
भद्रवती तालुक्यातील कुरोडा गावातील एका शेतकऱ्याने तहसील कार्यालयात जाऊन विष प्रशासन केले होते. यात त्याचा मृत्यू झाला आहे. मृताच्या कुटुंबीयांनी खासदार प्रतिभा धानोरकर यांचे पती बाळू धानोकर आणि त्यांचे भाऊ अनिल धानोरकर यांनी आपली जमीन बळकावली असल्याचा आरोप केला आहे. धानोरकर कुटुंबाने हे आरोप फेटाळून लावले असले तरी आता शेतजमीनीच्या व्यवहाराच्या कागदपत्रावरून खासदार आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झाल्या आहेत.
परमेश्वर मेश्राम यांच्याकडे साडे आठ एकर शेती होती. 2006 मध्ये मेश्राम यांनी खासदार बाळू धानोरकर यांच्याशी ही जमीन विकण्याचा सौदा केला होता. खरेदी विक्रीचे ॲग्रिमेंट झाल्यानंतर धानोरकर यांनी दिलेले चेक बाऊंस झाले. त्याविरोधात मेश्राम यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने मेश्राम यांच्या बाजूने निर्णय दिला. न्यायालयात खटला जिंकल्यानंतरही जमीन मेश्राम यांच्या नावावर करून देण्यास अधिकारी टाळाटाळ करीत होते. खासदारांचा दबाव असल्याने अधिकारी मेश्राम यांना परतावून लावत होते.
सेवा पंधरवड्यात मेश्राम पुन्हा तहसील कार्यालयात आपल्या जमिनीचे काय झाले अशी विचारणा करण्यासाठी गेले होते. मात्र पुन्हा अधिकाऱ्यांनी त्यांना तेच उत्तर दिले. शेवटी मेश्राम यांनी तहसील कार्यालयात विषाची बाटली तोंडला लावली. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. मेश्राम यांना तातडीने दवाखान्यात दाखल केले होते.
मात्र सहा दिवसानंतर त्यांचा मृत्यू झाला. प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन तडकाफडकी भद्रावतीचे तहसीलदार राजेश भंडारकर आणि नायब तहसीलदार सुधीर खांडे यांना निलंबित केले. मात्र मेश्राम यांच्या कुटुंबीयांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला आहे. जोपर्यंत आमची जमीन नावावर केली जात नाही तोपर्यंत मृतदेह नेणार नाही अशी भूमिका घेतली आहे.
मात्र यात आता खासदार धानोरकर यांचे नाव पुढे आल्याने प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. खासदार प्रतिभा धानोरकर आणि अनिल धानोरकर हेच परमेश्वर मेश्राम यांच्या मृत्यूला कारणीभूत आहेत. त्यांचा दबाव असल्याने अधिकारी आमची जमीन नावावर करून देत नव्हते. सात एकर शेतीवर जोपर्यंत आमच्या नावाची नोंद केली जात नाही तोपर्यंत परमेश्वर मेश्राम यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जाणार नाहीत. धानोरकर यांच्या ताब्यातून जमीन मोकळी करून द्या तोपर्यंत आम्हाला पोलिसांची संरक्षण द्यावे अशी मागणी मेश्राम यांच्या कुटुंबीयांनी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.