Chandrapur Politics : देवरावदादांचा 'दांडिया' आमदार धोटेंना पटेना; थेट आरोग्यमंत्र्यांकडेच केली तक्रार

Subhash Dhote Political News : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांनी निवडणुकांची तयारी चालवली आहे.
Subhash Dhote - Devrao Bhongale
Subhash Dhote - Devrao Bhongale Sarkarnama

Chandrapur News : राजुरा येथील जिल्हा परिषद शाळेला लागून उपजिल्हा रुग्णालय आहे. हा परिसर संवेदनशील परिसर आहे. अशा स्थितीत शासकीय जागेच्या वापराची परवानगी खासगी कार्यक्रमाला मुख्याध्यापकाने दिलीच कशी हा प्रश्न उपस्थित करत आमदार सुभाष धोटे यांनी या प्रकाराची तक्रार थेट आरोग्यमंत्र्यांकडे केली आहे. रुग्णांच्या सुरक्षेची बाब लक्षात घेता येथे होत असलेला दांडिया कार्यक्रम रद्द करण्याची मागणी धोटेंनी केली आहे. आता या मुद्द्यावर आमदार सुभाष धोटे व भाजपचे देवराव भोंगळे आमने-सामने आले आहेत.

भाजपने देवराव भोंगळे(Devrao Bhongale) यांना राजुरा विधानसभा प्रमुखाची जबाबदारी दिली. यानंतर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवारांच्या उपस्थितीत त्यांच्या कार्यालयाचे भव्यदिव्य उद्घाटन करण्यात आले. राजुरा विधानसभा क्षेत्राची जबाबदारी मिळताच भोंगळे सध्या फुल फार्ममध्ये बॅटिंग करताहेत. नवरात्रीच्या निमित्ताने त्यांनी राजुऱ्यात ‘दादांचा’ दांडिया हा उपक्रम सुरू केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Subhash Dhote - Devrao Bhongale
Shoumika Mahadik News : 'गोकुळ'मधला वाद चिघळणार ; शौमिका महाडिकांनी केली दहा दिवसांनी भूमिका जाहीर

दरम्यान, एका नागरिकाने या प्रकाराची तक्रार आमदार धोटेंकडे केल्यानंतर दादांचा त्या ठिकाणचा दांडिया आमदारांना पटेनासा झाला आहे. त्यांनी त्या ठिकाणी होत असलेल्या दांडिया करण्याची तक्रार राज्याच्या आरोग्यमंत्र्यांकडे केली आहे. आता या मुद्द्यावर आमदार सुभाष धोटे(Subhash Dhote) व भाजपचे देवराव भोंगळे आमने-सामने आले आहेत.

दादांचा दांडिया का नकोसा...

राजुरा येथे उपजिल्हा रुग्णालयाला लागून जिल्हा परिषदेेची शाळा आहे. या शाळेला शंभर वर्षाची परंपरा आहे. शाळेच्या पटांगणावर देवदाव भोंगळे यांच्या पुढाकारातून दांडिया महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी रात्री दांडियाचा कार्यक्रम घेण्यात येत आहे. दांडियाच्या कर्कश व अतितीव्र आवाजामुळे रुग्णालयात भरती असलेल्या लहान बाळांपासून, गरोदर माता व अनेक वयोवृद्धांना मोठा त्रास होत आहे. एका सूज्ञ नागरिकाने आमदार सुभाष धोटे यांना हा प्रकार लक्षात आणून दिला. यानंतर धोटे अॅक्शन मोडवर आले.

मुख्याध्यापकांवर आक्षेप...

उईके हे राजुरा येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक आहेत. गेल्या शंभर वर्षांची शाळेची परंपरा या वर्षी मोडीत निघाल्याचे आमदार धोटेंचे म्हणणे आहे. या शाळा स्वतःच्या मालकीची असल्याप्रमाणे मुख्याध्यापकांनी दांडिया महोत्सवाला परवानगी दिली. परवानगी देताना शाळा व्यवस्थापन समिती व शहरातील कुठल्याही गणमान्यांना विचारात न घेता त्यांनी स्वतंत्र हा निर्णय घेेतला. यामुळे एका जाणकाराने आमदार सुभाष धोटेंना याबाबतचे निवेदन दिले. यामुळे धोटे प्रचंड संतापले आहेत. त्यांनी मुख्याध्यापकाच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप नोंदविला आहे. मुख्याध्यापकाची तक्रार शालेय शिक्षण विभागाच्या सचिवाकडे करण्यात आली आहे.

मुख्याध्यापकावर आक्षेप...

उईके हे राजुरा येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक आहेत. गेल्या शंभर वर्षांची शाळेची परंपरा या वर्षी मोडीत निघाल्याचे आमदार धोटेंचे म्हणणे आहे. ही शाळा स्वत:च्या मालकीची असल्याप्रमाणे मुख्याध्यापकांनी दांडिया महोत्सवाला परवानगी दिली. परवानगी देताना शाळा व्यवस्थापन समिती व शहरातील कुठल्याही गणमान्यांना विचारात न घेता त्यांनी स्वतंत्र हा निर्णय घेेतला. यामुळे एका जाणकाराने आमदार सुभाष धोटेंना याबाबतचे निवेदन दिले. यामुळे ते प्रचंड संतापले आहेत. त्यांनी मुख्याध्यापकाच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप नोंदविला आहे. मुख्याध्यापकाची तक्रार शालेय शिक्षण विभागाच्या सचिवाकडे करण्यात आली आहे.

Subhash Dhote - Devrao Bhongale
Nilesh Lanke News : लंकेंचे पत्ते ओपन होत असताना राम शिंदेंची भूमिका 'गुलदस्त्यात'!

धोटे,भोंगळे आमने सामने

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांनी निवडणुकांची तयारी चालवली आहे. आमदार सुभाष धोटेंनी आपले दौरे वाढविले आहेत.तर देवराव भोंगळे विधानसभा क्षेत्रात विविध उपक्रम राबवित आहेत.भोंगळेंच्या दादा दांडियावर आमदार सुभाष धोटेंनी प्रहार केला आहे.यामुळे निवडणुका लागण्यापुर्वीच आमदार सुभाष धोटे व देवराव भोंगळे आमनेसामने आले आहेत.या प्रकाराची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगू लागली आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Subhash Dhote - Devrao Bhongale
Dharashiv Congress Politics : मधुकर चव्हाणांच्या मदतीला लातूरचे देशमुख; कारखानदारीतून काॅंग्रेसला बळ मिळणार...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com