Chandrapur Politics: काँग्रेस कि भाजप? कुणालाही मत द्या, नगराध्यक्ष RSSचाच होणार

Chandrapur Municipal Election RSS vs RSS: नगराध्यक्षपदासाठी या दोन्ही स्वयंसेवकांमध्ये सामना होणार आहे. दोन्ही बाजूने स्वयंसेवक असल्याने भाजप व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची अवस्था इकडे आड तर तिकडे विहीर अशी झाली आहे.
Chandrapur Politics.
Chandrapur Politics.Sarkarnama
Published on
Updated on

Chandrapur: नगर पालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुकीपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक चांगलेच चर्चेत आले आहेत. निष्ठावान म्हणून स्वयंसेवकाची ओळख आहे. मात्र सत्तेपुढे निष्ठा आणि शहाणपण चालत नाही, असे म्हणतात हेच खरे असल्याचे दिसून येते.

चंद्रपूर जिल्ह्यातील नगर पालिकेत भाजप आणि काँग्रेस दोघांनीही संघाच्या स्वयंसेवकाला तिकीट दिले आहे. नगराध्यक्षपदासाठी या दोन्ही स्वयंसेवकांमध्ये सामना होणार आहे. दोन्ही बाजूने स्वयंसेवक असल्याने भाजप व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची अवस्था इकडे आड तर तिकडे विहीर अशी झाली आहे.

भद्रावती नगर पालिकेत काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने युती केली आहे. या युतीने नगराध्यक्षपदासाठी सुनील नामोजवार यांना उमेदवारी दिली आहे. ते कट्टर स्वयंसेवक आहेत. भद्रावतीचे ते पहिले नगराध्यक्ष होते. तेव्हा ते भाजपमध्ये होते. यावेळी त्यांनी चक्क काँग्रेसमध्ये उडी घेऊन नगराध्यक्षपदासाठी दावेदारी केली आहे.

विशेष म्हणजे बहुजनांसाठी लढणाऱ्या वंचितनेसुद्धा त्यांच्या नावावर आक्षेप घेतला नाही. दुसरीकडे शिवसेना, काँग्रेस, वंचित अशा उड्या मारणाऱ्या अनिल धानोरकर यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळताच धानोरकर यांनीसुद्धा संघाचा गणवेश परिधान केला आहे. ते चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांचे दीर आहेत.

Chandrapur Politics.
Aaishvary Thackeray: बाळासाहेब ठाकरेंचा नातू टॉप ट्रेडिंगमध्ये! काय आहे कारण

माजी खासदार स्व. बाळू धानोरकर यांचे भाऊ आहेत. प्रतिभा धानोरकर खासदार झाल्यानंतर अनिल धानोरकर यांनी विधानसभेवर दावा केला होता. मात्र त्यांना तिकीट नाकारण्यात आले. त्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये उडी घेतली. यावरून धानोरकर कुटुंबात चांगलेच मतभेद निर्माण झाले होते. सासू व सून एकमेकींच्या विरोधात ठाकल्या होत्या. मात्र अनिल धानोरकरांचे प्रयत्न अपयशी ठरले.

आता त्यांनी पुन्हा एकदा भाजपाकडे आपला मोर्चा वळवला. भद्रावती नगर पालिकेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार झाले आहेत. ते यापूर्वी दोन वेळा नगराध्यक्ष होते. भद्रावतीचे पहिले नगराध्यक्ष राहिलेल्या सुनील नामोजवार यांना त्यांनी पराभूत केले होते. आता नागोजवार काँग्रेसचे उमेदवार आहेत तर धानोरकर भाजपचे. दोघांनी पक्ष बदलले आणि निष्ठाही बदलल्या आहेत. या मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या मोठी आहे. मात्र काँग्रेस आणि भाजप दोघांचेही उमेदवार स्वयंसेवक असल्याने यापैकी कोणाची एकाची निवड केली तरी त्यांचे मत संघालाच जाणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com