Chandrapur Mayor: चंद्रपूरमधील काँग्रेसच्या पराभवाचा पहिला राजकीय बळी : भाजपला मदत करणारी 'वंचितची' कार्यकारिणी बरखास्त

Chandrapur Mayor Election 2026 :चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये महापौर निवडणुकीत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. अखेर भाजपाचा महापौर विराजमान झाला आहे. काल झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या संगीता खांडेकर यांनी काँग्रेसच्या उमेदवारावर अवघ्या एका मताने मात करत बाजी मारली.
Prakash Ambedkar
Prakash AmbedkarSarkarnama
Published on
Updated on

Chandrapur News: चंद्रपूर महानगरपालिका महापौर निवडणुकीत आज भाजपच्या झालेल्या अनपेक्षित विजयानंतर कारवाईला सुरुवात केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष स्नेहल रामटेके यांची हकालपट्टी करण्यात आली तसेच त्यांनी केलेल्या सर्व नियुक्तींना देखील स्थगिती देण्यात आली आहे

महापौरपदाच्या निवडणुकीत चंद्रपूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या उमेदवार सोनाली महाडूळे यांचा एका मताने पराभव झाला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि अपक्षांच्या साथीने भाजपच्या उमेदवार संगीता खांडेकर यांचा विजय झाला. महाडूळे यांना 31 आणि खांडेकर यांना 32 मते मिळाली आहेत. काल (मंगळवारी) झालेल्या भाजपच्या अनेपेक्षित विजयानंतर पक्षाविरोधात कारस्थान करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरवात झाली आहे.

महापौर निवडणुकीत चंद्रपूरमधील काँग्रेसच्या पराभवाचा पहिला राजकीय बळी पडला आहे. भाजपला मदत करणारी करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीची शहर कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश वंचित बहुजन विकास आघाडीचे महासचिव किसन चव्हाण पत्राव्दारे दिले आहेत.

चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये महापौर निवडणुकीत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. अखेर भाजपाचा महापौर विराजमान झाला आहे. काल झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या संगीता खांडेकर यांनी काँग्रेसच्या उमेदवारावर अवघ्या एका मताने मात करत बाजी मारली. एकूण ६६ सदस्य संख्या असलेल्या चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीवेळी वंचित बहुजन आघाडीचे दोन नगरसेवक अनुपस्थित राहिले.

एमआयएमच्या एका नगरसेवकाने तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बहुमतासाठी आवश्यक असलेला आकडा ३२ पर्यंत खाली आला. त्यात भाजपच्या संगीता खांडेकर या ३२ मते घेऊन विजयी झाल्या. तर ३१ मते मिळवणाऱ्या काँग्रेसच्या महापौरपदाच्या उमेदवार सोनाली महाडूळे यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला.

Prakash Ambedkar
DCM Sunetra Pawar: अजितदादांच्या खुर्चीवर बसल्यानंतर सुनेत्रावहिनींची भावूक पोस्ट...पार्थ पवारांना अश्रू अनावर

महापालिका निवडणुकीत चंद्रपूरमध्ये दुसऱ्या स्थानी असतानाही भाजपनं चंद्रपूर महापालिकेचा सत्ता स्थापनेची मॅजित फिगर गाठली. ठाकरेंच्या शिवसेनेनं दिलेल्या पाठिंब्यामुळं भाजपनं चंद्रपूरचा गड सर केला आहे. खांडेकर यांनी अवघ्या एका मताच्या फरकाने महापौरपदाची निवडणूक जिंकली. ठाकरेंच्या पक्षानं भाजपला साथ दिल्यानं काँग्रेसच्या हातातोडांशी आलेली सत्ता हिरावले गेली.

सत्तास्थापनेसाठी आम्ही भाजपसोबत जाणार नाही, असे स्पष्ट मत ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले होते. पण चंद्रपुरातील ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राऊतांच्या मताला केराची टोपली दाखवली. चंद्रपुरातील ठाकरेंच्या शिवसेनेनं थेट भाजपला पाठिंबा दिला आहे. चंद्रपुरात भाजपनं शिवसेना उबाठाला सव्वा वर्षानंतर महापौरपद देण्याचं आश्वासन दिलं आहे. त्याचसोबत पहिल्या आणि चौथ्या वर्षी स्थायी समितीचं अध्यक्षपद ठाकरेंच्या शिवसेनेला दिलं जाणार आहे.

वडेट्टीवार-धानोरकरांमधील गटबाजी कारणीभूत

  • चंद्रपुरात 27 जागा मिळवून सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या काँग्रेसला विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली.

  • आमदार विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकरांमधील गटबाजी याला कारणीभूत ठरलीय.

  • निवडणुक निकालानंतर काँग्रेसचे नगरसेवक दोन गटात विभागले गेले होते. गटनोंदणी दरम्यान ती गटबाजी चव्हाट्यावर आली होती.

  • पक्षश्रेष्ठींच्या कानपिचक्यानंतर महापौरपदाच्या निवडणुकीत हे दोन्ही गट एकत्र आले होते.

  • भाजपनं राजकीय खेळी करत काँग्रेसला सत्तेबाहेर ठेवण्यात यश मिळवलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com