राष्ट्रवादीला मोठा धक्का : चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांचा तडकाफडकी राजीनामा

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी आपल्या मर्जीतील माणूस न नेमल्याने वैद्य हे दुखावले होते.
 Rajendra Vaidya
Rajendra VaidyaSarkarnama
Published on
Updated on

चंद्रपूर : पदाधिकारी निवडीवरून नाराज झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) चंद्रपूर (Chandrapur) जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य (Rajendra Vaidya) यांनी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा (resigns) दिला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी आपल्या मर्जीतील माणूस न नेमल्याने वैद्य हे दुखावले होते, त्यातून त्यांनी पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीत नाराजी नाट्य रंगल्याने पक्ष कार्यकर्ते हवालदिल झाले आहेत. (Chandrapur District President of NCP Rajendra Vaidya resigns)

नितीन भटारकर यांना पक्षाने बढती देत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदावरून त्यांना प्रदेश कार्याध्यक्ष करण्यात आले आहे. भटारकर यांच्या रिक्त जागेवर मर्जीतील माणसाची निवड करावी, असा जिल्हाध्यक्ष वैद्य यांनी आग्रह होता. या पदासाठी वैद्य यांनी राकेश सोमाणे यांचे नाव पक्षाला सुचविले होते. मात्र, पक्षाकडून फैय्याज शेख यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपदी निवड केली हेाती. तेव्हापासून राजेंद्र वैद्य हे पक्षावर नाराज होते, त्यामुळे वैद्य यांनी नाराजी व्यक्त करत पक्षनेतृत्वाकडे राजीनामा पाठविला होता.

 Rajendra Vaidya
मोठी बातमी : माजी मंत्री दिलीप सोपलांच्या बंगल्यावर स्फोटकं फेकली; बार्शीत खळबळ!

काँग्रेसमधून २००४ मध्ये राष्ट्रवादीत आलेले राजेंद्र वैद्य यांच्या पक्षाने लागलीच जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली होती. ते तब्बल १० वर्षे म्हणजे २०१४ पर्यंत त्या पदावर कायम होते. त्यानंतर मात्र संदीप गड्डमवार यांच्याकडे पक्षाने जिल्हाध्यक्षपद दिले होते. मात्र, गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गड्डमवार यांनी शिवसेनेत प्रवेश केला हेात. त्यानंतर जिल्हाध्यक्षपदाची धुरा पुन्हा वैद्य यांच्याकडे आली हेाती. वैद्य हे २०१९ पासून आजपर्यंत पदावर होते. मात्र, मर्जीतील माणसांवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसी न सोविल्याने ते नाराज झाले हेाते.

 Rajendra Vaidya
राजन पाटील-प्रशांत परिचारकांनी धुडकावली महाडिकांची विनंती; अखेर ‘भीमा’ची निवडणूक लागली

मधल्या काळात वैद्य यांचे राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांशी चांगलाच संपर्क वाढला हेाता. मात्र, पक्षातील गटबाजी त्यांना थोपवता आली नव्हती. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या दौऱ्यावेळी पक्षातील दुफळी प्रकर्षाने दिसून आली हेाती. त्याचा परिणाम म्हणजे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांचा राजीनामा असे मानले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com