BJP Politics : भाजपची महापालिका उमेदवार यादी परस्पर बदलली, सुधीरभाऊंनाही जाहीरपणे नडले : आमदार अन् जिल्हाध्यक्षाला मोठा दणका

BJP Politics : चंद्रपूर महापालिका निवडणुकीआधी भाजपने शहराध्यक्ष सुभाष कासमगुट्टावार यांची हकालपट्टी केली आहे. उमेदवार यादीत बदल आणि एबी फॉर्म वाटपाचा आरोप त्यांच्यावर होता. ही कारवाई आमदार किशोर जोरगेवार यांच्यासाठी धक्का मानली जात आहे.
Kishor Jorgewar, Sudhir Mungantiwar
Kishor Jorgewar, Sudhir MungantiwarSarkarnama
Published on
Updated on

BJP Politics : भाजपच्या चंद्रपूर महानगर जिल्हाध्यक्षपदावरून सुभाष कासमगुट्टावार यांची तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मंजूर केलेली महापालिका उमेदवारांची यादी आमदार किशोर जोरगेवार यांच्या दबावात परस्पर बदलल्याचा आणि एबी फॉर्म दिल्याचा आरोप त्यांच्यावर होता. ही कारवाई आमदार जोरगेवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

महापालिका निवडणूक उमेदवार निश्चितीसाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात काही दिवसांपूर्वी दोन बैठका झाल्या होत्या. विदर्भ विभागाचे संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर, आमदार सुधीर मुनगंटीवार, किशोर जोरगेवार, माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर, सुभाष कासमगुट्टावार या सर्वांची या बैठकीला उपस्थिती होती.

यातील एका बैठकीत मुनगंटीवार व जोरगेवार यांच्यात जोरदार वादावादी झाली होती. यानंतर सर्वेक्षणानुसार उमेदवारी देऊ असे ठरले. यानुसार बहुतांश उमेदवार मुनगंटीवार यांनी सुचवलेले निघाले. यावर सर्वक्षण बोगस आहे असे म्हणत कासमगुट्टावार यांनी मुनगंटीवार आणि त्यांच्या उमेदवारांना विरोध केला. यानंतर प्रदेश कार्यालयाकडे मुनगंटीवार व जोरगेवार या दोघांनीही सुचवलेली उमेदवारांची नावे पाठविण्यात आली.

प्रदेश कार्यालयातून रवींद्र चव्हाण यांच्या सहीने अंतिम उमेदवार यादी चंद्रपूरला पाठवण्यात आली आणि याच यादीनुसार सर्व उमेदवारांना तिकीट देण्याचे ठरले. पण कासमगुट्टावार यांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या संगनमताने परस्पर उमेदवारांची नावे बदलली आणि एबी फॉर्म वाटप केले. याच प्रकारानंतर आता प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कासमगुट्टावार यांच्यावर कारवाई करत महानगर जिल्हाध्यक्ष पदावरून त्यांची हकालपट्टी केली आहे.

Kishor Jorgewar, Sudhir Mungantiwar
BJP Congress भाजपसोबत काँग्रेसचं ‘सेटिंग ? आघाडी तोडल्यानं पवारांच्या राष्ट्रवादीची शंका

सुधीर मुनगंटीवार यांना पुन्हा ताकद :

चंद्रपूर जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकीतील दारुण पराभवानंतर भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना पुन्हा ताकद देण्याचे धोरण स्वीकारले आहे. यापूर्वी चंद्रपूर महानगरपालिकेची निवडणूक मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात होईल असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मागील आठवड्यात स्पष्ट केले होते. त्यानंतर आता कासमगुट्टावार यांचीही हकालपट्टी करण्यात आली आहे.

यापूर्वी सुधीर मुनगंटीवार हे चंद्रपूर भाजपचे सर्वेसर्वा होते. त्यांच्याच नेतृत्वात भाजपने चंद्रपूर महापालिकेची निवडणूक लढवली अन् जिंकलीही होती. पण लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर मुनगंटीवार यांचे पंख कापायला सुरुवात झाली. त्यांच्या विरोधानंतरही किशोर जोरगेवार यांचा भाजप प्रवेश करून घेण्यात आला. मंत्रि‍पदावरून डावलण्यात आले.

Kishor Jorgewar, Sudhir Mungantiwar
BJP internal conflict : फिल्डिंग लावून पत्ता कट, भाजप इच्छुक उमेदवार संतापला; किशोर जोरगेवारांचं दहा वर्षांपूर्वीचं 'फॉर्महाऊस कांड' काढून बसला

शिवाय कमी मतं मिळूनही चंद्रपूर महानगरचे जिल्हाध्यक्षपद किशोर जोरगेवार यांच्या गटातील कासमगुट्टावार यांना दिले. महापालिका निवडणुकीची जबाबदारीही जोरगेवार यांच्याकडेच दिली. पण नगरपालिका निवडणुकीतील पराभवानंतर मुनगंटीवार यांना प्रदेश भाजप पुन्हा ताकद देत असल्याचे दिसत आहे.

मुनगंटीवार यांनी नगरपालिका निकालानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. याच भेटीनंतर महापालिका निवडणुकांची पुन्हा मुनगंटीवार यांच्याकडे आली होती. यानंतर चार दिवसांमध्येच कासमगुट्टावार यांचीही हकालपट्टी झाली आहे. हे सगळे निर्णय त्याच पार्श्वभूमीवर झाल्याचे बोलले जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com