
Maharashtra BJP politics news : भाजप आमदार, मंत्री यांच्यातील राजकीय संघर्ष चांगलाच उफाळून समोर येऊ लागला आहे. बीडमधील मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार सुरेश धस यांच्यातील राजकीय संघर्षाने टोक गाठलेले असून पक्षातील वरिष्ठांपर्यंत पोचला असतानाच, चंद्रपूरमधील पालकमंत्री अशोक उईके आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्यात देखील संघर्ष उफाळलेला दिसतो.
चंद्रपूर जिल्ह्यातील शांतता-सुव्यवस्था ढासळल्यावरून दोघांमध्ये हा संघर्ष पेटला आहे. शिस्तप्रिय भाजपला सत्तेत समन्वय साधून काम करता येईना, असेच यावरून दिसते आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील शांतता-सुव्यवस्थेवरून पालकमंत्री अशोक उईक आणि भाजप (BJP) आमदार किशोर जोरगेवार यांच्यातील राजकीय संघर्ष, मनभेद ठळकपणे समोर आला आहे. चंद्रपूरचे भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी विधानसभा सभागृहात चंद्रपूर जिल्ह्यात बिघडलेल्या शांतता-सुव्यवस्थेवर हल्लाबोल चढवला.
पोलिसांवर झालेला जीवघेणा हल्ला, काँग्रेस (Congress) शहराध्यक्ष राजू रेड्डी यांच्या घरावर झालेला गोळीबार, अमली पदार्थांची आवक, वाढती गुन्हेगारी यावरून आमदार किशोर जोरगेवार यांनी विधानसभा सभागृहाचे लक्ष वेधले. ही वाढती गुन्हेगारी कमी करण्यासाठी पोलिस प्रशासनात फेरबदल करण्याची मागणी केली आमदार जोरगेवार यांनी केली.
आमदार जोरगेवार यांनी उपस्थित केलेल्या गंभीर प्रश्नाला चंद्रपूरचे पालकमंत्री अशोक उईके यांनी फेटाळले. आपल्याच पक्षातील आमदाराचे म्हणणे खोडून काढून, सभागृहात त्यांना तोंडघशी पाडले. चंद्रपूर जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था उत्तम असून, पोलिस आपले काम करीत आहेत, अशी प्रतिक्रिया मंत्री उईके यांनी दिली.
आमदार जोरगेवार आणि पालकमंत्री उईके यांच्यातील हा राजकीय संघर्ष सभागृहात उफाळल्याने तो चर्चेचा ठरला आहे. बीडमधील भाजप मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार सुरेश धस यांच्यातील राजकीय संघर्षाने टोक गाठले आहे. शिस्तप्रिय भाजपमधील आमदार अन् मंत्र्यांमधील कोणत्या-कोणत्या कारणावरून होत असलेला संघर्ष पक्ष संघटनेवर परिणाम करणारा ठरतो की काय, अशी आता चर्चा होऊ लागली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.