकर भरती प्रक्रियेसाठी संस्थानिवडी संदर्भातील सर्व याचिका निकाली काढल्या. त्यामुळे आता बॅंकेला नोकर भरतीची प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतील ३६० पदांच्या नोकरभरतीला राज्य शासनाने स्थगिती दिली होती. बॅंकेने राज्य शासनाच्या निर्णयाला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

न्यायालयाने ३ मार्च २०२३ रोजी स्थगितीचा आदेश रद्द केला. त्यानंतर लगेच बॅंकेच्यावतीने भरती प्रक्रिया राबविण्यात आली. जेएसआर एक्सामिनेशन सर्व्हिस प्रा. लि. या एजन्सीची नोकरभरतीची प्रक्रिया राबविण्यासाठी निवड केली. याच एजन्सीने यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बॅंकेची नोकरभरती प्रक्रिया राबविली. या भरती प्रक्रियेत अनियमितता झाली, अशा तक्रारी झाल्या.

त्यानंतर या एजन्सीची चौकशी सुरू झाली आहे. तत्पूर्वी, दुसरीकडे सहा मार्च २०२३ बॅंकेला सहकार विभागाकडून एक पत्र आले. त्यात सहकार आयुक्तांच्या स्तरावर पात्र संस्थांची तालिका तयार होईपर्यंत बॅंक स्तरावर ऑनलाइन भरती प्रक्रियेसाठी संस्था निवडीची कारवाई करू नये, असे स्पष्ट आदेश देण्यात आले.

सहकार विभागाने पात्र एजन्सीची निवड करताना १० वर्षांच्या अनुभवाची अट टाकली. त्यामुळे वर्कवेल इन्फो टेक्निकल प्रा. लि. पुणे ही एजन्सी न्यायालयात गेली. न्यायालयाचा अंतिम आदेश होईपर्यंत पात्र संस्थांची तालिका अंतिम करण्याची प्रक्रिया पूर्ण करता येणार नाही.राज्यातील काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांमध्ये रिक्त पद भरणे आवश्यक आहे.

न्यायालयाच्या निकाल येईपर्यंत टीसीएस किंवा आयबीपीएस यांच्याकडून ऑनलाइन पद्धतीने नोकर भरती करावी, असे सहकार विभागाने सुचविले आहे. त्यामुळे नोकर भरतीच्या प्रक्रियेतील गुंतागुंत वाढली आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट होते.

Chandrapur District Central Cooperative Bank, LTD.
Chandrapur Congress : चंद्रपूर काँग्रेसमध्ये नवनियुक्त्या; देवेंद्र बट्टे जिल्हा उपाध्यक्ष, तर झाडेंकडे शहराची धुरा!

शेवटी बॅंकेच्यावतीने आम्ही सहकार खात्याने नियुक्त केलेल्या टीसीए या संस्थेकडून नोकर भरती करण्यास तयार आहोत, असे शपथपत्र न्यायालयात दाखल केले. न्यायालयाने २० ऑक्टोबर २०२३ रोजी नोकर भरती संस्था निवडी संदर्भातील सर्व याचिका निकाली काढल्या. आता बॅंक नोकर भरतीची प्रक्रिया कधी सुरू होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Edited By : Atul Mehere

Chandrapur District Central Cooperative Bank, LTD.
Chandrapur Politics : देवरावदादांचा 'दांडिया' आमदार धोटेंना पटेना; थेट आरोग्यमंत्र्यांकडेच केली तक्रार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com