Chandrapur Police Food Posioning : चंद्रपूरमध्ये कॅन्टीनच्या जेवणातून 41 प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा!

Food Poisoning : नऊ पोलिसांची प्रकृती खालावली, रुग्णालयात उपचार सुरू
Chandrapur Police
Chandrapur PoliceSarkarnama
Published on
Updated on

Chandrapur Police News : पोलिस प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर परत आलेल्या कर्मचाऱ्यांना जेवणातून विषबाधा झाली. या प्रकारानंतर चंद्रपुरातील 41 पोलिस कर्मचाऱ्यांची प्रकृती खालावली आहे. विषबाधा झालेल्या नऊ पोलिसांची स्थिती चिंताजनक असून, त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेमुळे चंद्रपूरच्या पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वीच गडचिरोलीतील एका आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थिनींना सलग दोन दिवस विषबाधा झाली होती. ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा पूर्व विदर्भ विषबाधेच्या घटनेने हादरला आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पोलिस फुटबॉल मैदानावर प्रशिक्षण सुरू होते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर पोलिस कर्मचारी जेवणासाठी कॅन्टीमध्ये गेले. सुमारे 200 पोलिसांना या वेळी जेवण पुरविण्यात आले होते. जेवण आटोपल्यानंतर काही वेळातच एका पाठोपाठ पोलिसांना उलट्यांचा त्रास होऊ लागला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ कॅन्टीन गाठत विषबाधा झालेल्या कर्मचाऱ्यांना रुग्णालयात हलविले. मात्र, तोपर्यंत नऊ पोलिसांची प्रकृती चांगलीच खालावली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Chandrapur Police
Deer Hunting : सरपंचाने केली चितळाची शिकार; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

प्रशिक्षणार्थी पोलिस कर्मचाऱ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी तत्काळ वैद्यकीय उपचार मिळवून देण्यासाठी धावाधाव केली. त्यानंतर नऊ जणांना उपचारासाठी चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या निर्देशानुसार जेवणाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. विषबाधा कशातून झाली, हे अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. रविवारच्या या घटनेमुळे संपूर्ण पोलिस दल चांगलाच हादरला आहे.

गृह विभागाने काही महिन्यांपूर्वी पोलिस भरती घेतली. या भरतीत पात्र ठरलेले सुमारे 200 पोलिस कर्मचारी चंद्रपुरात प्रशिक्षणार्थी म्हणून पाठविण्यात आले आहेत. हे सर्व कर्मचारी पोलिस मुख्यालयात राहत असून, याच परिसरातील कॅन्टीनमध्ये सकाळ आणि रात्रीचे जेवण देण्यात येते. रविवारी सकाळच्या सत्रात सुमारे 40 प्रशिक्षणार्थींनी कॅन्टीनमध्ये जेवण केले. यानंतर एक एक करीत काही प्रशिक्षणार्थ्यांना त्रास जाणवू लागला. सायंकाळपर्यंत ही संख्या 41 वर पोहोचली. त्यानंतर सर्व प्रशिक्षणार्थींना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यातील आठ कर्मचाऱ्यांची प्रकृती गंभीर झाली. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Chandrapur Police
Lok Sabha Election 2024 : निवडणुकीपूर्वी अकोला पोलिसांकडून कारवाईचा सपाटा

चंद्रपुरातील विषबाधेच्या प्रकाराची वाच्यता होणार नाही, याची काळजी पोलिस अधिकाऱ्यांनी घेतली. मात्र, ही घटना लपून राहू शकली नाही. उपचारांनंतर अनेक पोलिसांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. मात्र, विषबाधेचा परिणाम पोलिसांच्या प्रशिक्षणावर होणार आहे. प्रकृती पूर्णपणे ठणठणीत होईपर्यंत कदाचित त्यांचे प्रशिक्षण थांबण्याची चिन्हे आहेत.

या घटनेची पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी गंभीर दखल घेतली आहे. तातडीने जेवणाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्याचे निर्देश त्यांनी दिलेत. सुरुवातीला ‘डी-हायड्रेशन’मुळे हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत होता. मात्र, एकाचवेळी विषबाधा आणि ‘डी-हायड्रेशन’ झाल्याचे उघडकीस आले.

(Edited by - Mayur Ratnaprkhe)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com