Shiv Sena UBT support BJP : लाज, चूक अन् ठाकरेसेना; सपकाळांच्या एका वाक्याने महाराष्ट्रात राजकीय भूकंप!

Chandrapur Mayor Poll: Sapkal Reacts to BJP Support for Sena UBT : चंद्रपूर महापालिकात महापौरपदासाठी शिवसेना ठाकरे सेनेने भाजपला दिलेल्या पाठिंब्यावर काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ यांनी मोठी प्रतिक्रिया दिली.
Harshwardhan Sapkal reaction
Harshwardhan Sapkal reactionSarkarnama
Published on
Updated on

Chandrapur Mayor election : चंद्रपूर महापालिकेत महापौरपदासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेने भाजपबरोबर केलेल्या युतीवरून, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मोठं विधान केलं आहे.

'ठाकरे सेनेने भाजपला पाठिंबा देऊन राज्यात सर्वात मोठी चूक केली आहे,' असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. काँग्रेसच्या सपकाळ यांच्या या विधानाने राज्यातील राजकारण आगामी काळात ढवळून निघणार असे दिसते आहे. महाविकास आघाडीत एकत्र असलेले काँग्रेस अन् शिवसेना ठाकरे सेना पक्ष कोणता निर्णय घेणार, याकडे लक्ष लागलं आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, "खरंतर ठाकरे सेना आणि आम्ही मिळून भाजपला (BJP) थांबवण्याची आवश्यकता होती. मात्र खरं काय आणि खोटं काय? हे ठाकरे सेनेने स्पष्ट करणे आता महत्त्वाचे आहे. ठाकरे सेनेने थेट भाजपला पाठिंबा देऊन महाराष्ट्रात ही मोठी चूक केली आहे."

'स्थानिक पातळीवरील लोक उलट्या बोंबा मारताहेत, खरंतर आम्हाला वंचितसोबत ठाकरे सेनेचे चंद्रपूरमध्ये गरज होती. आम्ही त्यांना उपमहापौरपद, स्थायी समितीचे अध्यक्षपद देत होतो. याबाबत भविष्यात आमची बोलणी सुरू होती. मात्र तसं घडलं नाही,' असे हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी म्हटले.

Harshwardhan Sapkal reaction
sunetra pawar delhi visit : ‘डबल रोल’वर सुनेत्रा पवार? उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं; खासदारकीबाबत तटकरेंनी दिली मोठी अपडेट

'चंद्रपूर महापालिकेतील महापौर आणि सत्तेतील वाटपाबाबत आम्ही ठाकरे सेनेच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलणी केली होती. आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्या संपर्कात आम्ही होतो. मात्र स्थानिक पातळीवरील नेत्यांनी, अक्षम्य गोंधळ घातला,' असा गंभीर आरोप सपकाळ यांनी केला.

Harshwardhan Sapkal reaction
Postage Stamp Black Market : पोस्ट ऑफिसचं ‘तिकीट’ बनलं काळाबाजाराचं सोनं! मुंबई पोलिसांची दिल्लीमध्ये थेट धडक, टोळीचा भांडाफोड

लाज कशी गेली हे...

शिवसेना ठाकरे सेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसच्या भूमिकेवर जोरदार हल्ला चढवत, लाज वाटली पाहिजे, असा टोला लगावला होता. यावर हर्षवर्धन सपकाळ यांनी, कुणा इतरांची लाज काढण्यापेक्षा, चंद्रपूरमध्ये लाज कशी गेली हे शोधून काढणं महत्त्वाचं आहे. मतदानाच्या वेळी सभागृहात आम्ही एकसंघ होतो, ठाकरे सेनेचे आठ जर, आम्हाला मिळाले असते तर, परिस्थिती वेगळी असती, असे सांगितले.

रोहित पवारांच्या शंका गंभीर

रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघातावर पत्रकार परिषदे केलेल्या मांडणीवर, केलेलं प्रेझेंटेशन हे वस्तुनिष्ठ आहे. अजितदादांचा घातपात आहे हे, जवळपास सिद्ध होण्याच्या जवळ आलेलं आहे, अशी गंभीर टिप्पणी हर्षवर्धन सपकाळ यांनी नोंदवली.

बदला हा आमचा भाव नाही

चंद्रपूरमध्ये ठाकरे सेनेने भाजपला साथ दिली. परभणीत त्याचा वचपा घेणार का, ठाकरे सेनेला महापौरपदापासून रोखणार का, यावर हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, "बदला हा आमचा भाव नाही. आम्ही नीती मूल्यावर चालणारी लोक आहोत. मात्र एकंदरीत चंद्रपूरच्या घटनेने महाराष्ट्रातील काँग्रेसचा कार्यकर्ता दुखावल्या गेला आहे. यानंतर जी काही कारवाई किंवा चर्चा व्हायला हवी होती, ती झाली नाही."

'वंचित'ने तरी कारवाई केली...

''वंचित'ने काही प्रमाणात का होईना कारवाई केली. मात्र ठाकरे सेनेने आमच्यावर उलटे आरोप केले आहेत. हे आम्ही खपवून घेणार नाही. या ठिकाणी आम्ही भाजपसोबत जाण्याचा प्रश्नच नाही. मात्र ठाकरे सेनेच्या बाबतीत स्थानिक आमच्या नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ,' असे सूचक हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com