Chandrasekhar Bawankule and State Election Commission : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात अतिवृष्टी सुरू आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती उद्भवली आहे. अशा परिस्थिती स्थानिक स्वराज्य संस्थांमध्य पोटनिवडणूक घेणे योग्य नाही. राज्यातील सद्य परिस्थिती बघून पोटनिवडणुका पुढे ढकला. अशी विनंती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य निवडणूक आयुक्तांकडे केली आहे.
अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे निर्माण झालेली अडचण लक्षात घेता. राज्यात होऊ घातलेल्या पोटनिवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात. याबाबत राज्याचे निवडणूक आयुक्त यूपीएस मदान यांच्याशी चर्चा केली आणि सचिव सुरेश काकाणी व राज्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांची बावनकुळे(Chandrasekhar Bawankule) यांनी सोमवारी भेट घेतली. विशेष म्हणजे नागपूर जिल्ह्यात जाहीर झालेल्या पोटनिवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.
अतिवृष्टी व पूर परिस्थिती लक्षात घेता या निवडणुका पावसाळा संपल्यानंतर घेण्यात याव्या अशी विनंती भाजप(BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. निवडणूक आयोगाने राज्यातील विविध जिल्ह्यातील 11 नगरपरिषदांमधील 11 प्रभाग व हातकणंगले नगर पंचायतीच्या अध्यक्षपदाच्या रिक्त जागेसाठी 12 ऑगस्ट 2024 रोजी पोटनिवडणूक जाहीर केली आहे.
सर्व होऊ घातलेल्या पोटनिवडणुका ग्रामीण भागाशी संबंधित आहेत. राज्यात सर्वदूर् पाऊस झाल्याने शेतकरी पेरणीच्या कामाला लागला आहे. तसेच मागील चार पाच दिवसांपासून अनेक जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांनी शाळांना सुट्या जाहीर केल्या आहेत. ज्या जिल्ह्यात अतिवृष्टी झाली त्याच जिल्ह्यात पोटनिवडणुका जाहीर झाल्या आहेत.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.