Lok Sabha Election 2024 : निवडणुकीपूर्वी अकोला पोलिसांकडून कारवाईचा सपाटा

Akola Police : नाकाबंदीही वाढविली. राजकीय नेत्यांच्या नावाचा वापर करीत गुंडगिरी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या. अनेकांना डांबले कोठडीत
Action by Akola Police
Action by Akola PoliceSarkarnama

Lok Sabha Election 2024 : लवकरच लोकसभा निवडणूक जाहीर होणार आहे. लोकसभा निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी आता अकोला पोलिसांनी कंबर कसली आहे. जिल्ह्यातील सामाजिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिसांकडून गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांची माहिती घेत अनेकांवर काढून दोन तथा त्याहून अधिक गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांना तडीपार किंवा एमपीडीएअंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करण्यात येत आहे. यात अशाही गुंडांचा समावेश आहे, ज्यांच्या नावामागे राजकीय वलयही आहे. अलीकडेच पोलिसांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या महानगराध्यक्षालाच एक वर्षासाठी स्थानबद्ध केले आहे. त्यामुळे अकोला पोलिसा कोणाच्याही दबावाला न जुमानता आपले कर्तव्य पार पाडणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

निवडणुकीपूर्वी पोलिसांनी जिल्ह्यात नाकाबंदी करीत मोठी कारवाई केली आहे. पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या आदेशांवरून अकोला जिल्ह्यात ही नाकाबंदी करण्यात येत आहे. येत्या काही दिवसांत देशाचे भवितव्य ठरवणारी लोकसभा निवडणूक पार पडणार आहे. निवडणुकीत शस्त्र आदींचा वापर होऊ नये, गुन्हेगारांचा प्रचार, मतदान प्रक्रियेत कमीत कमी सहभाग राहावा आणि निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी हे उपाय करण्यात येत आहेत. अशात पोलिसांनी एकाच वेळी संपूर्ण जिल्ह्यात नाकाबंदी राबवित प्रतिबंधात्मक कारवाईचा सपाटा लावला. अकोला पोलिस सध्या चांगलेच ‘ॲक्शन मोड’वर दिसत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Action by Akola Police
Akola Police : 700 शूटर्स असलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या तस्करांना अकोल्यात अटक

निवडणूक भयमुक्त, पारदर्शक आणि निःपक्षपातीपणे पार पाडण्यासाठी पोलिसांच्या ‘रेकॉर्ड’वरील गुन्हेगारांवर कारवाई सुरू केली आहे. अकोल्याचे पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर बच्चन सिंह यांनी अनेकांना वठणीवर आणण्यासाठी मोहिम हाती घेतली आहे. जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी त्यांनी ठोस पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. सुरुवातीला जिल्ह्यातील गुन्हेगारांची माहिती काढून त्यांच्या विरोधात झोपडपट्टी दादा कायद्याअंतर्गत कारवाईसुरू केली आहे.

पोलिसांनी अनेक गुन्हे दाखल असलेल्यांना वर्षभरासाठी जेलमध्ये टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी अकोला पोलिस एमपीडीएअंर्तगत कारवाई करण्यात येत आहेत. राजकीय क्षेत्रात असलेल्या गुन्हेगारांवरही पोलिसांनी कारवाई करायला सुरुवात केली आहे. पोलिसांनी रिपाइं आठवले गटाचा महानगरध्यक्ष गजानन कांबळे यांच्यावर काही दिवसांपूर्वीच कारवाई केली. अकोला पोलिसांनी गेल्या दोन महिन्यात जिल्ह्यातील सात सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी आता आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी जिल्ह्यातील शांतता अबाधित राहावी यासाठी प्रयत्न चालविले आहेत.

Action by Akola Police
Akola ZP : मिनी मंत्रालयात प्रशासनापासून तर पदाधिकाऱ्यांपर्यंत महिलांची सत्ता !

जिल्ह्यातील गुन्हेगारांवर एमपीडरएअंतर्गत कारवाई करण्यात येत असतानाच आता पोलिसांनी जिल्ह्यात गुन्हेगारांची नाकाबंदी करण्यास सुरुवात करीत मोठी कारवाई केली आहे. जिल्ह्यात मालमत्तेशी संबंधित गुन्ह्यांना आळा बसावा, यासाठी पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या आदेशांवरून अकोला जिल्ह्यात नाकाबंदी करण्यात येत आहे. अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे, सर्व पोलिस उपअधीक्षक, पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, दुय्यम अधिकारी असे एकुण 42 अधिकारी व 240 अंमलदार यांनी नाकाबंदी केली. नाकाबंदीत प्रभावी कारवाई करण्यात आली आहे. शहरात राबविण्यात आलेल्या नाकाबंदी दरम्यान बॅरेकेटिंग करण्यात आले. प्रत्येक वाहनाचा क्रमांक, चालकाचे नाव, पत्ता व मोबाइल कंमाक नोंदविण्यात आला. 297 दुचाकी व 239 चारचाकी अशा एकूण 536 वाहनांची तपासणी करण्यात आली.

तपासणीत 91 वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. त्यांना एकूण 32 हजार 700 रुपयांचा दंड आकारण्यात आला. 174 समन्स, 59 बेलेबल वॉरंट, 19 नॉनबेलेबल वॉरंट तामील करण्यात आलेत. 68 निगराणी बदमाश व 29 माहितीगार गुन्हेगार तपासण्यात आलेत. मुंबई पोलिस कायद्याच्या कलम 122 प्रमाणे एकूण 09 कारवाई करण्यात आली. भारतीय हत्यार कायदयान्वये 05 कारवाई करून 05 शस्त्र जप्त करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील एकूण 57 हॉटेल लॉजेस व 53 एटीएम तपासण्यात आलेत. महाराष्ट्र दारूबंदी कायदयान्वये 08 कसेस करण्यात आल्या. पोलिस अधीक्षक बच्चन सिंह हे सध्या स्वतः 'फिल्ड'वर उतरले आहेत. त्यांनी जिल्ह्यात गुन्ह्यांना प्रतिबंध व्हावा, याकरीता अशा प्रकारचे वेळोवेळी नाकाबंदी करण्याचे आदेश दिले आहेत. 2024 मध्ये एकूण 41 कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Edited By : Prasannaa Jakate

Action by Akola Police
Akola : IPS बच्चन सिंग, जिथे गेले ठरले ‘किंग’; अकोल्यात गुन्हेगारांची उतरविणार का झिंग?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com