Chandrapur ZP Bribe Case : आजारी रजा मंजूर करण्यासाठी शिक्षकाला मागितली लाच, शिक्षणाधिकारी अडकला जाळ्यात !

Demand for a bribe of eight thousand rupees : प्रभारी शिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांच्याकडून आठ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.
Bribe Case - Chandrapur ZP
Bribe Case - Chandrapur ZPSarkarnama
Published on
Updated on

Chandrapur District Bribe News : जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षकाची प्रकृती बिघडली. त्यामुळे ते सहा महिने रजेवर गेले. यानंतर आपल्या कर्तव्यावर रुजू झाले. सहा महिन्यांची वैद्यकीय रजा मंजूर करण्यासाठीचा प्रस्ताव शिक्षणाधिकारी कार्यालयात सादर केला. प्रभारी शिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांच्याकडून आठ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. (This officer was caught red-handed)

या प्रकाराने संतापलेल्या शिक्षकाने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. आता या प्रकरणी आठ हजार रुपयांची लाच घेताना या अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडण्यात आले. या घटनेमुळे चंद्रपूर जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रात खळबळ माजली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे वास्तव्यास असलेले एक शिक्षक सावली पंचायत समितीअंतर्गत जिल्हा परिषद शाळेत शिक्षकपदावर कार्यरत आहेत. दरम्यान, त्यांची प्रकृती खालावल्याने ते सहा महिन्यांसाठी वैद्यकीय रजेवर गेले होते. ते रजेवर गेले असल्याने त्यांचे सहा महिन्यांचे वेतन त्यांना मिळाले नाही. प्रकृती ठीक झाल्यानंतर ते आपल्या कर्तव्यावर रुजू झाले.

यानंतर त्यांनी आपल्या सहा महिन्यांच्या वेतनासाठी सावली येथील पंचायत समितीमध्ये शिक्षण विभागाशी पत्रव्यवहार केला. वारंवार पाठपुरावा करूनही देयके निघत नव्हती. सध्या सावली पंचायत समितीच्या शिक्षणाधिकाऱ्यांचा पदभार लोकेश खंडारे यांच्याकडे आहे. शिक्षकाला सहा महिन्यांचे वेतन काढून देण्यासाठी त्यांनी आठ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.

या प्रकारामुळे शिक्षकाला प्रचंड संताप आला. सहा महिने तब्येत बरी नसल्याने आधीच त्यांची आर्थिक आणि मानसिक स्थिती बरी नव्हती. अशात अधिकाऱ्याकडून लाचेची मागणी होत असल्याने शेवटी त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. विभागाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सत्यता तपासली. तेव्हा हा प्रकार खरा असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

दरम्यान, पंचायत समिती सावली येथील शिक्षण विभागात काल (ता. २८) आठ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी आता सावली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचखोर आरोपी लोकेश खंडारे याला अटक करण्यात आली आहे. तब्येत बिघडलेली असतानाही परिस्थितीची जाणीव न ठेवता शिक्षकाकडून लाच मागणाऱ्या प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्याच्या विरोधात इतर सर्व शिक्षकांमध्येही संताप उसळून आला आहे. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राला लाच घेऊन काळे फासणाऱ्या या अधिकाऱ्याच्या प्रवृत्तीचा सर्वत्र निषेध होतो आहे.

Bribe Case - Chandrapur ZP
Chandrapur OBC Andolan: सर्वपक्षीय ओबीसींची बैठक घ्या; ताकत कळेल, असं का म्हणाले वडेट्टीवार?

लाचखोरांना आवरा...

प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आपल्या कर्मचाऱ्यांवर वचक राहत नसल्याने ते मनमानी कारभार करतात. यातूनच मग लाच घेण्याची वृत्ती निर्माण होते. चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत लाचखोरांवर कारवायांचे प्रमाण वाढले आहे. तरीपण लाचखोर वृत्ती कमी झालेली दिसत नाही. या लाचखोरांना आवरण्यासाठी विविध प्रयत्न करूनही ते अपयशी ठरत आहेत. अशा वेळी लाचखोरांना आवरण्यासाठी प्रभावी यंत्रणेची अंमलबजावणी करणे गरजेचे झाले आहे.

Edited By : Atul Mehere

Bribe Case - Chandrapur ZP
Chandrapur BJP News : भोंगळे विधानसभाप्रमुख झाले, दौरे वाढले; धोटे, निमकरांचे काय होणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com