Mayor Election 2026: काँग्रेस, भाजपचे नगरसेवक कोणाच्या संपर्कात; चंद्रपूरमध्ये कोण होणार महापौर?

Chandrapur Mayor election: सत्ता स्थापन करण्यासाठी त्यांना आणखी सात तर भाजपला ११ नगरसेवकांची गरज आहे. त्यामुळे मोठी संभ्रमाची स्थिती स्थापन झाली आहे. फोडाफोडीला वेग आला आहे.
Mayor Election 2026
Mayor Election 2026Sarkarnama
Published on
Updated on

Nagour News: चंद्रपूर महापालिकेत जादुई आकडा कुठल्याच पक्षाला गाठता आला नाही. सर्वात मोठा काँग्रेस असला तरी सत्ता स्थापन करण्यासाठी त्यांना आणखी सात तर भाजपला ११ नगरसेवकांची गरज आहे. त्यामुळे मोठी संभ्रमाची स्थिती स्थापन झाली आहे. फोडाफोडीला वेग आला आहे.

उद्धव सेनेच्या सहा नगरसेवकांवर सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. यातच काँग्रेसच्या काही नगरसेवकांना नागपूरमध्ये हलवण्यात आले आहेत. भाजपच्या नेत्यांनी ते आमच्या संपर्कात असल्याचे विधान केल्याने काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे.

काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवारांनी हे वृत्त खोडून काढले. आमचे नगरसेवक आमच्याच संपर्कात आहेत आणि आम्हीच सत्ता स्थापन करणार आहोत आणि भाजपचेच काही नगरसेवक आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. यामुळे मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसची सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यक संख्याबळ आम्ही जमवले आहे. काँग्रेसचे नगरसेवक भाजपच्या संपर्कात ही भाजप नेत्यांची विधान म्हणजे हवेतील पतंगबाजी असल्याचा टोला विजय वडेट्टीवार यांनी लगावला. काँग्रेस पक्षाचा नेता म्हणून चंद्रपुरात काँग्रेसची सत्ता स्थापन करणे आणि तिथला महापौर बसवणे ही आमची प्राथमिकता आहे.

Mayor Election 2026
Manikarnika Ghat: काशीतील मणिकर्णिका घाट! चितेवर का लिहिला जातो 94' अंक? काय आहे रहस्य

त्यासाठी आवश्यक संख्याबळ आम्ही गोळा केले आहे. चंद्रपुरात कुणालाही तोडफोड करणे, नगरसेवक पळवणे यासाठी स्कोप नाही. त्यामुळे कोणी काहीही विधाने केली तरी काँग्रेसचाच महापौर होणार असे सांगून वडेट्टीवार यांनी भाजपच्या दाव्यातील हवा काढली. या उलट भाजपचेच नगरसेवक आमच्या संपर्कात असल्याचा दावाही त्यांनी केला. चंद्रपुरात जनतेने काँग्रेसला कौल दिला असल्याने तिथे जनतेला अपेक्षित असा काँग्रेसचा महापौर होणार असे वडेट्टीवार म्हणाले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहा नगरसेवक निवडून आले आहेत. राज्यात महाविकास आघाडी आल्याने या नगरसेवकांना चंद्रपुरात सोबत घेण्याबाबत चर्चा सुरू आहे. महापौर पदावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दावा केला. मात्र तो त्यांचा अधिकार आहे. त्यांचे फक्त सहा नगरसेवक निवडून आले आहेत.

कोणाला काय द्यायचे, कुठे स्थान द्यायचे आणि कुठली पदे द्यायची याची शिवसेना पक्षातील पक्षश्रेष्ठींशी चर्चा असल्याचे वडेट्टीवारांनी सांगितले. चंद्रपूर महापालिकेत भाजपचे २३ आणि शिंदे सेनेचा एक नगरसेवक निवडून आला आहे.

एमआयएम एक, बसप एक, वंचित दोन आणि जनविकास सेनेचे दोन नगरसेवक आहेत. उद्धव सेनेने नकार दिल्यास सत्ता स्थापनेसाठी सर्वांना भाजपला गोळा करावे लागणार आहे. हे अवघड असले तरी अशक्य नाही. त्यामुळे चंद्रपूरच्या महापौराबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com