Chandrapur Congress : चंद्रपूर काँग्रेसमध्ये नवनियुक्त्या; देवेंद्र बट्टे जिल्हा उपाध्यक्ष, तर झाडेंकडे शहराची धुरा!

Chandrapur Congress : राजुरा विधानसभेचा आमदार ठरविण्यात अनेकदा गोंडपिपरी तालुक्याची महत्त्वाची भूमिका...
Chandrapur Congress
Chandrapur CongressSarkarnama

Chandrapur News : विधानसभा निवडणुकांच्या पाश्वभूमीवर आता सगळे पक्ष अलर्ट मोडवर आहेत. अशावेळी एक-एक कार्यकर्ता जोडून ठेवण्याचे आव्हान पक्षासमोर आहे. राजुरा विधानसभा क्षेत्रात गोंडपिपरी तालुका काँग्रेससाठी महत्त्वाची भूमिका बजावतो. मागील निवडणुकीत गोंडपिपरीच्या मतांची पेटी खुलली अन् सुभाष धोटे आमदार झाले.

गोंडपिपरी काँग्रेसमध्ये पक्षाची स्थिती भक्कम असली तरी काँग्रेस कार्यकर्ते राजू झाडे हे शहराध्यक्ष पदाकरिता अडून बसले होते. पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते देवेंद्र बट्टे यांच्याकडे हे पद होते. त्यांनी तरुण व ज्येष्ठांचा समन्वय साधत पक्षाला वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अशावेळी आता आमदार धोटेंनी देवेंद्र बटटे यांना बढती दिली आहे. बटटे यांना जिल्हा उपाध्यक्षपद देण्यात आले आहे. (Latest Marathi News)

Chandrapur Congress
Gautami Patil News : कोथुर्ण्यापूर्वीच चंद्रपूर-गडचिरोलीच्या सीमेवर बघायला मिळणार गौतमीचे ठुमके!

राजुरा विधानसभा क्षेत्रात काँग्रेसची सत्ता आहे. राजुरा विधानसभेचा आमदार ठरविण्यात अनेकदा गोंडपिपरी तालुक्याची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. अशात राजुऱ्यातील आमदारकीसाठी उभे असलेल्या नेत्यांचे गोंडपिपरीमध्ये दौरे वाढले आहेत. देवेंद्र बट्टे हे गोंडपिपरीचे शहर काँग्रेसचे अध्यक्ष होते. सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष असलेल्या बट्टे यांनी विविध उपक्रम राबवित शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला.

एकाच दिवसात नगरातील 141 शेतकऱ्यांना कर्ज मंजूर करीत त्यांनी अनेकांची मनं जिंकली. गोंडपिपरीच नव्हे तर तालुक्यातील युवक व ज्येष्ठांचा समन्वय साधत पक्षाला बळ देण्याचे काम केले. राजू झाडे यांनी दोन वर्षांपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला होता. पक्षाकडून नगरसेवकपदाची निवडणूक लढविली होती, पण अवघ्या सात मतांनी त्यांचा पराभव झाला होता. काँग्रेसमध्ये काम करताना त्यांनी शहराध्यक्षाची अपेक्षा व्यक्त केली होती. देवेंद्र बटटे यांच्याकडे हे पद असल्याने करायचे काय? असा प्रश्न पक्षासमोर आला. यानंतर आमदार सुभाष धोटे यांनी देवेंद्र बट्टे यांची बढती करीत त्यांना थेट जिल्ह्याचे उपाध्यक्ष बनविले.

Chandrapur Congress
Uddhav Thackeray Vidarbha Visit : संजय राठोड, भावना गवळींची धाकधूक वाढविणारा उध्दव ठाकरेंचा विदर्भ दौरा...

भंगाराम तळोधीतून मिळाले युवा नेतृत्व -

गोंडपिपरी युवक काँग्रेसचे अध्यक्षपद हे संतोष बंडावार यांच्याकडे होते. यानंतर विपीन पेद्दुलवार या तरुणाला या पदावर संधी देण्यात आली आहे. पेद्दुलवार हे भंगाराम तळोधी येथील आहेत. भाजपचे गोंडपिपरीचे नेते अमर बोडलावार यांच्या भंगाराम तळोधीत श्रीनीवास कंदनुरीवारांच्या सहकार्याने पेद्दुलवार यांनी जनसंवाद यात्रेतून आपली ताकत दाखविली. तालुक्यातील अनेक युवकांचे संघटन तयार करून विविध मागण्यांचा पाठपुरावा करून पेद्दुलवारांनी पक्षाच्या वरिष्ठांचा नेत्यांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे.

कार्यकर्त्यांत जोश -

32 वर्षांपासून काँग्रेसच्या ताब्यात असलेले बाजार समिती हातून गेल्याने तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांत उदासीनता आली होती, पण आता पराभव विसरून नेते, पुन्हा एकदा नव्या दमाने कामाला लागले आहेत. गेल्या दिवसांत काँग्रेसकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com